उन्हाळ्यात घ्या त्वचेची काळजी शरीराला थंडावा देण्यासाठी प्राणायाम व घरगुती उपाय.
उन्हाळ्यात घ्या त्वचेची काळजी शरीराला थंडावा देण्यासाठी प्राणायाम व घरगुती उपाय . एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा पारा वाढायला सुरुवात होते.उन्हाळा म्हटलं की रखरखत उन गरमी, घसा कोरडा होऊन जीव तहानेने व्याकुळ होतो रखरखत्या उन्हात त्वचा काळी पडून कोरडी होते व सुरकुत्या पडायला सुरुवात होते, काहींची त्वचा तेलकट होऊन चिपचिपि व रंगहीन दिसते घामाघूम झालेली त्वचा असेल तर घामामुळे काही जनांच्या त्वचेला खाज सूटते, त्यामुळे बरेच जण त्वचेला नखाने खाजवतात त्वचा लाल होऊन त्यातून रक्त पण निघते, त्वचेला जखम होऊ शकते, त्वचेवर खाज येत असेल तर नखाने न खाजवत टर्किश न्यापकीन घेऊन त्याने त्वचा हळूहळू खाजवावी, म्हणजे त्वचा लाल किंवा त्वचेला ओरबडे पडणार नाही. बरेच वेळा गरमी मुळे लहान मुलांच्या मानेवर, गळ्यावर, आणि पाठीवर घामोळं येते त्यासाठी कैरी पाण्यात उकळून त्या कैरीचा गर घामोळ्यांवर लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो व घामोळ्या...