भुलाबाईची गाणी कृष्णा घालितो लोळणं



              भुलाबाईची गाणी

कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून


कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून || धृ ||
काय रे मागतोस बाळा, तुला देते मी आणून
आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून...||धृ||
आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून....||२||
आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून...||३||


गाण्याचा व्हिडिओ बघण्यासाठी
Click करा 👇

Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन