Posts

Showing posts from October, 2022

भुलाबाईची गाणी उभ गंध विष्णु जसे

Image
                भुलाबाईची गाणी          भुलाबाई भुलाबाई सासरे कसे भुलाबाई भुलाबाई सासरे कसे, सासरे कसे? उभ गंध विष्णू जसे विष्णू जसे… भुलाबाई भुलाबाई सासू कशी सासू कशी कमळातून निघाली लक्ष्मी जशी लक्ष्मी जशी… भुलाबाई भुलाबाई नणंद कशी नणंद कशी हातात तलवार देवी जशी देवी जशी… भुलाबाई भुलाबाई दीर कसे दीर कसे हातात मुरली कृष्ण जसे कृष्ण जसे… भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी जाऊ कशी कृष्णच्या मांडीवर राधा जशी राधा जशी… भुलाबाई भुलाबाई पती कसे पती कसे जटेतून गंगा शंकर जसे शंकर जसे… भुलाबाई भुलाबाई आपण कशा आपण कशा  शंकराच्या मांडीवर पार्वती जशा पार्वती जशा… भुलाबाई भुलाबाई मुल कस मुल कस वाकडी सोंड गणपती जस गणपती जस… Video बघण्यासाठी click करा👇 https://youtu.be/2GOzhVQXavE भुलाबाईची गाणी

भुलाबाईची गाणी एके दिवशी काऊ आला बाई

Image
                  भुलाबाईची गाणी               एके दिवशी काऊ आला नदीच्या काठी राळा पेरला बाई राळा पेरला एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला एकच कणीस तोडून नेल बाई तोडून नेल सईच्या अंगणात टाकून दिल बाई टाकून दिल सईन उचलून घरात नेल बाई घरात नेल कांडून कुंडून राळा केला बाई राळा केला राळा घेऊन बाजारात गेली बाई बाजारात गेली चार पैशाची घागर आणली बाई घागर आणली घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली मधल्या बोटाला विंचू चावला बाई विंचू चावला आला गं सासरचा वैद्दय हातात काठी जळक लाकूड पायात जोडा फाटका तुटका नेसायचं धोतर फाटक तुटक अंगात सदरा मळलेला डोक्यात टोपी फाटकी तुटकी तोंडात विडा शेणाचा कसा गं दिसतो बाई म्हायरावाणी गं बाई म्हायरावाणी आला गं माहेरचा वैद्दय हातात काठी पंचरंगी पायात जोडा पुण्यशाई नेसायचं धोतर जरीकाठी अंगात सदरा मलमलचा डोक्यात टोपी भरजरी तोंडात विडा लालेला कसा गं दिसतो बाई राजावाणी गं बाई राजावाणी  Video बघण्यासाठी Click kara👇 भुलाबाईची गाणी एके दिवशी काऊ आला बाई

भुलाबाईची गाणी कृष्णा घालितो लोळणं

Image
              भुलाबाईची गाणी कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून || धृ || काय रे मागतोस बाळा, तुला देते मी आणून आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून...||धृ|| आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून....||२|| आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करून असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून...||३|| गाण्याचा व्हिडिओ बघण्यासाठी Click करा 👇 भुलाबाईची गाणी

भुलाबाईची गाणी (यादवराया राणी घरास येईना कैसी)

Image
            भुलाबाईची गाणी    (यादवराया राणी घरास येईना कैसी) यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी सासूबाई गेल्या समजावयाला चल चल सूनबाई अपुल्या घराला पाटल्याचा जोड देते तुजला मी नाही यायची अपुल्या घराला यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी सासरे गेले समजावयाला चल चल सूनबाई अपुल्या घराला तिजोरीची चावी देतो तुजला मी नाही यायची अपुल्या घराला. यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी दीर गेले समजावयाला चला चला वहिनी अपुल्या घराला नवीन कपाट देतो तुम्हाला मी नाही यायची अपुल्या घराला. यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी जाऊ गेली समजावयाला चला चला जाऊबाई अपुल्या घराला जरीची साडी देते तुम्हाला मी नाही यायची अपुल्या घराला. यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी नणंद गेली समजावयाला चल चल वहिनी अपुल्या घराला चांदीचा मेखला देते तुजला मी नाही यायची अपुल्या घराला. यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी पती गेला समज...

