गव्हाच्या रोपांचा रस (गव्हांकुर) घेण्याचे फायदे (Wheatgrass Juice)
गव्हाच्या रोपांचा रस (गव्हांकुर) घेण्याचे फायदे
(Wheatgrass Juice)
गहू रसाचा शोध अमेरिकेतील लेडी विगमोर यांनी लावला, हा रस उत्तम टॉनिक असून सर्व शारीरिक व मानसिक विकरावर रामबाण औषध आहे. तज्ञाच्या मते जेव्हा कोणत्याही औषधाचा उपयोग होत नाही त्यावेळी
गहू रोप रस असाध्य रोगावर उत्तम काम करतो.
गव्हांकुर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, ज्यामुळे ऊर्जा मिळते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, वजन कमी होते, त्वचा सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे ॲनिमिया, बद्धकोष्ठता, सांधेदुखी, आणि पोटाच्या विकारांवर आराम मिळतो. हे 'हिरवे रक्त' म्हणून ओळखले जाते आणि अनेक आजारांवर नैसर्गिक उपाय म्हणून वापरले जाते.
गव्हांकुर रसाचे फायदे
ऊर्जा आणि ताकद: दिवसभरासाठी ऊर्जा मिळते आणि उत्साह वाढतो.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि संक्रमणांपासून बचाव करते.
लठ्ठपणा कमी करते
फायबर जास्त असल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि वजन नियंत्रणात राहते.तसेच त्वचा चमकदार होते, त्वचेवरील डाग कमी होतात आणि केसांचे आरोग्य सुधारते जसे की, केसात कोंडा होणे उवा लिखा, केस कोरडे होणे, किंवा अति तेलकट केस असणे
शरीर डिटॉक्स:
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.
ब्लड प्रेशर
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
रक्ताची कमतरता
ॲनिमिया (रक्ताची कमतरता) दूर करते आणि हिमोग्लोबिन वाढवते.
तसेच बद्धकोष्ठता, गॅस यांसारख्या पोटाच्या समस्या दूर करते आणि पचनक्रिया सुधारते.
सांधेदुखी
सांधेदुखी आणि हाडांच्या कमजोरीवर आराम मिळतो.
कर्करोग (Cancer)
कर्करोगाच्या पेशी कमी करण्यास मदत करू शकते
H
गहू रोप रस कसा करावा
रोज ऐक कुंडीत मातीमध्ये गहू पेरावे अश्या 7 कुंड्या कराव्या ८-१० दिवसांत उगवलेले गव्हांकुर (गव्हाचे कोंब) तोडून घ्या
त्यांना स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून बारीक वाटून घ्या.
हा रस सकाळी रिकाम्या पोटी घेणे फायदेशीर ठरते.
गहू रोप रस सेवनाने सुरुवातीला गॅसेस होतात, मळमळते डोकेदुखते कारण हा रस आधी शरीरातील विजातीय पदार्थांना बाहेर काढतो
आरोग्य साधना योग अँड naturopathy क्लिनिक
Comments
Post a Comment