वजन वाढलं अशी घ्या काळजी
लठ्ठपणा वाढला आहे?अशी घ्या काळजी आहार विहार आणि उपचारा द्वारे
आज मी तुम्हाला लठ्ठपणा म्हणजे काय? तो कसा वाढतो आणि तो कसा नियंत्रित केला जातो हे सांगणार आहे तसेच लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणते उपाय आहेत यावरही मार्गदर्शन कारणार आहे.
आजच्या मोबाईल आणि कॉम्पुटरच्या काळात मनुष्यप्राणी स्वतःकडे आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यायला विसरला आहे, सकाळी उठल्या पासून तर रात्री झोपी जाईपर्यंत हातात मोबाईल आणि कॉम्पुटर, तसेच बालक आणि वृद्ध सतत टीव्ही बघत असतात त्यामुळे रोगराई आणि विशेष म्हणजे लठ्ठपणा वाढत चाललेला आहे.
लठ्ठपणा म्हणजे काय किंवा तो कसा वाढतो
स्त्रियांमध्ये 35शी नंतर पोट मांड्या या मधे चरबी कशी वाढते
लठ्ठपणा ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराच्या विविध भागांवर जास्त प्रमाणात चरबी जमा होते ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो, तसेच शरीरात जडपणा येतो त्यामुळे त्या व्यक्तीला दिवसभर आळस व चिडचिड होते किंवा चालतना त्रास होतो दोन्ही मांड्या एकमेकांना घासल्यामुळे चालताना किंवा दैनंदिन काम करताना त्रास होतो.
लठ्ठपणा वाढण्याची अनेक कारणे आहेत तर काही लोकांमध्ये ते अनुवांशिक आहे परंतु बहुतेक लोकांमध्ये अनियमित दिनचर्यामुळे आणि खान पान आहार विहार यामुळे होते.
सध्या लोकांना खाण्यापिण्याकडे आणि राहण्याच्या सवयींकडे लक्ष न दिल्याने हा त्रास होत आहे.
आपल्या शरीरात असे अनेक हार्मोन्स असतात जे वजन वाढण्याला कारणीभूत असतात. काही जसे की ब्रेन हार्मोन वजन वाढण्याचं एक मुख्य कारण असू शकत . शरीरात जर कोणत्याही हार्मोनचं असंतुलन झालं तर तुमचं वजन वाढणं सुरू होतं. त्यामुळे फिट राहण्यासाठी शरीरात हार्मोनचं संतुलन ठेवणे गरजेचं आहे.
थायरॉइड हार्मोन
घशाजवळ असलेला थायरॉइड ग्लॅंड्स तीन प्रकारचे हार्मोन रिलीज करतो. टी ३, टी ४ आणि कॅलसीटोनिन. हे हार्मोन आपली झोप, मेटाबॉलिज्म, हार्ट रेट आणि आपला ब्रेन कंट्रोल करतात. कधी कधी थायरॉइड ग्लॅंड थायरॉइड हार्मोन रिलीज करू लागतात. ज्याने हायपोथायरॉडिज्मचा धोका वाढतो. हा हायपोथायरॉडिज्म वजन वाढणे, डिप्रेशन आणि हाय ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलशी संबंधित आहे. याचं संतुलन बिघडलं तर महिलांमध्ये वजन ५ ते १० किलो वाढू शकतं.
लठ्ठपणामुळे होणारे रोग आणि घ्यावयाची काळजी
लठ्ठपणा जर सतत वाढत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण लठ्ठपणामुळे हृदयावर दुष्परिणाम होऊन हृदयविकार होण्याची शक्यता असते. तसेच
उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शन लठ्ठपणामुळे होते निद्रानाश देखील लठ्ठपणामुळे होतो.लठ्ठपणामुळे भूक मंदावते भुकेची इच्छा होत नाही, लठ्ठपणामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढून हृदयविकाराला आमंत्रण मिळत.
लठ्ठपणा कमी करायचा असेल तर आपल्याला आपल्या आहार विहार यात नियमितता आणि आहारावर नियंत्रण ठेवायला हवे तसेच जेवणाच्या वेळेत आणि कोणता आहार कधी घ्यावा याचे काटेकोर पालन करायला हवे.
रोज जेवणात अन्नाच्या प्रमाणाची विशेष काळजी घ्या.
तळलेले-भाजलेले आणि अधिक तिखट मसालेदार जेवण कमी प्रमाणात घ्या
लठ्ठपणा कमी करण्यासाठी
सकाळी उठल्याबरोबर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले साधे पाणी पिण्याची सवय करावी त्यानंतर नित्यक्रमातून निवृत्त झाल्यानंतर मॉर्निंग वॉक करा दररोज किमान ४५ मिनिटे आणि जास्तीत जास्त एक ते दीड तास सकाळी शुद्ध हवेत चालावे व नंतर ५ ते १० मिनिटे शवासन करून साधे सोपे आसन करावे
लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणते योगासन करावे -
लठ्ठपणा कमी करण्यासाठी काही आसन आहेत या आसनांचा नियमित सराव करावा
कटीचक्रसन
पश्चिमोत्तनासन
धनुरासन
भुजंगासन
हलासन
सर्वांगासन
सुरुवातीला प्रत्येक आसन हॆ दोन दोन वेळा करावे. त्या नंतर आपल्याला झेपेल असे 5-5वेळा करावे व शवासनामध्ये पुन्हा विश्रांती घ्यावी
त्यानंतर पदमासन, अर्धपद्मासन किंवा सुखासनामध्ये बसून सर्वप्रथम सामान्य श्वासोच्छवासाकडे लक्ष द्या किंवा दीर्घ स्वसन करून प्रणयमाला सुरुवात करा
५ मिनिटे कपाल भातीचा सराव करा
नाडीशोधनाचा सराव 5-5 मिनिटे दोनदा करा हा प्राणायाम नियमितपणे करा.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी घरगुती उपाय
पिण्यासाठी कोमट पाणी प्या
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून त्यात चवीनुसार सेंधान टाकून त्याचे नियमित सेवन करा, त्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होते.
चार चमचे मेथीचे दाणे, दोन चमचे जिरे, एक चमचा अजवाईन बारीक करून पेस्ट बनवा आणि रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा कोमट पाण्यासोबत घ्या, हा प्रयोग अतिरिक्त चरबी कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.
लिंबाचा सरबत नियमित प्या
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत त्रिफळा चूर्ण घ्यावे.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोरफडीचा रस देखील रिकाम्या पोटी घेतला जातो.
दोन ग्लास पाण्यात कडुनिंबाची दोन पाने उकळून घ्या, एक ग्लास राहिल्यावर ते गाळून थंड करा आणि नंतर रिकाम्या पोटी प्या, या वापराने अतिरिक्त चरबी देखील कमी होते.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी बरेच आसन आहेत त्यातील तुम्ही रोज एक किंवा दोन आसन नियमित केल्यास वजन कमी होऊन शरीर धष्ठपुष्ट होण्यास मदत होते त्यासाठी
दररोज सूर्यनमस्काराच्या 20 - 40 फेऱ्या करा. या व्यायामामुळे आपली अतिरिक्त चरबी कमी होते आणि कोलेस्ट्रॉल देखील कमी होते.
जर उच्च रक्तदाब असेल तर त्यांनी हा व्यायाम अगदी आरामात ५ फेऱ्या करावा आणि त्यादरम्यान आवश्यकतेनुसार विश्रांतीही घ्यावी.
10 मिनिटे जॉगिंग करा, लठ्ठपणा कमी करण्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे. जर तुम्ही लवकर थकले असाल तर हा व्यायाम 3 - 3 मिनिटे करताना 10 वेळा करा.
