incerase- milk-child-birth-: प्रसूती नंतर दूध वाढण्यासाठी
प्रसूती नंतर दूध वाढण्यासाठी ( सर्व चित्र संग्रहित ) आई झाल्यानंतर अनेकदा महिलांना स्तनातून दूध येत नसल्याने त्रास होतो. मात्र, घरगुती उपायांनी या समस्येपासून मुक्ती मिळू शकते. बाळाला जन्म दिल्यानंतर, स्त्रीचे शरीर स्तनपानासाठी तयार होते. अशा परिस्थितीत, स्तनातून पुरेसे दूध मिळणे खूप महत्वाचे आहे. कारण बाळाला केवळ आईच्या दुधातूनच पोषण मिळते. मात्र, प्रसूतीनंतर काही महिलांना स्तनामध्ये दूध कमी येत असल्याची तक्रार असते. अनेकदा महिलांना ऐक समस्या भेडसावत असते स्तनातून दूध येत नसल्याने बऱ्याच महिलांना मानसिक त्रास होतो. बाळाला दूध कसे मिळेल त्याचे पोट भरेल का? मात्र, घरगुती उपायांनी या समस्येपासून मुक्ती मिळू शकता. खारीक बदाम खिर प्रसूती नंतर दूध वाढवण्यासाठी खारीक बदामची खिर करुन खावी यात खसखस पण टाकू शकता खसखस टाकून खिर केल्यास जास्त फायदा होतो. अळीव / आहाळू अळीव ...