व्हेरिकोज वेन्स : संपूर्ण माहिती आहार विहार योगासन प्राणायाम
व्हेरिकोज वेन्स : संपूर्ण माहिती आहार विहार योगासन प्राणायाम
आजकाल अनेक लोकांना पाय दुखणे, सूज येणे किंवा निळसर शिरा दिसण्याची समस्या जाणवते. हीच समस्या व्हेरिकोज वेन्स म्हणून ओळखली जाते. योग्य वेळी काळजी घेतल्यास ही समस्या नियंत्रणात ठेवता येते.
व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय?
पायातील शिरांमधील झडपा (valves) कमजोर झाल्यामुळे रक्त खाली साचते. त्यामुळे शिरा फुगतात, वाकड्या दिसतात आणि वेदना होतात. या स्थितीला व्हेरिकोज वेन्स म्हणतात.
व्हेरिकोज वेन्स होण्याची कारणे
खूप वेळ उभे राहणे किंवा बसणे
व्यायामाचा अभाव
लठ्ठपणा
गर्भधारणा
वाढते वय
बद्धकोष्ठता
आनुवंशिक कारणे
व्हेरिकोज वेन्सची लक्षणे
पाय जड वाटणे
सूज येणे
पायाला रात्री गोळे येणे
शिरा स्पष्ट दिसणे
खाज किंवा जळजळ
चालताना वेदना
व्हेरिकोज वेन्ससाठी योग्य आहार
हिरव्या पालेभाज्या
मोड आलेले डाळी व कडधान्ये
लिंबू, संत्री, आवळा
सफरचंद, डाळिंब
ओट्स, ब्राउन राईस
भरपूर पाणी पिणे
टाळावयाचे पदार्थ
जास्त मीठ
तळलेले पदार्थ
जंक फूड
जास्त साखर
मद्यपान
व्हेरिकोज वेन्ससाठी उपयुक्त योगासन
1. पाय वर उचलण्याचा व्यायाम
भिंतीला पाय टेकवून 10–15 मिनिटे झोपा
रक्तप्रवाह सुधारतो
2. विपरीत करणी आसन
पाय वर, शरीर खाली
शिरांवरील दाब कमी होतो
पाठीवर उताणे झोपावे हात सरळ शरीरापाशी तळहात जमिनीकडे ठेवावे दोन्ही पाय न वाकविता एकत्रितपणे सरळ वर उचलावे 90 अंशापर्यंत पोहोचत असतानाच तळ हातांनी जमिनीचा आधार घेऊन कंबरही वर उचलावी व हाताचे पंजे नितंब व कंबर यामधील प्रदेशावर लावून हाताने आधार द्यावा कोपर पसरवू नये पाया किंचित डोक्याकडे झुकलेले असावे म्हणजे कमरेचा पायाचा भार हातावर न येता त्यामुळे आसन बराच वेळ सहजतेने स्थिरतेने करता येते धड देखील जमिनीपासून तिरपे राहते मानेवर ताण येत नाही सुरुवातीला पाच ते दहा सेकंद थांबावे मग या अभ्यासाने आसनाच्या अंतिम स्थितीत एक ते तीन मिनिटापर्यंत राहता येते आसनाच्या अंतिम स्थितीत स्थिर राहावे व श्वसन स्वाभाविकपणे चालू द्यावे आसन सोडताना पाय आणखी थोडे डोक्याखाली आणावे म्हणजे तोल सांभाळून दोन्ही हात सरळ जमिनीवर ठेवता येतील आता प्रथम कंबर सावकाश खाली आणावी नितंब जमिनीवर टेकल्यावर पाय खाली आणावेत असं करून झाल्यावर पाय पसरून हात उताणे ठेवून डोळे मिटून थोडी विश्रांती घ्यावी.
3. पवनमुक्तासन
पचन सुधारते
कब्ज कमी होते
4. भुजंगासन
रक्ताभिसरण वाढते
पाय मजबूत होतात
भुजंग म्हणजे नाग या आसनाची अंतिम स्थितीत शरीराचा आकार फणा असलेल्या नागाप्रमाणे भासतो म्हणून या आसनास भुजंगासन असे म्हणतात. जमिनीवर अंथरलेल्या आसनावर पोटावर झोपावे पाय एकमेकांना जुळवून ठेवावे पायांचे अंगठे एकमेकांना लागून ठेवावे व तळवे आकाशाकडे असावे आता कपाळ जमिनीवर ठेवा व हाताचे पंजा छातीच्या बाजूला जमिनीवर खांद्याच्या बरोबर खाली येतील असे ठेवा म्हणजे हाताची कोपर वर उचलली जातात हात शरीरास चिटकून असू द्यावे आता सावकाश जमिनीला लागूनच हनवटी समोर न्या व संपूर्ण समोर गेल्यावर डोके जमिनीवर उचलून सावकाश वर वर बघत डोके छाती वर उचला म्हणजे मेरुदंड मागे वळतो नाभी व त्याखाली शरीराचा भाग जमिनीवर असतो पाय ढीले ठेवा व हाताच्या पंजावर फार भार देऊ नका या अंतिम स्थिती 10 ते 20 सेकंद हॆ आसन स्थिर राहून आसन सोडावे सर्वात शेवटी पुन्हा कपाळ जमिनीला स्पर्श करत काही सेकंद थांबून हे आसन दुसऱ्यांदा करता येईल.
5. अनुलोम-विलोम प्राणायाम
तणाव कमी
रक्तशुद्धी
दैनंदिन काळजी
पाय उंचावर ठेवून विश्रांती घ्या
घट्ट कपडे टाळा
रोज चालण्याचा व्यायाम करा
वजन नियंत्रणात ठेवा
डॉक्टरांच्या सल्ल्याने compression stockings वापरा
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
तीव्र वेदना
पायांवर जखमा
सूज खूप वाढणे
रक्तस्त्राव
प्रश्न 1 व्हेरीकोज व्हेन्स धोकादायक विकार आहे का?
सुरुवातीला नाही, पण दुर्लक्ष केल्यास त्रास वाढू शकतो.
प्रश्न 2 नियमित योगासन किंवा प्राणायाम केल्याने व्हेरीकोज व्हेन्स बरा होऊ शकतो का?
पूर्ण बरा होत नाही, पण नियंत्रणात राहतो
प्रश्न 3 व्हेरेकोज व्हेन्स या विकारात मी चालू शकते का? या साठी चालणे फायदेशीर आहे का?
हो, रोज 20–30 मिनिटे चालणे उपयुक्त.
प्रश्न 4 व्हेरीकोज व्हेन्स मध्ये घरगुती उपाय आहेत का?
आहार व जीवनशैली सुधारल्यास नक्की फायदा होतो.
धन्यवाद🙏🏻🌹🙏🏻
Yoga and Naturo Beauty Clinic
9822363909
Comments
Post a Comment