गोमुखासन

           गोमुखासन 


गोमुख म्हणजे गाईचे तोंड या आसनात पायांची रचना गोमुखासारखी भासते व पावले तिच्या कानांप्रमाणे वाटतात म्हणून या आसनास गोमुखासन म्हणतात.


 दोन्ही पाय जमिनीवर नितंबाच्या बाजूस ठेवून शरीर स्थिर ठेवल्यास ते गोमुखाकृती भासते म्हणून त्याला गोमुखासन असे म्हणतात.


 कृती


 पाय लांब करून दंडासणात बसावे उजवा पाय डाव्या पायाखालून डावीकडे दुमडून त्याची टाच डाव्या नितंबा चिटकवून ठेवा आता डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या पाया वरून उजवीकडे नेऊन त्याची टाच  उजव्या नितंबाला चिटकवून ठेवा दोन्ही गुडघे एकमेकांवर येतील अशी पायांची रचना करा डावा हात वर करा व कोपऱ्यात वाकवून डोक्याच्या मागे पाठी कडे न्या डावे कोपर डोक्याच्या मागे वरच्या दिशेने राहील उजवा हात उजवीकडून पाठीकडे न्या व तळहात वर सरकवून शेवटी दोन्ही हातांची बोटे एकमेकांना पकडा. पाठीचा कणा ताठ ठेवा शरीर स्थिर ठेवा मन शांत ठेवा आणि समोर बघा व सावकाश डोळे मिटा श्वसन स्वाभाविक व शांतपणे चालू असू द्या.


 गोमुखासन अर्धा ते एक मिनिटापर्यंत करावे अधिक वेळही करता येते परंतु सुरुवातीला 15 15 सेकंद करावे हे आसन सोडताना आधी हात सोडून घ्या मग पाय दंडासणाच्या स्थितीत आणा आणि डावा पाय खाली व त्यावर उजवा पाय वर असे करून हाताची अदलाबदल करा म्हणजे उजवा हात वर व डावा हात मागे जाईल.


 गोमुखासनाचे फायदे 


 छातीच्या वरचा भाग खांदे मान व दंड यांच्या स्नायूंना ताणयुक्त व्यायाम मिळतो त्यामुळे  स्नायूंना विशेष बळकट येते हे आसन मानेच्या,पाठीच्या विकारांवर उपयुक्त आहे स्पोंडीलाइटिस मानेची दुखणे कमरेचे दुखणे पाठ दुखणे यावर हे आसन अत्यंत लाभदायक आहे मधुमेही रुग्णांसाठी हे आसन रामबाण आहे.


धन्यवाद


Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

incerase- milk-child-birth-: प्रसूती नंतर दूध वाढण्यासाठी