सांधेदुखी आणि स्नायूदुखी साठी घरगुती उपचार
सांधे दुखी आणि स्नायू दुखी साठी घरगुती उपचार
पावसाळ्यामध्ये बऱ्याच जणांना सांधेदुखी आणि स्नायूदुखीचा त्रास सुरु होतो. वेदना आणि दुखणे खूप प्रमाणात वाढतात,गुडघे दुखी डोके वर काढते.
सांधेदुखी आणि वेदना दुखी किंवा कोणतीही दुखणे असो त्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहे.
लवंगाच्या तेलाने दररोज मालिश केल्यास वेदना कमी होऊ शकतात.
मीर पावडर
मिरे बारीक करून त्यात थोडेसे तेल टाकून त्वचेला मालिश करावी त्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात.
एक चमचा मिरपूड जवसाच्या तेलामध्ये लाल होईपर्यंत परतवावी व बारीक करून त्यामध्ये जवसाचे तेल टाकून ठेवावे आणि त्या तेलाने दररोज मालिश करावी.
हळद
हळदीमध्ये कर्क्युमिन नावाच तत्व असल्याने वेदना आणि सूज कमी करण्यात मदत करते म्हणून गरम पाण्यामध्ये किंवा गरम दुधामध्ये रोज हळद टाकून प्यावी.
वेदना असलेल्या भागांवर सरसोच्या तेलाने मालिश केल्यास वेदना कमी होण्यास मदत होते.
तसेच गरम पाण्याचा शेक सुद्धा तुम्ही देऊ शकता.
सुंठी पावडर रोज एक कप दुधामध्ये घेतल्यास वेदना कमी होतात.
डोकं दुखत असेल तर रोज आल्याचा चहा घेऊ शकता किंवा रोज गरम पाण्यामध्ये आल्याचा रस ऐक चमचा टाकून ते पाणी प्यावं.
आल्याचा लेप करावा आणि कपाळाला लावावा.
Comments
Post a Comment