उत्तम आरोग्यासाठी दैनिक आहार भाज्यांचे सूप भाग 1

           उत्तम आरोग्यासाठी
             दैनिक आहार
           भाज्यांचे सूप भाग 1
 निसर्गोपचार शास्त्रामध्ये कच्च्या भाज्या खाण्याचे जेवढे महत्त्व आहे तेवढे महत्त्व भाज्या उकडून खाण्याचे ही खुप महत्व आहे, पण भाज्या नुसत्या उकडून खाल्ल्या तर चव लागत नाही म्हणून निरनिराळ्या प्रकारची सूप बनवता येते.
आज आपण गाजर व बीटाचा सूप कसा करायचा ते बघू या गाजर बिट सुप पिल्याने डोळ्याचे विकार, त्वचेचे विकार दूर होतात, तसेच रक्त शुद्धी होते.

साहित्य
4 गाजर
2 बिट
2 चमचे मोड आलेले कोणतेही कड धान्य
1 इंच आल्याचा तुकडा
½ चमचा मिरेपूड
चवी पुरते मिठ

कृती
गाजर व बिट स्वच्छ धुवायची आणि छोटे तुकडे करावे गाजरचा मधला भाग काढून टाकावा तसेच बीटाची साल सुद्धा काढावी

प्रेशर कुकर मध्ये गाजर बिटाच्या फोडी टाकून 3ते 4 शिट्या काढून घ्याव्या.
त्यानंतर शिजलेले गाजर बिट मिक्सर मधून बारीक करून किंवा चाळणीतून गाळावे व परत गरम करून त्यात मिरे पूड जिरे पूड आणि चवीपुरते मिठ टाकावे आणि आवडत असल्यास टोस्ट चे तुकडे टाकावे.आणि गरमा गरम सूप प्यावे तर असे हॆ पौष्टीक सूप रोज प्या व निरोगी राहा

गाजर आणि बीट सूप किंवा ज्यूस पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते पचन सुधारते, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, त्वचा उजळते आणि हृदय व यकृताचे आरोग्य सुधारते, कारण त्यात व्हिटॅमिन्स (A, C, K), अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि ऊर्जा देण्यास मदत करतात. 

फायदे

रोगप्रतिकारशक्ती वाढवते त्यातील व्हिटॅमिन C, बीटा-कॅरोटीन आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. तसेच
पचन शक्ती सुधारते व भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होतात.

वजन कमी करण्यासाठी रोज सकाळीच सूप प्यावे त्यामुळे पोट भरलेले राहिल्याने जास्त खाणे टाळता येते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.

निरोगी त्वचा आणि हेल्दी केसांसाठी

अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहते, तसेच केसही निरोगी होतात.

हृदयाचे आरोग्य ठीक राहण्यासाठी
यात असलेले नायट्रेट्स रक्तवाहिन्या रुंद करतात, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.

यकृताचे आरोग्य Liver हेल्थ

यकृतातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास (detoxify) मदत करते.
तसेच दिसभर ताजेतवाने वाटते मूड फ्रेश राहतो, दिवसभर उत्साह टिकून राहतो

ऊर्जा आणि तग धरण्याची क्षमता ऊर्जावान वाटण्यास मदत करते आणि व्यायामासाठी आवश्यक तग धरण्याची क्षमता (stamina) वाढवते.

डोळ्यांचे आरोग्या साठी 

गाजरातील बीटा-कॅरोटीन डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम टॉनिक आहे. 

कधी प्यावे:
सकाळी रिकाम्या पोटी किंवा व्यायामाच्या ३०-४५ मिनिटे आधी पिणे सर्वात फायदेशीर असते. 

टीप

मधुमेहाचे रुग्ण आणि किडनीचा त्रास असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सेवन करावे, कारण त्यात साखरेचे प्रमाण भरपूर असते.

आरोग्य साधना योग अँड naturopathy
🙏🏻🌹🙏🏻

Comments