उन्हाळ्यात घ्या त्वचेची काळजी शरीराला थंडावा देण्यासाठी प्राणायाम व घरगुती उपाय.

     उन्हाळ्यात घ्या त्वचेची काळजी

शरीराला थंडावा देण्यासाठी प्राणायाम व घरगुती उपाय 



.


      एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाचा पारा वाढायला सुरुवात होते.उन्हाळा म्हटलं की रखरखत उन गरमी, घसा कोरडा होऊन जीव तहानेने व्याकुळ होतो  रखरखत्या  उन्हात त्वचा काळी पडून कोरडी होते व सुरकुत्या पडायला सुरुवात होते, काहींची त्वचा तेलकट होऊन चिपचिपि व रंगहीन दिसते घामाघूम झालेली त्वचा असेल तर घामामुळे काही जनांच्या त्वचेला  खाज सूटते, त्यामुळे बरेच जण त्वचेला नखाने खाजवतात  त्वचा लाल  होऊन त्यातून रक्त पण निघते, त्वचेला जखम होऊ शकते, त्वचेवर खाज येत असेल तर नखाने न खाजवत टर्किश न्यापकीन घेऊन त्याने त्वचा हळूहळू खाजवावी, म्हणजे त्वचा लाल किंवा त्वचेला ओरबडे पडणार नाही.


           बरेच वेळा गरमी मुळे लहान मुलांच्या मानेवर,  गळ्यावर, आणि पाठीवर घामोळं येते त्यासाठी कैरी पाण्यात उकळून त्या कैरीचा गर घामोळ्यांवर लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो व घामोळ्याचा त्रास कमी होतो,     

       

    उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, शरीरात पाणी कमी होऊ नये यासाठी भरपूर पाणी पिण्याची आवश्यकता असते.त्यासाठी मोसमी फळांचे सेवन करावे , उन्हाळ्यात टरबुज खरबूज, चिबूड काकडी, इत्यादी. फळे बाजारात येतात त्याचे जास्तीत जास्त सेवन करावे, तसेच उन्हाळ्यात  सुती कपडे वापरण्यावर भर द्यावा. भडक रंगाचे कपडे जसे लालभडक, काळा रंग, पिवळा धम्म, या रंगांच्या कपड्याचा वापर करू नये, फिकट रंगाचे कपडे घालावे. तसेच पूर्ण बाह्याचे कपडे घालावे बाहेर जाताना टोपी, गॉगल,  सनकोट, सुती  रुमाल, किंवा पांढऱ्या रंगाचा सुती पंचा वापरावा,   


             प्रखर सूर्यकिरणांच्या संपर्कात त्वचा आल्यामुळे त्वचेचा ओलावा कमी होतो ( मॉइश्चर )कमी होते त्यामुळे त्वचा कोरडी पडते, त्वचा कोरडी झाल्यास त्वचेवर रोज मॉइश्चराइझर लावून त्वचा नरम मुलायम ठेवण्याचा प्रयत्न करावा. 


     उन्हाळ्यात बाहेर जाताना सनस्क्रिन लोशन लावूनच बाहेर पडावे तसेच  लिंबू शरबत, किंवा ताक पिऊन बाहेर जावे.

        

          तेलकट त्वचा असेल तर त्रिफळा पावडर रात्री पाण्यात भिजून व सकाळी ते पाणी गाळून घेऊन एका काचेच्या बाटलीत भरून ठेऊन त्या पाण्याने चेहरा धुवावा. 

     

       मध आणि दूध व चिमूटभर आंबेहळद घेऊन त्याचा लेप चेहऱ्याला लावावा व 15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवावा. 


        चेहरा रुक्ष होत असेल तर 1 चमचा काकडीचा रस व 1 चमचा टरबूजाचा रस व थोडे मिठ टाकून चेहऱ्यावर स्क्रब करावं 


        निस्तेज चेहरा असेल तर टोमॅटो चा रस रोज सकाळी चेहऱ्यावर लावावा चेहरा एकदम प्रफुल्लित दिसतो 


           चेहऱ्यावर मुरूम येत असेल तर टोमॅटो व मध एकत्र करुन चेहऱ्यावर कापसाच्या बोळ्याने मुरूरावर हलक्या हाताने लावावं. 


         त्वचा उन्हाने काळी पडली असेल तर आलू ( बटाटा )उकळून घ्यावा व  त्याच्या मध्ये थोडी दुधावरची साय टाकून त्याचा लेप करावा व चेहऱ्यावर मानेवर 20 मिनिटे लाऊन मग चेहरा थंड पाण्याने  धुवावा हा उपाय केल्यास उन्हामुळे त्वचा काळी पडली असेल तर त्वचा उजळते व काळपटपणा जातो व सुरुकुत्या पण येत नाही. 


        उन्हाळ्यात जमल्यास आठवड्यातून 3 वेळा तरी आंबेहळद, चंदन पावडर, गुलाब पॉवडर, मुलतानी माती जेष्ठमध पावडर, गुलाबजल मधे भिजउन त्याचा लेप चेहऱ्यावर लावावा. 


          संत्रा साल  पावडर गुलाबजल मध्ये मिसळून त्याचा लेप मुरुमांवर लावावा मुरूम आणि मुरुमाचे डाग निघून जातात. 

     


      उन्हाळयात ज्यांची त्वचा तेलकट चिपचिपि होत असेल तर त्यांनी लिंबू रसात मध, ग्लिसरीन सर्व अर्धा - अर्धा चमचा घेऊन आणि चिमूटभर मुलतानी माती याचे मिश्रण चेहऱ्यावर लावावे मुरूम आणि त्वचेचा तेलकटपणा  कमी होण्यास मदत होते. 



       उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल तर काकडीचा रस, लिंबू रस 1 चमचा व 1 थेंब खोबरेल तेल घेऊन चेहऱ्यावर मालिश करावी काळे डाग निघून जातात. 


         ओला नारळ किसुन त्याचे जे दूध निघते त्या दुधाने चेहरा,हात मान, गळा यावर लावल्यास त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. 


             आठवड्यातून 2 वेळा  बेसन पीठ ताकात मिसळून व थोडे गुलाबजल टाकून सर्वांगाला लाऊन अंघोळ केल्यास घामाची दुर्गंधी येत नाही. 


         अंघोळीच्या पाण्यात पुदिना चा रस टाकून अंघोळ केल्यास दिवसभर ताजेतवाने वाटते. 



            रोज अंघोळीच्या पाण्यात मिठ टाकून अंघोळ केल्यास घामाची दुर्गंधी येत नाही 




        ज्यांना सतत हाता पायाला घाम येत असेल व घामाची दुर्गंधी येत असेल  त्यांनी लिंबू रसात मिठ टाकून ते मिश्रण  तळ हात व तळ पायांना चोळावे 


        डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्या करिता, रोज टोमॅटोची फोड घेऊन ती डोळ्याखालील डागांवर हळुवार फिरवावी डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते. 

     

     त्वचेवर आपण रोज काहींना काही लावतोच पण पोटातून पण जर भाज्यांचा रस,   भाज्यांचा सूप,  घेतल्यास इनर ब्युटी जगवता येते. बाहेरून कितीही लेप लावला तरी फूड इन्टेक जर चांगल असेल तर बाह्य उपचाराचा फरक लवकर जाणवतो आणि मन सुद्धा नेहमी आनंदी आणि समाधानी ठेवले तर आपोआपच  चेहऱ्याचं सौंदर्य खुलुन दिसत. म्हणुन   हसत रहा, सात्विक खात रहा आणि चेहऱ्यावर थोडीसी smile ठेवत चला, मास्क लाऊन पण मनातल्या मनात हसता येत. Mask मधे जरी तुमची smile दिसत नसली तरी तुमचे डोळे  बोलके असतात.



       उन्हाळ्यात  तीव्र उन्हाचा फटका न बसावा त्यासाठी  भरपूर पाणी प्या, ताकाचे सेवन करा, पन्ह प्या,  उसाचा रस पण घ्या  या पेयाने तुमच्या शरीरात थंडावा निर्माण होऊन उन्हाळा जाणवणार नाही. 



           उन्हाच्या तीव्र किरणांच्या गर्मी मुळे  वाचण्या करिता काही प्राणायाम आहेत ते केल्यास शरीरात थंडावा निर्माण होतो 




1)शीतली प्राणायाम 


2)सित्कारी प्राणायाम 


      वरील दोन्ही प्राणायाम उन्हाळ्यात केल्यास उन्हाची तीव्रता सोसावी लागणार  नाही 



शितली प्राणायाम अर्थ 


    शितली हा शब्द शीतल शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ थंड किंवा मनाला आणि शरीराला थंडावा देणारा आणि सुखदायक आहे.  शीतली प्राणायामाचा  अभ्यास नियमित केल्यास मनुष्य  मनाने शरीराने शांत होतो,  रागीट स्वभाव असेल तर रागावर नियंत्रण ठेवल्या जाते.   शीतली प्राणायामाने  अंतःस्रावी ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो.


शितली प्राणायाम कसा करावा 


     पद्मासन किंवा सुखासनात बसावे, किंवा खुर्चीवर बसून पण करता येते, जीभ बाहेर काढुन जिभेच्या   दोन्ही कडा वळवुन पक्ष्याची  चोच असते तसा आकार करावा आणि हवा आत घेऊन सी सी सी असा  आवाज करत हवा आत घेऊन तोंड बंद करुन स्वास थोडावेळ रोखून धरावा नंतर दोन्ही नाकपुडीतून हळू हळू स्वास बाहेर सोडावा. 


फायदे 


  1. शरीरात गारवा निर्माण होतो उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे त्रस्त झाल्यास शितली प्राणायाम करावा, 


  1. उन्हाळ्यात तहानेने जीव व्याकुळ होतो त्यासाठी हा प्राणायाम केल्यास तहान भागते. वेळेवर कुठे पाणी भेटत नसेल तर हा प्राणायाम तहान भागवते. 


  1. शितली प्राणायामाने पोटाचे विविध आजार बरे होतात. 


  1. पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. 


            

     

Comments

Popular posts from this blog

hair problems केसांचे आरोग्य केसांची निगा राखण्यासाठी योगा निसर्गोपचार व घरगुती उपाय

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon