तृषा शमन करणारे गुणी कलिंगड

   तृषा शमन करणारे गुणी कलिंगड 

    ग्रीष्म राजा च आगमन झालं की कडक उन्हाळा सुरु झाला समजायचं साधारण पणे 15 एप्रिल ते 15 जून पर्यंत हा ग्रीष्म राजा आपल्याकडे ठाण मांडून बसतो. आणि सुरु होते रखरखत्या उन्हात अंगाची लाही लाही, आणि घामाच्या धारा  आणि मग तहानेने घसा कोरडा पडतो रख राखीत उन्हात अंग भाजून निघते आणि घामाच्या धारा सुरु झाल्या की घसा कोरडा पडतो अश्यातच वाटते की घश्याची कोरड कमी करावी आणि मग आठवते ऊस, कलिंगड, टरबूज खरबूज संत्री,ही सगळी फळ आपली तहान भागवते, त्यातीलच  एक फळ म्हणजे टरबूज किंवा कलिंगड ज्याला इंग्लिश मधे watermelon म्हणतात, कलिंगडाचे मूळ स्थान हे आफ्रिका आहे आणि जगातील सर्वात उष्ण देश हा आफ्रिका आहे, भारत  देशात साधारण नोव्हेंबर महिन्यात कलिंगडाची लागवड केली जाते, गडद हीरव्या रंगाचे, टरबूज आतून लाल भडक आणि त्यात काळ्या रंगाच्या बिया असतात  असे हे टरबूज उन्हाळ्यात आपली तहान भागवतात.
भारतात कलिंगडाची लागवड  
मारवाड, गुजरात, मथुरा, मधे मोठ्या प्रमाणात होते. 
   टरबूजा मधे पाण्याचे प्रमाण हे 90% असते, उन्हाळ्यात  जर टरबूज खाल्ले तर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही, 
 उन्हाळ्यात खुप घाम येतो त्यामुळे घामासोबत शरीराची ऊर्जा  कमी होते, थकवा जाणवतो आणि शरीरातले पाणी कमी झाले की अनेक आजारांना निमंत्रण मिळत 

      टरबूजा मध्ये असलेलं सिट्र्यूलाइन तत्व वजन कमी करते, अ जीवनसत्व असल्यामुळे डोळे चांगले राहतात, पाणी आणि फायबर चे प्रमाण भरपूर असल्यामुळे गॅस अपचन होत नाही, लठ्ठ पणा कमी करतो, 
     ज्यांना हाय ब्लड प्रेशर ची समस्या असेल त्यांनी उन्हाळ्यात नियमित पणे टरबूज खायला काही हरकत नाही, हाय ब्लड प्रेशर नियमित ठेवते 
     रक्तप्रवाह सुरळीत होतो, किडनी स्वस्थ राहते, जर मुतखडा झाला असेल तर मुतखडे बाहेर पाडण्यासाठी मदत होते,. 
        लहान मुलांनी तर टरबूज आवडीने खावे, टरबूज खाण्याने प्रतिकार शक्ती वाढते. 
        तसेच जे लोक मानसिक तणावात आहेत ज्यांना चिडचिड होते किंवा पटकन राग येतो त्यांनी टरबूज खावे, मानसिक विकारातही टरबूज अत्यंत गुणकारी आहे. 
कलिंगडाचा रस 

     कलिंगडाच्या रस सेवनाने पोटाचे विकार कमी होतात पित्ताचा दाह होत असेल तर रस घ्यावा, 
        मूत्राशय किंवा मूत्रपिंड  च्या विकारावर अत्यंत गुणकारी आहे 
 कलिंगडाच्या बिया 
कलिंगडाच्या बिया वर सुद्धा भरपूर संशोधन झाले आहे की कलिंगड च्या बियांचे चूर्ण अति रक्तदाबाच्या रुग्णास   दिल्यास त्याचा रक्त दाब आटोक्यात येतो, 
डोळ्यां साठी 
जीवनसत्व अ  भरपूर प्रमाणात असल्यामुळे  डोळ्यांसाठी हितकारक आहे. 
हृदयासाठी 
कलिंगड मधे पोट्यशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे  हृदय स्वस्थ राहते. 
टरबुजाचे जसे फायदे आहेत तसेच ते नुकसान दायक पण आहेत 
ज्यांना अस्थमा आहे,  एलर्जी, शिंका येण्याची समस्या आहे त्यांनी टरबूज खाऊ नये, दही खाल्ल्या नंतर लगेच कलिंगड खाऊ नये आणि मुख्य म्हणजे रिकाम्या पोटी पण खाऊ नये, आणि रात्री तर कलिंगड खाऊच  नये. 
आयुर्वेदा नुसार. टरबूज हे तृषा शमन  करणारे, शीतकारक, बलवर्धक, मधुर, पौष्टीक, पित्त नाशक आहे, 

Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन