त्रिफळा चूर्णचे फायदे, उपयोग व सेवन पद्धत | Triphala Churna Benefits in Marathi
त्रिफळा चूर्णचे फायदे, उपयोग व सेवन पद्धत | Triphala Churna Benefits in Marathi
आजच्या लेखात त्रिफळा चूर्णचे फायदे, उपयोग व सेवन पद्धत जाणून घ्या. पचन सुधारणे, वजन कमी करने , त्वचा व केसांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्रिफळा चूर्ण कसे उपयुक्त आहे ते वाचा.
आयुर्वेदामध्ये त्रिफळा चूर्ण हे एक अत्यंत प्रभावी, सुरक्षित आणि बहुगुणी औषध मानले जाते. शरीराचे शुद्धीकरण, पचनसंस्था सुधारणा, रोगप्रतिकारशक्ती वाढवणे यासाठी त्रिफळा चूर्णाचा उपयोग प्राचीन काळापासून केला जातो.
आता त्रिफळा चूर्ण म्हणजे काय?हा प्रश्न बहुतेक जणांना पडला असेल तर
त्रिफळा म्हणजे तीन फळांचे मिश्रण –
आवळा
हरितकी
बिभीतकी
या तिन्ही औषधी फळांचे चूर्ण करून तयार केले जाते, त्यालाच त्रिफळा चूर्ण म्हणतात.
त्रिफळा चूर्णचे आरोग्यदायी फायदे
1️⃣ पचनसंस्था सुधारते
त्रिफळा चूर्ण बद्धकोष्ठता, गॅस, अपचन व आम्लपित्त कमी करते. पोट स्वच्छ ठेवण्यास मदत होते.
2️⃣ वजन कमी करण्यास मदत
मेटाबॉलिझम वाढवून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास सहाय्यक ठरते.
3️⃣ रोगप्रतिकारशक्ती वाढवते
शरीराला आतून बळकट करून वारंवार होणारे आजार टाळण्यास मदत करते.
4️⃣ रक्तशुद्धी करते
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकून रक्त स्वच्छ करते, त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते.
5️⃣ त्वचेसाठी फायदेशीर
मुरूम, पिंपल्स, डाग कमी होतात. त्वचा नितळ, स्वच्छ व तेजस्वी दिसते.
6️⃣ केसांचे आरोग्य सुधारते
केस गळणे कमी होते, कोंडा दूर होतो व केस मजबूत होतात.
7️⃣ डोळ्यांसाठी उपयुक्त
डोळ्यांची जळजळ, थकवा कमी होऊन दृष्टी सुधारण्यास मदत होते.
रोज रात्री काचेच्या ग्लास मध्ये ऐक चमचा त्रिफळा चूर्ण व पाणी टाकून रात्रभर ठेवावे व त्या पाण्याने डोळे धुवावे.
8️⃣ मधुमेह नियंत्रणात मदत
रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास सहाय्य करते.
त्रिफळा चूर्ण कसे घ्यावे?
रात्री झोपण्यापूर्वी
👉 अर्धा ते 1 चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत
किंवा
👉 मधासोबत घेऊ शकता
⏰ नियमित सेवन केल्यास उत्तम परिणाम दिसून येतात.
त्रिफळा चूर्ण घेताना काळजी
अति प्रमाणात सेवन करू नये
गर्भवती महिला व गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
जुलाब होत असल्यास सेवन थांबवावे
🌿 निष्कर्ष
त्रिफळा चूर्ण हे एक नैसर्गिक आयुर्वेदिक औषध असून संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. योग्य प्रमाणात आणि नियमित सेवन केल्यास पचन, वजन, त्वचा, केस व रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
Comments
Post a Comment