तितली आसन
जानु शिराशन
सुप्तवज्रसन
गोमुखासन
मत्स्यासन
पर्वतासन
नौकसन
पवनमुक्तासन
ही सर्व आसने लठ्ठपणा कमी करण्यासाठी फारच उपयुक्त आहेत, फक्त नियमित अभ्यास करावा केल्यास 100%फायदा होतो तसेच लठ्ठपणा कमी करण्यासाठी सर्वच प्रकारचे प्राणायाम लाभदायक आहे
भस्त्रिका प्राणायाम नियमित केल्याने अतिरिक्त चरबी कमी होते, परंतु हार्ट प्रॉब्लेम किंवा उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी हा प्राणायाम करू नये केल्यास तज्ञाच्या मार्गदर्शना खाली करावा त्यांनी 20 - 20 स्ट्रोक करावे, कपालभाती करावी आणि 2 - 5 सेकंद बाह्य कुंभकाचा सराव करावा
बाह्य कुंभकाच्या सरावाने लठ्ठपणा कमी होण्यास मदत
बाह्य कुंभकाच्या सरावाने लठ्ठपणा पूर्णपणे कमी होण्यास मदत होते परंतु त्यासाठी आपल्या फुफ्फुसांची हवा बाहेर ठेवण्याची क्षमता पुरेशी वाढवणे आवश्यक आहे.
कपालभाती आणि भस्त्रिका प्राणायामानंतर बाह्य कुंभकाचा सराव अत्यंत प्रभावशाली आहे.
जेव्हा प्राणायामामध्ये बह्या कुंभकाचा सराव केला जातो, तेव्हा उड्डियान बंध आणि नंतर अग्निसार क्रिया केली जाते जी लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
सावधगिरी -
कोणत्याही प्रकारचा योगाभ्यास आणि प्राणायाम करण्यापूर्वी एकदा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या, अन्यथा नुकसान होऊ शकते.
आहार तालिका
सकाळी 6:30 ते 7:30 दरम्यान
सकाळी उठल्याबरोबर एक कप मेथीचे पाणी किंवा साधे कोमट पाणी पिऊ शकता
नाष्टा
सकाळी 7:30 ते 8:30 दरम्यान
4 इडल्या किंवा पोहे
एक वाटी सांबार, एक वाटी नारळाची चटणी, एक कप ग्रीन टी आणि चार बदाम.
(सकाळी 10:00 ते 10:30 दरम्यान)
एक कप दूध किंवा सोया दूध किंवा फळांचा रस.
दुपारचे जेवण
(दुपारी 12:30 ते 1:00 च्या दरम्यान)
साधारण तीन रोट्या,पोळी किंवा चपाती एक वाटी भात,
एक वाटी डाळीचे वरण
अर्धी वाटी मिश्र भाजी
किंवा चिकन करी
आणि एक वाटी सॅलड.
जेवल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी एक कप ताक.
संध्याकाळचा नाश्ता
(दुपारी 3:30 ते 4:00 च्या दरम्यान)
एक वाटी अंकुरलेले मूग
आणि दहा ते पंधरा शेंगदाणे.
त्यात लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ आणि मिरेपूड घाला. त्याऐवजी काकडी आणि गाजराची कोशिंबीरही खाऊ शकता.
रात्रीचे जेवण
(7:00 ते 7:30 दरम्यान)
तीन भाकरी किंवा चपाती किंवा फुलके अर्धी वाटी भाजी
पालेभाजी भाजी
फिश करी,
अर्धी वाटी सॅलड.
रात्री झोपताना
एक कप गरम दुधात चिमूटभर हळद घालून झोपण्यापूर्वी सेवन करा.
तुम्हाला हा लेख कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा.
ब्लॉगला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद.
माझ्या ब्लॉगवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे
आरोग्य साधना योगा अँड निसर्गोपचार24
नमस्कार मित्रांनो मी 2005 पासून या क्षेत्रात काम करत आहे. मित्रांनो, ही माझी आवड आहे, आणि मला त्यासाठी सतत काम करायचे आहे, म्हणून मला वाटले की किती लोक त्यांचे वेगवेगळे अनुभव शेअर करू शकतात. म्हणून मला वाटले की ब्लॉग हे एकमेव माध्यम आहे ज्याद्वारे मी तुमच्याशी कनेक्ट होऊ शकेल तुम्ही माझे लेख सतत वाचावेत आणि योगाशी आणि निसरगोपचारा संबंधित सर्वांचे ज्ञान वाढवावे आणि मला प्रोत्साहन देत राहावे अशी आशा आहे, जेणेकरून प्रत्येक वेळी मी तुम्हाला चांगली आरोग्याविषयी माहिती देऊ शकेन. तुमचे प्रेम मला प्रत्येक वेळी नवीन ऊर्जा देईल. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.
एक टिप्पणी पाठवा
Comments
Post a Comment