ऑक्टोबर हिट (October heat ) घ्या त्वचेची काळजी

     ऑक्टोबर हिट (October heat )

              घ्या त्वचेची काळजी 





उन्हाळा नसला तरी उन्हळ्याची जाणीव करुन देणारा महिना म्हणजे ऑक्टोबर. 

या दिवसात त्वचेचा ओलावा टिकून ठेवणे फार महत्वाचे आहे.दिवसा गरमी आणि रात्री थंडी,  या बदला मुळे  त्वचेवर पण विपरीत परिणाम होऊन त्वचा कोरडी पडायला सुरवात होते प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असल्यामुळे काहींची त्वचा कोरडी पडून त्वचेला खाज येऊन  त्यातून रक्त येण्यास सुरवात होते, काहींचे  डोक्याचे केस रुक्ष होऊन त्यात कोंडा (डँड्रफ )होतो आणि डोक्याला खाज सुटते. आणि डँड्रफ मुळे चेहऱ्यावर मुरूम पुटकुळ्या यायला सुरुवात होते. त्यासाठी या दिवसात त्वचेची योग्य ती काळजी घायला पाहिजे. 

त्वचेची आद्रता टिकून ठेवण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर थंड किंवा कोमट पाण्याचे चार पाच भपके मारावे. 

या दिवसात रासायनिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर शक्यतो कमी करावा.घरच्या घरी नैसर्गिक उपाय करावेत आणि जास्तीत जास्त मोसमी फळ भाज्यांचा, पालेभाज्यांचा  उपयोग करावा, जसे की टोमॅटो चा रस, गाजराचा रस, काकडीचा रस पालकाचा रस, बिट रस.याचा दोन्ही प्रकारे उपयोग करू शकता

            वरील फळांचा ज्युस पण   रोज आपल्या आहारात घ्या, 

         आपली त्वचा आपल्या शरीराच्या इतर भागांप्रमाणेच आतून बाहेरून देखील कार्य करते.  याचा अर्थ असा की आपण जे पदार्थ सेवन करतो तेच आपल्या शरीरावर व मनावर पण प्रभाव पाडतात.      अँटीऑक्सिडेंट्स, फायबर आणि चांगली चरबीयुक्त आहार आपल्या त्वचेची चमक वाढविण्यास मदत करतात   

        आपली त्वचा चमकदार करण्यासाठी आपण आपल्या आहारात  हिरव्या भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, फळे इत्यादी घेऊ शकता.


  तज्ञांच्या मते आपल्या त्वचेसाठी काही फळांच्या  बिया पण फायदेशीर असू शकतात   त्यात भोपळा,  टरबूज, आणि सूर्यफूल बिया  भाजून रोज सेवन केल्यास त्वचा निरोगी आणि टवटवीत राहते.

         घरगुती  उपचारांमध्ये चंदनाचा वापर बरेच वेळा  केला जातो .  फक्त त्वचेसाठीच नव्हे तर डोकेदुखी, ताणतणाव, दातदुखी इत्यादींसाठीही खूप फायदेशीर आहे. 

        तेलकर त्वचा असणाऱ्यांनी चरबी युक्त आणि तेलकट, तुपकट आहार कमी करावा. 

रोज नियमित 1 तरी आसन करावे किंवा सूर्यनमस्कार करावे. 

            त्वचा तेलकट असो रुक्ष असो वा सामान्य तिन्ही प्रकारच्या त्वचे साठी टोमॅटो रस उपयुक्त आहे, रोज जर चेहऱ्याला 1 चमचा टोमॅटो रस लावला तर मुरूम, उन्हामुळे झालेली डार्क त्वचा, डोळ्या खाली काळी वर्तुळे या समस्या पासुन मुक्ती मिळते. हा उपाय नियमित केला तरच फायदा होतो, बरेच जण 1,  2 दिवस करतात आणि मधेच सोडून देतात.

         बरेच जण आपली त्वचा गोरी करण्याच्या नादात महागडे रासायनिक सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग करतात. पण ते त्वचे साठी घातक असते..  चेहऱ्यावर जर हलकीशी smile जरी ठेवली तरी पण चेहरा प्रफुल्लित दिसतो. 

       ऑक्टोबर हिट या महिन्यात नियमित पणे पुरेसे पाणी प्या, वेळेवर जेवण, पुरेशी झोप घ्या 

        आनंदित रहा,  खुश रहा,  हसत रहा आणि मुख्य म्हणजे सुरक्षित रहा…….. 


Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन