त्रिकोणासनाचे आश्चर्यकारक फायदे: वजन कमी करण्यापासून ते ताणतणावापासून मुक्तीपर्यंत
त्रिकोणासनाचे आश्चर्यकारक फायदे: वजन कमी करण्यापासून ते ताणतणावापासून मुक्तीपर्यंत
संग्रहित छायचित्र
त्रिकोणासन १
पद्धत
दोन्ही पायात २-३ फूट अंतरावर ठेवून सरळ उभे राहा. दोन्ही हात खांद्याच्या उंचीपर्यंत सरळ ठेवा. गुडघे थोडेसे वाकवा आणि शरीर उजवीकडे वाकवा व दोन्ही हात सरळ ठेवून उभे राहा. तुमच्या शरीराच्या दुसऱ्या बाजूलाही हे करा.
श्वास घेणे
हात वर करून सरळ उभे राहून श्वास घ्या. तुमच्या बाजूला वाकून श्वास सोडा.
त्रिकोणासन २
पद्धत
पहिल्या स्थितीत पुनरावृत्ती करा, परंतु शेवटच्या स्थितीत, तुमचा वर केलेला हात तुमच्या कानाच्या वरून जमिनीला समांतर येईपर्यंत खाली करा.
श्वास घेणे
पहिल्या स्थितीत जसे आहे तसेच राहा
त्रिकोणासनाचे फायदे
जसे की शरीराची लवचिकता वाढवणते, मांड्या, गुडघे, घोटे आणि खांदे मजबूत करते पचन सुधारते तणाव आणि पाठदुखी कमी करते संतुलन वाढवणे आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करणे, ज्यामुळे संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे एक उत्तम आसन आहे.
शारीरिक फायदे
त्रिकोणासन रोज केल्याने स्नायू बळकट होतात तसेच मांड्या, गुडघे, घोटे, खांदे, छाती आणि पाठीचे स्नायू बळकट करते.
लवचिकता वाढवते
पाठीचा कणा आणि खांद्यांना ताण देते, ज्यामुळे लवचिकता वाढते.व कंबरेचे आणि पाठीची दुखणे दूर होते.
संतुलन सुधारते: शरीराचे संतुलन राखण्यास मदत करते आणि स्थिरता वाढवते.
पचन सुधारते
त्रिकोणासन हॆ ऐक असे आसन आहे ज्याने पोटाचे स्नायू बळकट होतात व पोटाच्या अवयवांना उत्तेजित करते, ज्यामुळे पचनक्रिया आणि चयापचय सुधारते.
त्रिकोणासनाने पाठदुखी कमी होण्यास मदत होते आणि पाठीचा कणा सरळ ठेवण्यास मदत करते.
कंबर आणि पोटाची चरबी कमी करते: कंबरेवरील चरबी कमी करण्यास मदत करू शकते.
वेदना कमी करते तसेच सायटिका (Sciatica) आणि पाठदुखीसारख्या गंभीत समस्यांमध्ये आराम मिळतो
त्रिकोणासनाने तणाव आणि चिंता कमी होते तसेच भावनिक संतुलन राखण्यास मदत होते व मन आणि शरीराला स्थिर ठेवण्यास मदत करते.
स्त्रियांनी त्रिकोणासन अगदी रोज करावे स्त्रियाच्या सर्व समस्यानावर रामबाण उपाय आहे जसे की मासिक पाळीतील सर्व दुखणी, पाठ दुखणे पोट दुखणे पायात वेदना स्तन दुखणे या सर्व समस्या दूर होतात.
रजोनिवृत्तीच्या लक्षणांमध्ये मदत होते.
त्रिकोणासनाचे फायदे
त्रिकोणासन केल्याने मांड्याची स्नायू ताणले जातात हातावर विशेष भार पडतो पाठीचा कणा पूर्णपणे वाकविला जातो या आसनाने मांड्या सुडोल व सशक्त होता पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते ओटीपोटावर ताण पडतो त्यामुळे बद्धकोष्ठता वगैरे विकार होत नाही छाती व डोक्याकडे रक्ताचा पुरवठा वाढतो हे आसन केल्याने ताजेतवाने व प्रसन्न वाटे आत्मविश्वास वाढतो फुफ्फुसाची क्षमता व रोगप्रतिकारक शक्ती वाढते
मेरुदंड बरोबर एकेका बाजूला वाकवल्या जातो व विरुद्ध दिशेने ताण पडतो व ती बाजू खेचली जाते या तऱ्हेने हालचालीमुळे पाठीचा कणा लवचिक व मजबूत राहतो पाठीच्या कण्याचे दुखणे तसेच बसण्याच्या चुकीच्या सवयीमुळे पाठीच्या करण्यात तीव्र वेदना होतात या सारखे दोष उत्पन्न झाले असल्यास ते बऱ्याच अंशी दुरुस्त करता येतात पोटाच्या कडेला बाजूला चरबी साठवून वळ्या पडत नाहीत छाती कडचा रक्तपुरवठा वाढून छातीला लागणाऱ्या ताणामुळे फुफुसाची क्षमता वाढते व मानसिक संतुलन वाढते.
मांड्यांची चरबी कमी होते, कंबर नाजूक आणि सुडोल राहते, तसेच पायाचे व हाताचे दुखणे कमी होते.
लेख आवडल्यास कंमेंट करा
धन्यवाद
🙏🏻🌹🙏🏻
Comments
Post a Comment