जागतिक योग दिवस

जागतिक योग दिवस आज जागतिक योग दिवस योग ही भारतीयांना ऋषीमुनींनी दिलेली देणगी आहे. निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत थोडासा वेळ आपण आपल्या शरीरासाठी देणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम व योगासने,प्राणायाम यांचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. करिता प्रत्येकाने योगासने करणे गरजेचे आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. भारतीय धर्म संस्कृतीमधील “योग” संकल्पनेची मांडणी श्रीमदभगवद्गीता ग...