लठ्ठपणा कसा कमी करावा? वजन कमी करण्यासाठी 7 दिवसांचा डाएट प्लॅन
लठ्ठपणा कसा कमी करावा? वजन कमी करण्यासाठी 7 दिवसांचा डाएट प्लॅन
लठ्ठपणा कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय, योग्य डाएट आणि व्यायाम. महिलांसाठी व पुरुषांसाठी वजन कमी करण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन
आजकाल बदललेली जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि ताणतणाव यामुळे लठ्ठपणा (Obesity) ही मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, सांधेदुखी असे अनेक आजार होऊ शकतात.
आजच्या लेखात आपण लठ्ठपणा नैसर्गिक पद्धतीने कसा कमी करावा हे सविस्तर पाहणार आहोत.
लठ्ठपणा वाढण्याची कारणे
जास्त तेलकट व गोड अन्न
व्यायामाचा अभाव
उशिरा झोपणे
ताणतणाव (Stress)
हार्मोनल असंतुलन
फास्ट फूड आणि कोल्ड ड्रिंक्स
लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहार (Diet for Weight Loss)
सकाळचा आहार
उठल्यावर कोमट पाणी पिणे
लिंबू पाणी (हवे असल्यास थोडं मध टाकू शकता)
ओट्स / पोहे / उपमा (कमी तेलात करावा)
फळं – सफरचंद, पपई, संत्री
दुपारचे जेवण
1–2 ज्वारी/बाजरी/नाचणीची पोळी
भाजी (हिरव्या भाज्या)
डाळ / उसळ
ताक (साखर न घालता)
संध्याकाळचा आहार
भाजलेले चणे किंवा मुरमुरे
ग्रीन टी किंवा लिंबू पाणी
रात्रीचे जेवण
हलके जेवण
सूप / भाजी + 1 पोळी
शक्य असल्यास जेवण 7–8 वाजेच्या आत करावे
वजन कमी करण्यासाठी कोणते पदार्थ टाळावेत?
मैदा आणि बेकरी पदार्थ
तळलेले पदार्थ
फास्ट फूड
जास्त गोड पदार्थ
कोल्ड ड्रिंक्स
व्यायाम आणि योगासन करणे अत्यंत महत्वाचे आहे
रोज 30–45 मिनिटे चालणे
सूर्यनमस्कार (5–10 राऊंड)
प्राणायाम – कपालभाती अनुलोम-विलोम
जिने चढणे, घरकाम
वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय
दिवसभर कोमट पाणी प्या
जेवणानंतर त्रिफळा चूर्ण (डॉक्टरांच्या सल्ल्याने)
हिरवा चहा
रात्री लवकर झोपणे
लठ्ठपणा कमी करताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी
वजन हळूहळू कमी होते
सातत्य ठेवा
पुरेशी झोप घ्या
ताण कमी ठेवा
लठ्ठपणा कमी करण्याचे फायदे
शरीर हलके वाटते
आजारांचा धोका कमी होतो
आत्मविश्वास वाढतो
त्वचा व केस सुधारतात
निष्कर्ष
लठ्ठपणा कमी करणे कठीण नाही, पण नियमित आहार, व्यायाम आणि संयम आवश्यक आहे. नैसर्गिक पद्धतीने वजन कमी केल्यास ते टिकून राहते आणि आरोग्य सुधारते.
वजन कमी करण्यासाठी 7 दिवसांचा Diet Chart (मराठी)
⚠️ सूचना: हा सामान्य मार्गदर्शक चार्ट आहे. कोणताही आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
दिवस 1
सकाळी उठल्यावर:
1 ग्लास कोमट पाणी + लिंबू
नाश्ता:
पोहे (कमी तेलात) + 1 फळ
दुपारचे जेवण:
2 ज्वारीच्या भाकरी किंवा फुलके किंवा पोळ्या
भाजी + वरण
ताक
संध्याकाळी
मुरमुरे / भाजलेले चणे
रात्रीचे जेवण:
भाजी + 1 पोळी
दिवस 2
सकाळी:
कोमट पाणी + मध
नाश्ता:
ओट्स + फळ
दुपारचे जेवण:
2 बाजरी पोळ्या
उसळ + भाजी
ताक
संध्याकाळी
ग्रीन टी
रात्री:
भाजी सूप / डाळ सूप
दिवस 3
सकाळी:
कोमट पाणी
नाश्ता:
इडली (2) + सांबार
दुपारचे जेवण:
1 वाटी भात
डाळ + भाजी
कोशिंबीर
संध्याकाळी:
1फळ
रात्री:
भाजी + 1 पोळी
दिवस 4
सकाळी:
लिंबू पाणी
नाश्ता:
उपमा (कमी तेलात)
दुपारचे जेवण:
2 ज्वारीच्या भाकरी 2 पोळ्या किंवा फुलके
भाजी + उसळ
ताक
संध्याकाळी:
भाजलेले चणे
रात्री:
सूप + सलाड
दिवस 5
सकाळी:
कोमट पाणी + मध
नाश्ता:
अंकुरित मूग उसळ
दुपारचे जेवण:
2 बाजरीच्या भाकरी किंवा पोळ्या
डाळ + भाजी
संध्याकाळी:
नारळ पाणी
रात्री:
भाजी + 1 पोळी
दिवस 6
सकाळी:
कोमट पाणी
नाश्ता:
ढोकळा 2 पीस
दुपारचे जेवण:
1 वाटी भात
आमटी + भाजी
कोशिंबीर
संध्याकाळी:
फळ / ग्रीन टी
रात्री:
सूप
दिवस 7
सकाळी:
लिंबू पाणी
नाश्ता:
भाजी ऑम्लेट / बेसन चिल्ला
दुपारचे जेवण:
2 ज्वारी पोळ्या
भाजी + डाळ
ताक
संध्याकाळी:
मुरमुरे
रात्री:
हलके जेवण (भाजी + 1 पोळी)
तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर msg करा
Qus- 1 लठ्ठपणा कमी होण्यासाठी किती महिने लागतात?
उत्तर: योग्य आहार व व्यायाम केल्यास 2-3 महिन्यांत फरक दिसतो.
Qus-2 घरच्या घरी वजन कमी करता येते का? किंवा मी जिम व योगा class लावून वजन कमी करू शकतो का?
उत्तर: हो, योग्य डाएट आणि चालणे योगासन या द्वारे वजन कमी करणे शक्य आहे.
Qus-3 महिलांसाठी वजन कमी करण्याचे उपाय वेगळे आहे का?
उत्तर: हो महिलांसाठी हार्मोनल बदल लक्षात घेऊन सौम्य व्यायाम उपयुक्त ठरतो.
धन्यवाद 🙏🏻🌹🙏🏻
Yoga and Naturo beauty clinic
9822363909
Comments
Post a Comment