Yoga For Diabetes मधुमेह साठी योगा निसर्गोपचार आणि घरगुती उपचार
मधुमेह साठी
मधुमेह म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होणे किंवा वाढणे म्हणजे
आपण जे अन्न खातो त्याचे शरीरात आवश्यक ऊर्जेसाठी साखरेत (ग्लुकोज) रुपांतर होते. आपल्या जठराजवळ असणाऱ्या पॅनक्रियाज या अवयवातून पाझरणाऱ्या इन्सुलिन या हार्मोनमुळे तयार झालेली साखर शरीराच्या पेशींमध्ये सामावण्याची प्रक्रिया घडत असते.
मधुमेह हा विकार इन्शूलिनच्या कमतरतेमुळे होतो रक्तामध्ये व लघवीमध्ये साखर आढळणे (डीएम), ज्यास सामान्यत: मधुमेह असे म्हटले जाते, हा चयापचयाशी संबंधी एक रोग आहे. ज्यामध्ये दीर्घकालीन रक्तातील साखरेची पातळी जास्त असते.
मधुमेह झालेल्या व्यक्तींमध्ये एकतर इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया मंदावलेली असते. किंवा पाहिजे तशा प्रमाणात इन्सुलिन तयार न झाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू लागते.
मधुमेहामुळे अंधत्व, हृदयविकार किंवा मूत्राशयाचे विकार उद्भवू शकतात. या विकारात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे रक्त फिल्टर होऊन तयार होणाऱ्या मूत्रातही शर्करेचे प्रमाण आढळते व ते मधुर होते.
मधुमेह झालेल्या व्यक्तीं मध्ये मधुमेहाचे लक्षण दिसतात, jलक्षणांमध्ये वारंवार लघवी होणे, तहान लागणे , भूक वाढणे इत्यादी
जर उपचार केले नाही तर मधुमेहामुळे अनेक रोग उद्भवु शकतात.
मधुमेहाची चिन्हे आणि लक्षणे काही दिवस किंवा आठवड्यात अचानक विकसित होऊ शकतात. ते गंभीर पण असू शकतात आणि उपचार न केल्यास मधुमेह जीवघेणा ठरु शकतो . त्यासाठी आहार, विहार आणि निदान महत्वाचे आहे. त्यासाठी लवकर निदान आणि उपचार घेणे महत्वाचे आहे.
मधुमेह झालेल्या व्यक्तीला
वारंवार मूत्रविसर्जन
जास्त तहान लागणे
वजन कमी होने
थकवा जाणवने
चिडचिड होने
त्वचा सुकणे किंवा खाज सुटणे ही लक्षणें आढळतात त्या साठी जर नैसर्गिक आणि घरगुती उपचार केले गेले तर ते नक्कीच फायदेशीर राहते.
मधुमेहासाठी प्रकृतीक आणि घरगुती उपचार
मधुमेहावर मेथी दाणे फार उपयुक्त आहेत. रोज अर्धा चमचा मेथी चूर्ण पाण्यात घ्यावे घ्यावे.
कारल्याच्या पानाचा रस नियमित घ्यावा. याच्या नियमित सेवनाने मधुमेह कमी होतो.
पिकलेली जांभळे सुकवून त्याचे चूर्ण पाण्याबरोबर घ्यावे.
कडुलिंबाची कोवळी पाने चावून खावी
एक चमचा मेथी दाणे रोज रात्री एका काचेच्या ग्लास मध्ये भिजत घालून सकाळी ते पाणी प्यावे.
आवळे सावलीत वाळवून त्याचे चूर्ण करुन घ्यावे.
तंज्ञानच्या मते पळसाची पाने मधुमेहावर उपयुक्त आहेत. यामुळे रक्तामधील आणि लघवीमधील साखरेचे प्रमाण कमी होते.
आवळ्यामधे क जीवनसत्व असल्यामुळे मधुमेहावर अत्यंत गुणकारी आहे.
एक चमचा आवळ्याचा रस आणि दोन चमचे कारल्याचा रस हे मिश्रण रोज
घेतल्यास मधुमेहात आराम मिळतो
मधुमेहासाठी रोज एक चमचा मेथीदाणे भाजून खावे.
जांभूळ पावडर, कारल्याची पावडर आवळा पावडर आणि थोडे मेथी दाणे पावडर हे सम प्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण करुन एक चमचा रोज सकाळ संध्याकाळ घ्यावे हे मिश्रण मधुमेहावर अत्यंत गुणकारी आहे.
मधुमेह टाळण्यासाठी चांगल्या आहाराची सवय करुन घेणे आवश्यक आहे.
तसेच आहारा मध्ये कार्बोहायड्रेट्स व ग्लुकोजचे प्रमाण कमी असावे .
मधुमेही रुग्णांनी अति गोड खाण्याचे प्रमाण कमी केले पाहिजे. तसेच दिवसाचे जेवण थोडे थोडे करुन खावे व रात्रीचे जेवण हलके आणि अल्प असावे.
मधुमेहींनी बाहेर जाताना आपल्या सोबत साखर किंवा चॉकलेट आणि पाणी जवळ ठेवावे, जेणेकरून साखर कमी झाल्यास किंवा चक्कर आल्यास एक प्राथमिक उपचार म्हणुन चॉकलेट किंवा साखर खावी
मधुमेही रुग्णांनी रोज हलका व्यायाम आणि आसन करावीत.
मधुमेहा साठी आसन
1)शलभासन
2) पश्चिमोत्तानासन
4) हलासन
5) वज्रासन
6) नौकासन
वरील आसन रोज 2 वेळा सकाळ संध्याकाळ केल्यास मधुमेही रुग्णांना लवकर बरे होण्यास मदत होते.
तसेच आहारावर नियंत्रण ठेवल्यास मधुमेहामुळे जो त्रास होतो तो होनार नाही त्यासाठी आहारात, भाज्यांमध्ये टमाटर, पत्ता कोबी, दुधी भोपळा,, पडवळ, काकडी, चणे इत्यादी चा समावेश असावा या सोबत कोंड्याची पोळी खावी किंवा भाकरी खावी.
फळांमध्ये टरबुज खावे.
अपथ्य
वाटाणा, गाजर, बटाटा, साबुदाणा, काजू बदाम, अंजीर, मनुक्का, आणि गोड पदार्थ यांचा आहारात अल्प समावेश करावा.
तंबाखू दारू यांचा त्याग करावा तसेच 8 तासांची पुरेशी झोप घ्यावी, दिवसा झोप घेऊ नये, वामकुक्षी घ्यावी म्हणजे डाव्या कुशीवर 15 - 20 मिनिटे आराम करावा.
चिंता, भय, क्रोध करू नये आवडीचे गाणे ऐकावे, किंवा गुणगुणत राहावे, ज्ञान मुद्रा करावी
निसर्गोपचार करावा
या मध्ये
एनिमा
मिट्टी स्नान
कटी स्नान
इत्यादी अनेक उपचार केले जातात ज्यामुळे मधुमेहावर नियंत्रण मिळवले जाते आणि रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो.
Comments
Post a Comment