ऑक्टोबर हिट (October heat ) घ्या त्वचेची काळजी
ऑक्टोबर हिट (October heat ) घ्या त्वचेची काळजी उन्हाळा नसला तरी उन्हळ्याची जाणीव करुन देणारा महिना म्हणजे ऑक्टोबर. या दिवसात त्वचेचा ओलावा टिकून ठेवणे फार महत्वाचे आहे.दिवसा गरमी आणि रात्री थंडी, या बदला मुळे त्वचेवर पण विपरीत परिणाम होऊन त्वचा कोरडी पडायला सुरवात होते प्रत्येकाची त्वचा वेगवेगळी असल्यामुळे काहींची त्वचा कोरडी पडून त्वचेला खाज येऊन त्यातून रक्त येण्यास सुरवात होते, काहींचे डोक्याचे केस रुक्ष होऊन त्यात कोंडा (डँड्रफ )होतो आणि डोक्याला खाज सुटते. आणि डँड्रफ मुळे चेहऱ्यावर मुरूम पुटकुळ्या यायला सुरुवात होते. त्यासाठी या दिवसात त्वचेची योग्य ती काळजी घायला पाहिजे. त्वचेची आद्रता टिकून ठेवण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर थंड किंवा कोमट पाण्याचे चार पाच भपके मारावे. या दिवसात रासायनिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर शक्यतो कमी करावा.घरच्या घरी नैसर्गिक उपाय करावेत आणि जास्तीत जास्त मोसमी फळ भाज्यांचा, पालेभाज्यांचा उपयोग करावा, जसे की टोमॅटो चा...