पौष्टीक चवळीची शेंग

         पौष्टीक चवळीची शेंग


 चवळीची शेंग भारतात सर्वत्र मिळते भारतामध्ये चवळीचे उत्पादन जवळजवळ सर्वच ठिकाणी होत असते तसे पहिले तर चवळीचे मूळ स्थान  आफ्रिका हे आहे.


 पावसाळ्याच्या सुरुवातीस आणि माग महिन्यात चळवळीची लागवड करतात पावसाळ्याच्या सुरुवातीस पेरलेल्या चवळीच्या वेलाला भाद्रपद आणि कार्तिक महिन्यात  शेंगा लागतात,ज्वारी बरोबर मिश्र पीक म्हणून चवळी पेरली  जाते.


 चवळीचा रोप उंच वाढून त्यानंतर ते वेली वर्गात वाढते.


 चवळी तीन प्रकारे असते पांढरी लाल आणि काळ्या रंगाची अशा तीन प्रकारच्या चवळी असतात.


 मोठ्या चवळीच्या शेंगा लहान व पातळ असतात तर दुसऱ्या प्रकारच्या चवळीच्या शेंगा मोठ्या आणि जाड असतात 

लहान चवळीच्या शेंगा मधे तीन-चार प्रकार आढळून येतात त्यापैकी काही चवळीच्या शेंगा अडीच ते तीन फूट लांब असतात चवळीपेक्षा चवळीच्या शेंगा चवीला स्वादिष्ट लागतात चवळी व चवळीच्या शेंगांचा भाजीसाठी उपयोग केला जातो शेंगांची भाजी चवीला चांगली लागते त्यामध्ये जर शेंगदाणे वगैरे टाकून तिळाचा कूट टाकून भाजी केली तरीही खूप छान लागते सुक्या चवळीची उसळ बनविली जाते मोठी चवळी असते ती खूप गुणकारी असते चवळी वाफूनही खाल्ल्या जातात वाफवलेल्या चवळ्या तेलात मिसळून खाल्ल्याने त्या गोड लागतात व त्यांच्या गुणातही वाढ होते. काही राष्ट्रांमध्ये चवळीचे सांडगे आणि पापड ही केले जातात तेल आणि चवळी खाल्ल्याने शरीर पृष्ठ बनते चवळी अतिवातुळ असल्याने तेलाबरोबर त्याचा उपयोग करणे हितावह असते चवळीच्या वेलीची कोवळी पाने गुरांना खायला घालतात त्यामुळे दुभत्या गुरांचे दूध वाढते आणि त्यांचे रक्त वाढते त्यामुळे गुरे मजबूत बनतात.


 चवळी पचायला जड,मधुर, तुरट तृप्तीदायक,मळ बांधून ठेवणारी व रुक्ष तसेच वायु कारक आणि रुची निर्माण करणारी असते चवळीमुळे मातेच्या  अंगावर दूध वाढते तसेच चवळीमुळे बळही वाढते चवळीमुळे शौच्याचे प्रमाणही वाढते चवळीची भाजी हलकी रेचर व गॅस उत्पन्न करणारी असते. 

Comments

Popular posts from this blog

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

1 week diet plan for weight loss लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा