कोकिळा व्रत कथा

            कोकिळा गौरीची कहाणी

         कोकिळा व्रताची कहाणी ही श्री भगवान शंकर आणि त्यांची अर्धांगिनी दाक्षायणी यांच्या विषयी आहे.

        एक दिवस दक्ष प्रजापती यांनी महायज्ञ करायचे ठरवले होते.त्यासाठी दक्ष प्रजापतीनी सर्व देव-गंधर्वांना आमंत्रण दिले होते, परंतु आपली कन्या दाक्षायणीला व शंकरांना बोलावले नाही.

     शंकरांनी दक्षयानी जाऊ नको' म्हणत असताही दाक्षायणी तशीच यज्ञ मंडपाच्या दाराशी आली.

       दक्षानं तिचं स्वागत काही केलं नाही. त्यामुळे तिचा अपमान झाला; म्हणून दक्षायांनी संतापून गेली. व धावत जाऊन तिनं यज्ञकुंडात उडी घेतली आणि दाक्षायणी जळून खाक झाली आणि त्याच वेळी नारदानं शंकराला ती वार्ता कळवली.

         शंकरानी रागाने त्यांची जटा शिलेवर
आपटली. आणि शिळेतून वीरभद्राची भयंकर मूर्ती प्रगटली. शंकरांनी वीरभ्रदाला 
 व आपला पुत्र गणपतीला सुद्धा यज्ञमंडपात आणले व यज्ञाचा विध्वंस केला.तसेच देव गंधर्वांचे हात-पाय तोडले. मंडप फाडला. इंद्राच नाक कापल आणि दक्षाचं केलेल्या अपमानाचा सूड घेतला व दक्षच शिर छाटलं.

          आणि इकडे सर्व देवगण शंकराला शरण गेले. शंकरानी सारे पूर्ववत् केले. शंकरांनी सर्व देव-गंधर्वांचे हात-पाय जोडून दिले. इंद्राला नवे नाक जोडून दिले. आणि दक्षाला बोकडाचं शिर लावलं. संजीवनीच्या प्रयोगानं दाक्षायणीला पुन्हा जिवंत केलं.

         परंतु अजून पण शंकरजींचा राग काही शांत झाला नव्हता त्याचा राग अजूनही त्याची अर्धांगिनी दक्षयांनीवर होता.

       शंकरजी दक्ष्याणींना म्हणाले "गौरी, तु घोर अपराध केलास. यज्ञात विघ्न करून आत्मघात केलास. या पापाचं फळं म्हणून तू पक्षिणी होशील. काळी कुरूप कोकिळा बनून पृथ्वीवर फिरशील!

       काकुळतीला येऊन गौरी म्हणाली, “कोकिळा जरी झाले, तरी मला मान पाहिजे माझ्या पूजेमुळे स्त्रियाचं कल्याण होईल, असा वर द्यावा; तरच सार्थक होईल."

     शंकर म्हणाले, “तथास्तु ! कोकिळागौरी व्रताला ज्या स्त्रिया मानतील,व मनोभावे हॆ व्रत करतील त्यांना सौभाग्य लाभेल.

      अठरा वर्षांनी अधिक आषाढ महिना येतो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेपासून महिनाभर कोकिळा व्रत करावं. श्रावणी पौर्णिमेला त्याचं उद्यापन करावं. दहा हजार वर्षे तू कोकिळा म्हणून राहशील. नंतर
उमा-पार्वती माझी पत्नी होशील.'

       गौरी कोकिळा होऊन भुर्रकन उडून गेली. वसंत ऋतू आल्यावर विंध्याचली उत्तरेला आम्रवृक्षावर कुहू कुहू मधुर स्वर करू लागली.

          कोकिळा व्रत कसं करावं, हे वसिष्ठांनी सांगितलं. शत्रुघ्नाची पत्नी कीर्तिमालेनं ते प्रथम केलं. श्रीकृष्णानं द्रौपदीला त्या व्रताची माहिती दिली. 

          कोकिळागौरीचं व्रत निष्ठेनं केल्यानं गौरी कोकिळा प्रसन्न होईल. व सुवासिनींना अखंड सौभाग्य लाभेल.



Comments

Popular posts from this blog

hair problems केसांचे आरोग्य केसांची निगा राखण्यासाठी योगा निसर्गोपचार व घरगुती उपाय

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon