मधुमेह: एक गंभीर आजार, पण योग्य माहिती आणि उपचाराने नियंत्रणात ठेवता येतो!आहारातील बदल आणि व्यायामाचे महत्त्व

                

मधुमेह: एक गंभीर आजार, पण योग्य माहिती आणि उपचाराने नियंत्रणात ठेवता येतो!आहारातील बदल आणि                    व्यायामाचे महत्त्व 





डायबेटिस ज्याला मराठीत 'मधुमेह' म्हणतात, ही एक चयापचय matabolic स्थिती आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची ग्लुकोज  पातळी सामान्य पेक्षा जास्त असते. शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नसल्यास किंवा शरीर तयार केलेल्या इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करू शकत नसल्यास, मधुमेह होतो. 


मधुमेहाचे मुख्य 2 प्रकार आहेत 


 मधुमेह पहिला प्रकार 


या प्रकारात, शरीरात इन्सुलिन तयार करणारे पेशी नष्ट होतात, त्यामुळे शरीराला इन्सुलिन मिळत नाही.


मधुमेह दुसरा प्रकार 


या प्रकारात, शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत.

गर्भधारणा-कालीन मधुमेह:

हा मधुमेह काही स्त्रियांच्या गरोदरपणात होतो आणि बाळंतपणानंतर सामान्यतः निघून जातो. 


मधुमेहाची लक्षणे:


वारंवार लघवी होणे, विशेषतः रात्री.

हाता पायाला मुंग्या येणे 

हातपाय सुन्न होणे 

खूप तहान लागणे.

खूप भूक लागणे.

थकवा येणे.

वजन कमी होणे.

दृष्टी कमी होणे.

जखमा लवकर न भरणे. 


वरील सर्व लक्षणें रोगाच्या सुरुवातीस दिसतील.


मधुमेह झाल्यावर शरीरारील वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम होतो 

जसे की डोळे, मूत्रपिंड, हात, पाय, हृदय, रक्तवाहिन्या, स्नायू ईत्यादी.


   मधुमेह झाल्यास रुग्णांनी खचून जाऊ नये किंवा घाबरू नये. धीराने या रोगाचा सामना करावा, नक्कीच तुमचा मधुमेह नियंत्रणात राहू शकतो.


मधुमेह टाळण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी:


निरोगी आहार घेणे 


 मधुमेह हा रोग हा असाध्य समजला जात असला तरी आता नैसर्गिक उपचार पद्धतीने आणि योग्य आहार घेतल्याने मधुमेहावर नियंत्रण आणू शकतो आणि पूर्ण बरा होऊ शकतो 


फळे, भाज्या, कडधान्ये आणि कमी चरबीयुक्त पदार्थांचे सेवन करणे. 


नियमित व्यायाम करने 


दिवसातून कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम करणे. 

वजन नियंत्रित ठेवणे:

जास्त वजन किंवा लठ्ठपणा असल्यास, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे. 

नियमित तपासणी:

रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासणे. 

तणाव व्यवस्थापन:

तणाव कमी करण्यासाठी योगा, ध्यान किंवा इतर गोष्टींचा अवलंब करणे. 

धूम्रपान आणि मद्यपान टाळणे:

या दोन्ही गोष्टी मधुमेहाचा धोका वाढवतात. 


नैसर्गिक आहार 


 मधुमेहावर मेथी दाणे उपयुक्त आहेत दोन चमचे मेथी दाणे रात्रभर भिजत घालायचे आणि सकाळी उठून ते पाणी प्यायचे.


 मेथी दाण्याचे चूर्ण तसेच दोन चमचे मेथी दाणे सकाळी उठून पाण्यासोबत घ्यावे 


 आवळ्यामध्ये क जीवनसत्व असल्यामुळे मधुमेहावर अत्यंत उपयुक्त आहे एक चमचा आवळ्याचा रस आणि एक कप कारल्याचा रस हे दोन्ही एकत्र मिक्स करून घेतल्यास स्वादु पिंडाला चालना मिळते आणि इन्सुलिन तयार होते व रक्तामध्ये साखरेचे प्रमाण कमी होऊन मधुमेह कमी होण्यास मदत होते  


 रोज दोन चमचे कारल्याचा रस घ्यावा 


  जांभुळाचे चूर्ण आणि कारल्याचे चूर्ण समप्रमाणात घेऊन पाण्यासोबत घ्यावे 

 


मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठो काही योगासने आहेत ते रोज न चुकता करावी 


 नौकासन


 नौका म्हणजे नाव,जहाज या आसनाच्या अंतिम स्थितीत शरीराचा आकार नौकेप्रमाणे दिसतो म्हणून याला नौकासन म्हणतात.

 

   नौकासनाचे दोन प्रकार आहेत तर आपण  पहिला प्रकार बघू 


   पाठीवर सरळ म्हणजेच उताणे झोपा, हात शरीरापाशी सरळ ठेवा आता दोन्ही पाय हळूहळू वर उचला डोकं पाठ हे पण वर उचलत उचलत न्यायचं शरीराचा आकार नौका प्रमाणे झाल्या नंतर त्या वेळेला स्थिर राहायचं पाच किंवा दहा सेकंद पर्यंत या नौका स्थितीमध्ये राहायचं आणि हळूहळू पाय खाली आणायचे आणि त्याचप्रमाणे पाठ आणि डोकं जमिनीला टेकून हात पण जमिनीला ठेवून थोडी विश्रांती घ्यावी.


 नौकासन दुसरा प्रकार बघुयात 


       नौकासनाच्या दुसऱ्या प्रकारामध्ये पाठीचा कणा मागे वाकविला गेल्याने पाठीकडील स्नायू आकुंचन पावतात आणि पोटावरील स्नायू ताणले गेल्यामुळे पाठीच्या आणि पोटाच्या स्नायूंना उत्तम व्यायाम मिळतो आणि स्वास्थ टिकून राहते 


 दोन्ही प्रकारचे नौकासन केल्याने मधुमेही रुग्णांना मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते



 हलासन 


 या आसनाच्या अंतिम स्थितीत शरीराचा आकार शेतकऱ्यांच्या जवळ नांगर असते त्याला आपण हल म्हणतो त्याप्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला हलासन असे म्हणतात.


 तर  हलासन कसे करायचे हे आता आपण बघूयात 


       पाठीवर  उताणे झोपावे शरीर सरळ ठेवून हाताचे पंजे जमिनीवर शरीरा जवळ पालथे ठेवावे. दोन्ही पाय ताठ ठेवून हळूहळू वर उचलावे 90 अंशापर्यंत गेल्यानंतर हाताचा आधार घेत म्हणजेच पंज्यांनी जमिनीवर किंचित दाब देऊन कंबरही वर उचलावी आणि त्याचवेळी दोन्ही पाय डोक्यावरून मागे घ्यावेत पायाची बोटे आणि अंगठे जमिनीवर टेकवावे पाय ताठ ठेवावे. आणि हाताची बोटे डोक्याच्या मागे एकमेकात गुंतवून डोक्यावर पंजे येतील व कोपरे व दंड जमिनीवर राहतील अशा रीतीने हात ठेवून श्वसन शांतपणे चालू ठेवावे. शरीर सैल सोडावे. 15 ते 20 सेकंद पर्यंत करावे.

      आसन सोडताना आधी हात पूर्ववत जागेवर आणावेत व नंतर जमिनीवरून पाय उचलून कंबर खाली आणावी नंतर दोन्ही पाय गुडघ्यात न वाकविता सरळ जमिनीवर खाली ठेवावेत आसन सोडल्यावर तसेच उताणे पडून विश्रांती घ्यावी.

 मधुमेही रुग्णांना हे आसन अत्यंत उपयोगी आहे.


