लाडक्या बाप्पा ला निरोप, गणेश विसर्जन कथा
विसर्जनाला देवा तुझ्या रे || डोळे हे भरतात पाण्यामधी || आज आपल्या लाडक्या बाप्पा ला निरोप देताना असं वाटते की बाप्पा अजून काही दिवस राहावे, मन भरून येत बाप्पा ला निरोप देताना आज अनंत चतुर्दशी, अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात. महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात. भाद्रपद शुध्द चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा केली जाते. म्हणूनच हे अनंत चतुर्दशी म्हणून ओळखले जाते. तर उपवास करून एखाद्या व्यक्तीला अनेक पटीने अधिक शुभ परिणाम सुद्धा मिळतात. या वर्षीची अनंत चतुर्दशी कोरोना 19 मधे मंगळवार 1 सप्टेंबर रोजी आली. बरेच भक्त आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात. ...