भुलाबाईची गाणी उभ गंध विष्णु जसे

                भुलाबाईची गाणी
         भुलाबाई भुलाबाई सासरे कसे

भुलाबाई भुलाबाई सासरे कसे, सासरे कसे?
उभ गंध विष्णू जसे विष्णू जसे…

भुलाबाई भुलाबाई सासू कशी सासू कशी
कमळातून निघाली लक्ष्मी जशी लक्ष्मी जशी…

भुलाबाई भुलाबाई नणंद कशी नणंद कशी
हातात तलवार देवी जशी देवी जशी…

भुलाबाई भुलाबाई दीर कसे दीर कसे
हातात मुरली कृष्ण जसे कृष्ण जसे…

भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी जाऊ कशी
कृष्णच्या मांडीवर राधा जशी राधा जशी…

भुलाबाई भुलाबाई पती कसे पती कसे
जटेतून गंगा शंकर जसे शंकर जसे…

भुलाबाई भुलाबाई आपण कशा आपण कशा 
शंकराच्या मांडीवर पार्वती जशा पार्वती जशा…

भुलाबाई भुलाबाई मुल कस मुल कस
वाकडी सोंड गणपती जस गणपती जस…


Video बघण्यासाठी
click करा👇

https://youtu.be/2GOzhVQXavE

Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन