पुदिना रस फायदे

       पुदिना रस फायदे
 पुदिन्याची पाने स्वच्छ धुऊन त्याचा वाटून किंवा मिक्सर मधुन रस काढून एक चमचा रस ऐक कप पाण्यामध्ये घ्यावा याने अजीर्ण होणे,तोंडाला चव नसणे,भूक न लागणे गॅसेस इत्यादी विकारावर हा रस उपयुक्त आहे.

 रोज सकाळी एक कप पाण्यामध्ये ऐक चमचा रस मिसळून तसेच एक चमचा मध टाकून घेता येतो. 

पुदिन्यामधे विटामिन ए बी सी डी आणि ई भरपूर प्रमाणात आहे.
शिवाय कॅल्शियम फॉस्फरस लोह हे क्षार आहेत.

 पुदिन्याचा आणि आल्याचा रस एकत्र घेऊन पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

 अतिसार झाल्यास दर एक एक तासाने पुदिन्याचा रस घ्यावा.

 पुदिन्याचा रस आल टाकून रोज घेतल्यास पचनक्रिया सुधारते म्हणून रोज दैनंदिन जीवनामध्ये अधून मधून पुदिन्याची चटणी आहारात असावी.

 वारंवार सर्दी पडसे कफ होत असेल तर पुदिन्याचा रस किंवा चटणी खावी.

 दमा आणि खोकला किंवा कफ या विकारांमध्ये पुदिन्याचा रस फार गुणकारी आहे

 पोटात कृमी झाल्यास लहान मुलांना पाण्यामधून पुदिन्याचा रस द्यावा.

 उन्हाळ्यामध्ये पुदिन्याची चटणी करून खावी.

 पुदिन्याच्या चटणी मध्ये कच्ची कैरी टाकून त्याची चटणी केल्यास उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा मिळतो.

धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता का वाढते – थंडावा टिकवण्यासाठी आहार-विहार कसा असावा?

incerase- milk-child-birth-: प्रसूती नंतर दूध वाढण्यासाठी

केस गळणे थांबवण्यासाठी 10 प्रभावी उपाय