वजन वाढलं अशी घ्या काळजी
लठ्ठपणा वाढला आहे?अशी घ्या काळजी आहार विहार आणि उपचारा द्वारे आज मी तुम्हाला लठ्ठपणा म्हणजे काय? तो कसा वाढतो आणि तो कसा नियंत्रित केला जातो हे सांगणार आहे तसेच लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणते उपाय आहेत यावरही मार्गदर्शन कारणार आहे. आजच्या मोबाईल आणि कॉम्पुटरच्या काळात मनुष्यप्राणी स्वतःकडे आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला विसरला आहे, सकाळी उठल्या पासून तर रात्री झोपी जाईपर्यंत हातात मोबाईल आणि कॉम्पुटर, तसेच बालक आणि वृद्ध सतत टीव्ही बघत असतात त्यामुळे रोगराई आणि विशेष म्हणजे लठ्ठपणा वाढत चाललेला आहे. लठ्ठपणा म्हणजे काय किंवा तो कसा वाढतो स्त्रियांमध्ये 35शी नंतर पोट मांड्या या मधे चरबी कशी वाढते लठ्ठपणा ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराच्या विविध भागांवर जास्त प्रमाणात चरबी जमा होते ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो, तसेच शरीरात जडपणा येतो त्यामुळे त्या व्यक्तीला दिवसभर आळस व चिडचिड होते किंवा चालतना त्रास होतो दोन्ही मांड्या एकमे...