उष्ट्रासन

              उष्ट्रासन 



उष्ट्र म्हणजे उंट या आसनात शरीराचा आकार उंटा सारखा दिसतो म्हणून या आसनास उष्ट्रासन असे म्हणतात.


 प्रथम गुडघ्यावर उभे राहावे त्यासाठी दोन्ही पायांमध्ये सहा ते नऊ इंच अंतर ठेवावे,हात मागे नेऊन तळहात पायांचे टाचांवर ठेवावे आणि कमरेवर हात ठेवून मागच्या बाजूने झुकावे आणि थोडेसे वाकावे डोके ढिले सोडावे आणि श्वास संथपणे चालू ठेवावा व 15 ते 30 सेकंद या आसनामध्ये राहावे आणि हळूहळू हे आसन सोडावे हे असन तुम्ही एक मिनिट किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ करू शकता आसन सोडताना कटी प्रदेश पुन्हा मागे आणावा व एकेक हात टाचेवरून उचलून पुन्हा गुडघ्यावर उभे राहावे आणि थोडावेळ वज्रासनात बसून पाठीवर पडून विश्रांती घ्यावी


आसनाचे लाभ


उष्ट्रासनामध्ये मांड्यांचे स्नायू समोरून चांगले ताणले जातात व हा ताण गुडघ्याच्या आसपास अधिक पोहोचतो त्यामुळे मांड्या सुडोल व ताकदवान बनतात तसेच गुडघ्यांचेही आरोग्य उत्तम राहते कमरेचे स्नायू बलवान होतात व पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते तसेच मानेचा त्रास होत नाही कारण  नैसर्गिक रित्या मानेला ताण दिला जातो.

पोटावरील आणि कमरेवरील चरबी कमी होते तसेच बद्धकोष्ठता दूर होण्यास आणि पचन संस्थेचे कार्य उत्तम रीतीने चालण्यास मदत होते स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात तसेच ओटी पोटाच्या तक्रारी सुद्धा दूर होतात आणि दिवसभर उत्साह टिकून राहतो श्वसनाचे विकार जसे दमा खोकला व थायराइड यासारखे विकार दूर होण्यास मदत होते. तसेच खांदे आणि दंड ही सशक्त होतात.


Comments

Popular posts from this blog

1 week diet plan for weight loss लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

उन्हाळ्यात शरीरातील उष्णता का वाढते – थंडावा टिकवण्यासाठी आहार-विहार कसा असावा?

incerase- milk-child-birth-: प्रसूती नंतर दूध वाढण्यासाठी