जागतिक योग दिवस
जागतिक योग दिवस
आज जागतिक योग दिवस
योग ही भारतीयांना ऋषीमुनींनी दिलेली देणगी आहे. निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत थोडासा वेळ आपण आपल्या शरीरासाठी देणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम व योगासने,प्राणायाम यांचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. करिता प्रत्येकाने योगासने करणे गरजेचे आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. भारतीय धर्म संस्कृतीमधील “योग” संकल्पनेची मांडणी श्रीमदभगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. त्याच जोडीने भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे. जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने होते.
आंतरराष्ट्रीय योग दिवस हा २१ जूनला साजरा करण्यामागे वैज्ञानिक आणि पारंपरिक अशी दोन्हीही कारणे आहेत. खगोलशास्त्र असे सांगते की सूर्याच्या दोन स्थिती असतात. उत्तरायण आणि दक्षिणायन. जून महिन्याच्या २१ तारखेला सूर्य आपली स्थिती बदलतो म्हणजेच उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. हा एक नैसर्गिक बदल आहे. जेव्हा सूर्याचे दक्षिणायन सुरू होते तेव्हा सूर्याचा प्रकाश आणि उष्णता कमी होते. यामुळे वातावरणात बदल होऊ लागतो.याने अनेक रोगांचे आणि आजारांचे उगमस्थान असलेले जीवजंतू, सूक्ष्मजीव आपलं काम करायला सुरुवात करतात आणि माणसं आजारी पडण्याचे प्रमाण वाढायला सुरुवात होते.योगासनांचा आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो. यामुळे आपल्या शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी योगाभ्यास गरजेचा आहे. याच कारणाने या वातावरणीय बदलाचा पहिला दिवस हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून निवडण्यात आला.
आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जूनला साजरा केला जातो. तसेच हा दिवस वर्षातील सर्वांत मोठा दिवस असतो आणि योगासने ही माणसाला दीर्घायुष्याचा लाभ मिळवून देऊ शकतात अशी धारणा आणि विश्वास असल्याने हा दिवस योग दिवस म्हणून निवडला गेला.
निरोगी राहण्यासाठी करा हे आसन!!!
नमस्कारासन
नमस्कार मुद्रा )- हे आसन योगाच्या सुरुवातीला केले जाते. या मध्ये सरळ उभारून हात जोडतात ही मुद्रा प्रार्थनेची आहे.
वज्रासन
या योग मध्ये पाय दुमडून गुडघ्यावर बसतात. हे आसन पाठीच्या कामासाठी फायदेशीर आहे.
अर्ध चन्द्रासन
या आसनात शरीराला अर्धचन्द्रा प्रमाणे फिरवतात.
नटराजासन
हे आसन उभारून केले जाते. या आसनामुळे खान्दे आणि फुफ्फुस बळकट होतात.
गोमुखासन
हे आसन बसून केले जाते .शरीराला व्यवस्थित आकार देण्यासाठी हे आसन केले जाते.
योग मुद्रासन
हे आसन केल्याने मानसिक बळ आणि तणावापासून मुक्ती मिळते. हे आसन बसून केले जाते.
सर्वांगासन
या आसनामध्ये झोपून पायाला वर उचलतात पायात आणि पोटाच्या मध्य 90 अंशाचा कोण बनतो. शारीरिक दृष्टया मजबूती येते.शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत होतो.
ताडासन
हे आसन सरळ उभे राहून केले जाते. पायाच्या बोटांवर उभे राहून हे आसन केले जाते. हे आसन पाठीच्या कणासाठी फायदेशीर आहे. उंची वाढण्यासाठी हे आसन फायदेशीर आहे.
शवासन
या आसनामध्ये झोपतात हळुवार श्वास घेण्याची प्रक्रिया केली जाते. मन शांत आणि एकाग्रता वाढण्यासाठी हे आसन केले जाते.
*योगा अँड नॅचरो ब्यूटी क्लिनिक"*
सन 2006 पासून योगा प्रशिक्षणाचे धडे देत आहे. "योगा अँड नॅचरो ब्यूटी क्लिनिक" अकोला, या सेंटरमध्ये सहा वर्षाच्या बालकापासून ते 90 वर्षाच्या वृद्धांपर्यंत योगाचे प्रात्यक्षिक दिले जाते .यामध्ये साधारणतः मधुमेह, लठ्ठपणा ,सांधे दुखी, गुडघे दुखी ,कंबरदुखी, अर्धशिशी(मायग्रेन) यासारख्या आजारांवर उपचार केले जातात. त्याचप्रमाणे चेहऱ्यावर मुरूम ,फुटकळ्या होऊ नये म्हणून योगाच्या माध्यमातून उपचार केले जातात. योग ही भारतीयांना ऋषी-मुनींनी दिलेली देणगी आहे. युवक-युवती महिला व बालकांनी रोज योगासने करावी त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वृद्धिंगत होते.
सर्वांना जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Comments
Post a Comment