भुलाबाईचे गाणे पौर्णिमेच पडलं चांदणं

            भुलबाईचे गाणे

        पौर्णिमेच पडलं चांदणं
         भुलाबाईला आलं मागणं




पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं
आईच एक सांगणं
सासूशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं….
बाबांचं एक सांगणं
सासऱ्याशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
भावाचं एक सांगणं
दिराशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
बहिणीचं एक सांगणं
नणंदेशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
आजीच एक सांगणं
नवऱ्याशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
आजोबांचं एक सांगणं
साऱ्यांशी नीट वागणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…
सर्वांचं एक सांगणं
माहेरचं नाव काढणं
पौर्णिमेच पडलं चांदणं
भुलाबाईला आलं मागणं…


गाण्याचा व्हिडिओ बघण्यासाठी
click करा 👇


Comments

Popular posts from this blog

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

1 week diet plan for weight loss लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा