पायांच्या मजबुतीसाठी व मन आणि शरीराचे संतुलन चांगले राहण्यासाठी वृक्षासन
0 पायांच्या मजबुतीसाठी आणि मन व
शरीराचे संतुलन चांगले राहण्यासाठी
वृक्षासन
वृक्ष म्हणजे झाड, हे आसन करताना याची
आकृती एका झाडा प्रमाणे दिसते म्हणून
झाडा सारखे दिसणारे हे आसन आहे.
कदाचित त्यामुळं याला वृक्षासन असे नाव
पडले दिसते, वृक्षासन आणि ताडासन
जवळ जवळ सारखेच आसन आहेत,
ताडासनामध्ये दोन्ही पायांवर तोल
सांभाळायचा असतो, तर वृक्षासनात एका
पायावर तोल सांभाळत उभे राहावे लागते.
वृक्षसन करण्याची पद्धत
1)सर्वप्रथम दोन्ही पाय एकमेकांस
चिटकवून सरळ उभे राहावे.
2)उजवा पाय गुडघ्यात
वाकवून त्याचा तळपाय डाव्या
पायावर वरती सरकवत डाव्या
मांडीवर टेकवावा. उजव्या पायाचा
तळवा व टाच डाव्या मांडीवर
टेकवताना त्या पायाची बोटे
जमिनीच्या दिशेने असावीत.
3) शरीराचा तोल डाव्या
पायावर सांभाळत हळूहळू दोन्ही हात
समांतर रेषेत, दोन्ही बाजूंनी कानाच्या रेषेत
वर घ्यावेत.
4)दोन्ही हातांचे पंजे एकमेकांस चिटकून
नमस्कार मुद्रा करवी.किंवा दोन्ही हात पसरून वर नेऊ शकता.
5) दीर्घ श्वास घेऊन उजवा गुडघा मागे
खेचावा. वृक्षासनाची ही अंतिम स्थिती आहे.
हे आसन 15 सेकंद किंवा 1 मिनिट पर्यंत
करावे.
6) श्वास सोडत हात एकाच वेळी दोन्ही
बाजूंनी सावकाश खाली घ्यावेत.
7) उजवा पाय सरळ खाली आणावा
हे आसन पाय बदलून पुन्हा करावे.
असन करताना सुरुवातीला थोडे अवघड
वाटेल पण सरावानंतर सोपे वाटेल.
फायदे
पायांचे स्नायू मजबूत होतात
मनाची एकाग्रता वाढते लहान मुलांनी
केल्यास एकाग्रता वाढून अभ्यासात मन
लागते. शरीराचा तोल सांभाळन्याची शक्ती
वाढते खांद्याचे स्नायू बळकट आणि मोकळे
होतात खांदे जखडत नाही.
Comments
Post a Comment