भुलाबाईची गाणी (यादवराया राणी घरास येईना कैसी)

            भुलाबाईची गाणी

   (यादवराया राणी घरास येईना कैसी)



यादवराया राणी घरास येईना कैसी

सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

सासूबाई गेल्या समजावयाला

चल चल सूनबाई अपुल्या घराला

पाटल्याचा जोड देते तुजला

मी नाही यायची अपुल्या घराला

यादवराया राणी घरास येईना कैसी

सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

सासरे गेले समजावयाला

चल चल सूनबाई अपुल्या घराला

तिजोरीची चावी देतो तुजला

मी नाही यायची अपुल्या घराला.

यादवराया राणी घरास येईना कैसी

सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

दीर गेले समजावयाला

चला चला वहिनी अपुल्या घराला

नवीन कपाट देतो तुम्हाला

मी नाही यायची अपुल्या घराला.

यादवराया राणी घरास येईना कैसी

सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

जाऊ गेली समजावयाला

चला चला जाऊबाई अपुल्या घराला

जरीची साडी देते तुम्हाला

मी नाही यायची अपुल्या घराला.

यादवराया राणी घरास येईना कैसी

सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

नणंद गेली समजावयाला

चल चल वहिनी अपुल्या घराला

चांदीचा मेखला देते तुजला

मी नाही यायची अपुल्या घराला.

यादवराया राणी घरास येईना कैसी

सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

पती गेला समजावयाला

चल चल राणी अपुल्या घराला

लाल चाबूक देतो तुजला

मी येते अपुल्या घराला

यादवराया राणी घरास आली कैसी

सासूरवाशीण सून घरास आली कैसी

गाण्याचा व्हिडिओ बघण्यासाठी
 click kara👇


Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन