डोळ्यांचे व्यायाम आणि उपाय
सुंदर डोळ्यांसाठी डोळ्यांचे व्यायाम आजकाल लहानांन पासुन तर मोठ्यानं पर्यंत सगळ्यांचाच दिवस हा मोबाईल आणि लॅपटॉप पासुन सुरु होतो तो झोपी जाई पर्यंत आणि बदललेली जीवन शैली त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊन विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे त्यातीलच एक म्हणजे आपले सुंदर डॊळे, वयाची चाळीशी ओलांडली की डोळ्याचे विकार हे उदभवताच त्यात मग दूरची नजर, जवळची नजर कमी जास्त होते. परंतु आज काल मोबाईल वर अभ्यास किंवा तरुणांची नौकरी सुद्धा मोबाईल आणि लॅपटॉप वर सुरु आहे त्यामुळे लहान बालके आणि तरूणांन मध्ये डोळ्याचे विकार वाढण्याचे प्रमाण खुप दिसत आहे. जर 5 मिनिटे काढुन डोळ्यांचा व्यायाम केला किंवा आहारात थोडा बदल केला तर नक्कीच डोळ्याचे विकार होनार नाही त्यासाठी. डोळ्यांचे व्यायाम आणि उपाय डोळे विस्फारून किंवा मोठे करुन बुब्बुळे वरती न्या. मग हळुहळू बुब्बुळे खाली आना आणि गोल गोल फिरवून वरच्या दिशेन बघा असे करताना डोळे शक्य तितके विस्फारायचे आणि एकदम हळू हळू संथ गतीने ही क्रिया करायची.