Posts

Showing posts from December, 2025

उत्तम आरोग्यासाठी दैनिक आहार भाज्यांचे सूप भाग 1

Image
           उत्तम आरोग्यासाठी              दैनिक आहार            भाज्यांचे सूप भाग 1  निसर्गोपचार शास्त्रामध्ये कच्च्या भाज्या खाण्याचे जेवढे महत्त्व आहे तेवढे महत्त्व भाज्या उकडून खाण्याचे ही खुप महत्व आहे, पण भाज्या नुसत्या उकडून खाल्ल्या तर चव लागत नाही म्हणून निरनिराळ्या प्रकारची सूप बनवता येते. आज आपण गाजर व बीटाचा सूप कसा करायचा ते बघू या गाजर बिट सुप पिल्याने डोळ्याचे विकार, त्वचेचे विकार दूर होतात, तसेच रक्त शुद्धी होते. साहित्य 4 गाजर 2 बिट 2 चमचे मोड आलेले कोणतेही कड धान्य 1 इंच आल्याचा तुकडा ½ चमचा मिरेपूड चवी पुरते मिठ कृती गाजर व बिट स्वच्छ धुवायची आणि छोटे तुकडे करावे गाजरचा मधला भाग काढून टाकावा तसेच बीटाची साल सुद्धा काढावी प्रेशर कुकर मध्ये गाजर बिटाच्या फोडी टाकून 3ते 4 शिट्या काढून घ्याव्या. त्यानंतर शिजलेले गाजर बिट मिक्सर मधून बारीक करून किंवा चाळणीतून गाळावे व परत गरम करून त्यात मिरे पूड जिरे पूड आणि चवीपुरते मिठ टाकावे आणि आवडत असल्यास टोस्ट चे तुकडे टाका...

गव्हाच्या रोपांचा रस (गव्हांकुर) घेण्याचे फायदे (Wheatgrass Juice)

Image
       गव्हाच्या रोपांचा रस (गव्हांकुर) घेण्याचे फायदे       (Wheatgrass Juice)  गहू रसाचा शोध अमेरिकेतील लेडी विगमोर यांनी लावला, हा रस उत्तम टॉनिक असून सर्व शारीरिक व मानसिक विकरावर रामबाण औषध आहे. तज्ञाच्या मते जेव्हा कोणत्याही औषधाचा उपयोग होत नाही त्यावेळी गहू रोप रस असाध्य रोगावर उत्तम काम करतो. गव्हांकुर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, ज्यामुळे ऊर्जा मिळते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, वजन कमी होते, त्वचा सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. यात व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे ॲनिमिया, बद्धकोष्ठता, सांधेदुखी, आणि पोटाच्या विकारांवर आराम मिळतो. हे 'हिरवे रक्त' म्हणून ओळखले जाते आणि अनेक आजारांवर नैसर्गिक उपाय म्हणून वापरले जाते. गव्हांकुर रसाचे फायदे ऊर्जा आणि ताकद: दिवसभरासाठी ऊर्जा मिळते आणि उत्साह वाढतो. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि संक्रमणांपासून बचाव करते.  लठ्ठपणा कमी करते  फायबर जास्त असल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि वजन नियंत्रणात राहते.तसेच...

त्रिकोणासनाचे आश्चर्यकारक फायदे: वजन कमी करण्यापासून ते ताणतणावापासून मुक्तीपर्यंत

Image
              त्रिकोणासनाचे आश्चर्यकारक फायदे: वजन कमी करण्यापासून ते ताणतणावापासून मुक्तीपर्यंत संग्रहित छायचित्र त्रिकोणासन १ पद्धत दोन्ही पायात २-३ फूट अंतरावर ठेवून सरळ उभे राहा. दोन्ही हात खांद्याच्या उंचीपर्यंत सरळ ठेवा. गुडघे थोडेसे वाकवा आणि शरीर उजवीकडे वाकवा व दोन्ही हात सरळ ठेवून उभे राहा. तुमच्या शरीराच्या दुसऱ्या बाजूलाही हे करा. श्वास घेणे हात वर करून सरळ उभे राहून श्वास घ्या. तुमच्या बाजूला वाकून श्वास सोडा. त्रिकोणासन २ पद्धत पहिल्या स्थितीत पुनरावृत्ती करा, परंतु शेवटच्या स्थितीत, तुमचा वर केलेला हात तुमच्या कानाच्या वरून जमिनीला समांतर येईपर्यंत खाली करा. श्वास घेणे पहिल्या स्थितीत जसे आहे तसेच राहा त्रिकोणासनाचे फायदे  जसे की शरीराची लवचिकता वाढवणते, मांड्या, गुडघे, घोटे आणि खांदे मजबूत करते पचन सुधारते तणाव आणि पाठदुखी कमी करते संतुलन वाढवणे आणि पोटाची चरबी कमी करण्यास मदत करणे, ज्यामुळे संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हे एक उत्तम आसन आहे.  शारीरिक फायदे त्रिकोणासन रोज केल्याने स्नायू बळकट होतात तसेच ...