भुलाबाईचे गाणे पौर्णिमेच पडलं चांदणं

Image
            भुलबाईचे गाणे          पौर्णिमेच पडलं चांदणं          भुलाबाईला आलं मागणं पौर्णिमेच पडलं चांदणं भुलाबाईला आलं मागणं आईच एक सांगणं सासूशी नीट वागणं पौर्णिमेच पडलं चांदणं भुलाबाईला आलं मागणं…. बाबांचं एक सांगणं सासऱ्याशी नीट वागणं पौर्णिमेच पडलं चांदणं भुलाबाईला आलं मागणं… भावाचं एक सांगणं दिराशी नीट वागणं पौर्णिमेच पडलं चांदणं भुलाबाईला आलं मागणं… बहिणीचं एक सांगणं नणंदेशी नीट वागणं पौर्णिमेच पडलं चांदणं भुलाबाईला आलं मागणं… आजीच एक सांगणं नवऱ्याशी नीट वागणं पौर्णिमेच पडलं चांदणं भुलाबाईला आलं मागणं… आजोबांचं एक सांगणं साऱ्यांशी नीट वागणं पौर्णिमेच पडलं चांदणं भुलाबाईला आलं मागणं… सर्वांचं एक सांगणं माहेरचं नाव काढणं पौर्णिमेच पडलं चांदणं भुलाबाईला आलं मागणं… गाण्याचा व्हिडिओ बघण्यासाठी click करा 👇 भुलाबाईची गाणी संग्रह

भुलाबाईची गाणी, यादवराया राणी रुसून बैसली कैसी

Image
              भुलाबाईची गाणी     यादवराया राणी घरास येईना कैसी यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी सासूबाई गेल्या समजावयाला चल चल सूनबाई अपुल्या घराला पाटल्याचा जोड देते तुजला मी नाही यायची अपुल्या घराला यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी सासरे गेले समजावयाला चल चल सूनबाई अपुल्या घराला तिजोरीची चावी देतो तुजला मी नाही यायची अपुल्या घराला. यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी दीर गेले समजावयाला चला चला वहिनी अपुल्या घराला नवीन कपाट देतो तुम्हाला मी नाही यायची अपुल्या घराला. यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी जाऊ गेली समजावयाला चला चला जाऊबाई अपुल्या घराला जरीची साडी देते तुम्हाला मी नाही यायची अपुल्या घराला. यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी नणंद गेली समजावयाला चल चल वहिनी अपुल्या घराला चांदीचा मेखला देते तुजला मी नाही यायची अपुल्या घराला. यादवराया राणी घरास येईना कैसी सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी पती गे...

एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू

Image
               भुलाबाईचा पाळणा              एक लिंब झेलू बाई दोन लिंबं झेलू                        एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू तीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलू चार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू पाचा लिंबांचा पाणोठा माळ घाली हनुमंताला हनुमंताची निळी घोडी येता जाता कमळं तोडी कमळाच्या पाठीमागे लपली राणी अगं अगं राणी इथे कुठे पाणी पाणी नव्हे यमुना जमुना यमुना जमुनाची बारिक वाळू तेथे खेळे चिल्लारी बाळू चिल्लारी बाळाला भूक लागली सोन्याच्या शिंपीने दूध पाजले पाटावरच्या गादीवर निजविले निज रे निज रे चिल्लारी बाळा मी तर जाते सोनार वाडा सोनार दादा सोनार दादा गौरीचे मोती झाले की नाही गौरीच्या घरी तांब्याच्या चुली भोजन घातले आवळीखाली उष्टया पत्रावळी चिंचेखाली पान सुपारी उद्या दुपारी.. गाणे बघण्या करीता click करा👇 , भुलाबाईची गाणी 

नणंदा भावजया दोघी जणी

Image
भुलाबाईची गाणी नणंदा भावजया दोघी जणी नणंदा भावजया दोघी जणी घरात नव्हतं तिसरं कोणी शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं आता माझा दादा येईल गं दादाच्या मांडावर बसेन गं दादा तुझी बायको चोरटी असेल माझी गोरटी घे काठी घाल पाठी घराघराची लक्ष्मी मोठी बाई लक्ष्मी मोठी.... गाण्याचा व्हिडिओ बघण्यासाठी 👇Click करा भुलाबाईची गाणी