वज्रासन 


वज्रासन अगदी सोपं असं आसन आहे 

      

      तर आता हे असं कसं करायचं 


 दोन्ही गुडघ्यावर उभे रहावे कमरेत वाकू नये त्यानंतर दोन्ही पावलांमध्ये अंतर ठेवून हळूहळू खाली बसावे आणि दोन्ही टाचांचे मध्ये बसावे हात गुडघ्यावर ठेवून खांदे आणि हात ढिले सोडून डोळे मिटवून शांततेने बसावे.

 वज्रासन हे ध्यानात्मक आसन म्हणूनही महत्त्वाचे व उपयुक्त असे आसन आहे,ज्यांना पद्मासन जमत नाही त्यांनी या आसनात बसून प्राणायाम ज्ञान इत्यादी करता येते यामध्ये मेरुदंड ताठ राहतो डोळे मिटून बराच वेळ अशा परिस्थितीत राहता येते जेवणानंतर हे आसन करावे बाकी आसन आपण जेवणानंतर करू शकत नाही,परंतु वज्रासन हे एक असं आसन आहे,की ते आपण जेवणानंतर करू शकतो हे आसन जेवण झाल्यानंतर पाच-दहा मिनिटे वज्रासनात बसता येतं त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आता या आसनाचे आपण लाभ बघूया किती होतात ते,तर या आसनामध्ये बसल्यानंतर मांड्यांचे स्नायू ताणले जातात आणि गुडघ्यांच्या सांध्यामधील वाटीवरही ताण पडतो त्यामुळे गुडघेदुखी सहसा कधीही होत नाही, गुडघ्यांचे आरोग्य उत्तम राहते कटी प्रदेश,ओटीपोट जनेंद्रियाचा संपूर्ण भाग या आसनाने निरोगी राहतो आणि मधुमेही रुग्णांनी जर रोज पंधरा-वीस मिनिटं या आसनामध्ये बसल्यास फार लाभ होतो.



भुजंगासन 


 भुजंग म्हणजे साप किंवा नाग या आसनाची अंतिम स्थिती शरीराचा आकार फणा असलेल्या नागाप्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन असे म्हणतात.


 आता भुजंगासन कसे करायचे  आता ते आपण बघूया 


 सर्वप्रथम जमीनीवर पालथे झोपावे कोणतही आसन किंवा प्राणायाम करताना सर्वप्रथम आपल्याला एखादी चटई,चादर किंवा सतरंजी अंथरूनच आसनाला सुरुवात करावी सर्वप्रथम पोटावर झोपावे पाय एकमेकांना जुळवून ठेवावे. पायाचे अंगठे एकमेकांना लागून ठेवावे व तळवे आकाशाकडे असावेत आता कपाळ जमिनीवर ठेवा व हाताचे पंजे छातीच्या बाजूला जमिनीवर खांद्याच्या बरोबर खाली येतील असे ठेवा म्हणजे हाताची कोपर वर उचलली जातील हात शरीरास चिकटून असू द्या. त्यानंतर सावकाश जमिनीला लागूनच हनुवटी समोर न्या व पूर्ण समोर गेल्यावर डोके जमिनीवरून वर उचलत न्या सावकाश वरवर बघत डोके खांदे छाती वर उचला म्हणजे मेरुदंड मागे वळतो बेंबी व खालील शरीराचा भाग जमिनीवर असतो पाय ढिले ठेवा व हाताच्या पंजावर फार भार देऊ नका. आता या स्थितीमध्ये दहा ते वीस सेकंद स्थिर राहा त्यानंतर हळूहळू आसन सोडावे.


गोमुखासन 


 गोमुख म्हणजे गाईचे तोंड या आसनात पायांची रचना गोमुखा सारखी भासते व पावले तिच्या कानाप्रमाणे वाटतात म्हणून या आसनाला गोमुखासन म्हणतात.


 गोमुखासन कसे करायचे ते आता आपण बघूया 


 पाय लांब करून दंडासनात बसावे उजवा पाय डाव्या पायाखालून डावीकडे दुमडून त्याची टाच डाव्या नितंबास चीकटून ठेवा आता डावा पाय गुडघ्यात वाकवून उजवा पायावरून उजवीकडे नेऊन त्याची टाच उजव्या नितंबाला चिकटून ठेवा. दोन्ही गुडघे एकमेकांवर येतील अशी पायांची रचना करा डावा हात वर करा व कोपऱ्यात वाकवून डोक्याच्या पाठीमागे न्या डावे कोपर डोक्याच्या मागे वरच्या दिशेने राहील उजवा हात उजवीकडून पाठीमागे न्यावा तळहात वर सरकवून शेवटी दोन्ही हाताची बोटे एकमेकांना पकडा या आसनामध्ये पाठीचा कणा एकदम ताठ ठेवून या आसनामध्ये एकदम स्थिर राहा डोळ्यांची नजर एकदम समोर ठेवा किंवा डोळे बंद करून दोन्ही भुवयांमध्ये लक्ष केंद्रित करून एक पाच ते दहा  सेकंदापर्यंत बॉडी स्थिर ठेवा आणि आणि नंतर हळूहळू आसन सोडावे. आणि परत हे आसन करावे करावे.


    आसन सोडताना आधी हाताला रिलॅक्स करावे त्यानंतर मग पाय रिलॅक्स करावे आणि हळूहळू दंडासन स्थितीमध्ये येऊन बसावे. आता डावा पाय खाली व उजवा पाय वरती घेऊन हे आसन परत करावे.


      हे आसन मधुमेहीं साठी अत्यंत उपयुक्त असं आसन आहे,या आसनात न थकता बराच वेळ बसता येते.


        वरील सर्व आसन नियमित वेळात वेळ काढून करावे.


आता आपन मधुमेह रुग्णाचा आहार कसा असावा ते पाहू 


 मधुमेही रुग्णासाठी एक दिवसाचा आहार:


सकाळचा नाश्ता: 


ओट्स, कमी चरबीचे दूध आणि फळे.


दुपारचे जेवण: 


2 फुलके,1 वाटी ब्राऊन राईस, डाळ, भाजी आणि सलाड, 1वाटी ताक 


संध्याकाळचा नाश्ता:


 मूठभर नट्स किंवा दही,ताक 


रात्रीचे जेवण: चपाती, भाकरी भाजी आणि थोडे प्रथिने. किंवा तुमच्या डॉक्टर च्या सल्ल्याने आहारात बदल करू शकता 


आहारात काय खावे आणि काय टाळावे, याबाबत काही सूचना खालीलप्रमाणे आहेत:


काय खावे:


भाज्या:


भरपूर फायबर आणि कमी कार्बोहायड्रेट असलेल्या भाज्या, जसे की पालेभाज्या, ब्रोकोली, फुलकोबी, शिमला मिरची, मशरूम, इत्यादी खाव्यात. 


फळे:


जसे की सफरचंद, पेरू, डाळिंब,  आणि संत्री यांचा आहारात समावेश करावा. 


संपूर्ण धान्य:


ब्राउन राइस ओट्स, आणि मल्टीग्रेन ब्रेड सारखे संपूर्ण धान्ये खावीत. 


कडधान्ये:

मटकी मुग मसूर, वाटाणे, हरभरा, राजमा, या अंकुरीत कडधान्याचा आहारात समावेश करावा 


प्रथिने:


चिकन, मासे, अंडी, आणि डाळींसारखे प्रथिनेयुक्त पदार्थ आहारात असावेत. 


दुग्धजन्य पदार्थ:


कमी चरबीयुक्त दूध, दही, आणि पनीर यांचे सेवन करावे. 


पाणी:


पुरेसे पाणी प्यावे. 

आणि विविध फळांचा रस घ्यावा.


धन्यवाद 


🙏🏻🙏🏻🙏🏻













Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन