लाडक्या बाप्पा ला निरोप, गणेश विसर्जन कथा

      विसर्जनाला देवा तुझ्या रे ||

      डोळे हे भरतात पाण्यामधी ||


आज  आपल्या लाडक्या  बाप्पा ला निरोप देताना असं वाटते की बाप्पा अजून काही दिवस राहावे, मन भरून येत बाप्पा ला निरोप देताना 

          आज अनंत चतुर्दशी, अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात. महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात. भाद्रपद शुध्द चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा केली जाते. म्हणूनच हे अनंत चतुर्दशी म्हणून ओळखले जाते. तर  उपवास करून एखाद्या व्यक्तीला अनेक पटीने अधिक शुभ परिणाम सुद्धा मिळतात. 

या वर्षीची अनंत चतुर्दशी कोरोना 19 मधे मंगळवार 1 सप्टेंबर रोजी आली. 

        बरेच भक्त आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात.

       महाभारतात पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला. अशी कथा आहे.

      भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात. या दिवशी घरोघरी बसवलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. आपल्या लाडक्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात पाठवणी केली जाते.


अनंत चतुर्दशी पूजा


अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुख्यतः भगवान विष्णूच्या असीम रूपाची पूजा केली जाते. लोक या दिवशी व्रत ठेवतात. या दिवशी, उपवास करणारे पुरुष त्यांच्या उजव्या हातात अनंत धागा आणि डाव्या हातात स्त्रिया धारण करतात. हा धागा 14 गाठ्यांचा आहे. या 14 गाठी भगवान श्री विष्णूने निर्मित 14 जगाचे प्रतिनिधित्व करतात.



अनंत चतुर्दशी: 

गणपती विसर्जन दिवस


22 ऑगस्ट 2020 रोजी गणेश चतुर्थीनिमित्त ज्यांनी 10 दिवसांसाठी गणपती बाप्पाची स्थापना केली ते 1 सप्टेंबर रोजी वाहत्या पाण्यात किंवा घरातच गणेश मूर्तीचे विसर्जन करुन बाप्पा ला निरोप द्यावा 




हिंदू पुराणातील अख्यायिकांनुसार, गणरायाची आई माता पार्वती बाळ गणेशाला पुन्हा कैलाश पर्वतामध्ये घेऊन जाण्यासाठी पृथ्वीतलावर गौराईच्या रूपामध्ये येते. दरम्यान 3 दिवस माहेरी राहिल्यानंतर गौराईला गणरायासोबत निरोप दिला जातो. त्यावेळेस बाप्पाकडे पुढल्या वर्षी लवकर या! अशी प्रार्थना करून निरोप देण्याची प्रथा आहे. मग यंदा देखील बाप्पाकडे तो पुन्हा आपल्या घरी परताना तुमची सारी दु:ख, वेदना, संकटं, त्रास घेऊन जात पुन्हा नव्याने, जोमाने सुरूवात करण्याची शक्ती तुम्हांला देवो! ही कामना करत निरोप द्यायला सज्ज व्हा!


गणपती बाप्पाला निरोप देताना घरामध्ये उत्तरपूजा केली जाते. बाप्पासोबत शिदोरी देऊन त्याची आरती करून विसर्जनासाठी बाहेर काढलं जातं. आगमनासारखीच विसर्जनादेखील मोठी धामधूम असते. तासनतास गणरायाचा जयघोष करत बाप्पाची मिरवणूक निघते. मात्र यंदा हा मिरवणूकीचा धुमधडाका नसेल. महाराष्ट्रासह जगभर कोरोनाचं सावट असल्याने सध्या साधेपणानेच गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे विसर्जनदेखील अत्यंत मोजक्या लोकांमध्येच नदी, पाणवठा, समुद्र, कृत्रिम तलावं किंवा अगदी घरच्या घरी केले जाईल.


गणपती बाप्प्पा हे आबालवृद्धांचं आवडतं दैवत आहे. त्यामुळे त्याच्या विसर्जनाला अनेक गणेशभक्तांचे डोळे पाणावतात. मात्र जड अंतकरणाने आणि बाप्पा मोरयाच्या जयघोषामध्ये बुद्धीची देवता, संकटमोचक गणरायाला निरोप देऊनच या उत्सवाची सांगता केली जातो. त्यामुळे जगभरातील गणेशभक्तांना बाप्पा जाता-जाता कोरोना संकटातून मुक्त करून जाईल अशी प्रार्थना करून त्याच्या चरणी माथा ठेवा!

        गणपती बाप्पा मोरया ||

        पुढच्या वर्षी लवकर या ||

विसर्जन कथा 

गणेश विसर्जन कथा, बाप्पा ला निरोप

Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन