Posts

जागतिक योग दिवस

Image
           जागतिक योग दिवस          आज जागतिक योग दिवस योग ही भारतीयांना ऋषीमुनींनी दिलेली देणगी आहे. निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत थोडासा वेळ आपण आपल्या शरीरासाठी देणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम व योगासने,प्राणायाम यांचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. करिता प्रत्येकाने योगासने करणे गरजेचे आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. यावर विस्तृत चर्चा होवून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला. भारतीय धर्म संस्कृतीमधील “योग” संकल्पनेची मांडणी श्रीमदभगवद्गीता ग...

वजन वाढलं अशी घ्या काळजी

Image
लठ्ठपणा वाढला आहे?अशी घ्या काळजी आहार विहार आणि उपचारा द्वारे      आज मी तुम्हाला लठ्ठपणा म्हणजे काय? तो कसा वाढतो आणि तो कसा नियंत्रित केला जातो हे सांगणार आहे तसेच लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणते उपाय आहेत यावरही मार्गदर्शन कारणार आहे.        आजच्या मोबाईल आणि कॉम्पुटरच्या काळात मनुष्यप्राणी स्वतःकडे आणि स्वतःच्या तब्येतीची  काळजी घ्यायला विसरला आहे, सकाळी उठल्या पासून तर रात्री झोपी जाईपर्यंत हातात मोबाईल आणि कॉम्पुटर, तसेच बालक आणि वृद्ध सतत टीव्ही बघत असतात त्यामुळे रोगराई आणि विशेष म्हणजे लठ्ठपणा वाढत चाललेला आहे.   लठ्ठपणा म्हणजे काय किंवा तो कसा वाढतो   स्त्रियांमध्ये 35शी नंतर पोट मांड्या या मधे चरबी कशी वाढते        लठ्ठपणा ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीराच्या विविध भागांवर जास्त प्रमाणात चरबी  जमा होते ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो, तसेच शरीरात  जडपणा येतो त्यामुळे त्या व्यक्तीला दिवसभर आळस व चिडचिड होते किंवा चालतना त्रास होतो दोन्ही मांड्या एकमे...

निरोगी शरीरासाठी सर्वांगासन

Image
                 सर्वांगासन ( संग्रहित छायाचित्र )        निरोगी शरीरासाठी सर्वांगासन सर्वांत फायदेशीर आसन आहे, शरीराचे सर्व स्नायू व अवयवांना व्यायाम मिळत असल्यामुळे या आसनाला "सर्व+अंग+आसन=सर्वांगासन असं म्हणतात. आसन कसे करायचे कृती पाठीवर सरळ झोपा, दोन्ही पाय एकमेकांना जोडून हात शरीराला चिटकून ठेवा  नंतर श्वास रोखून धरून दोन्ही पाय कुठेही न वाकविता हळू हळू वर उचला. पाय जितके वर जातील तितके हळू हळू वर जाऊ द्या नंतर दोन्ही हात कोपरात वाकवून त्या हातांनी पाठीला आधार द्या या आधाराने पाय अजून उंच न्या. पाय, नितंब व पाठ सरळ रेषेत ठेवा. मान व खांदे जमिनीला टेकलेले असू द्या.त्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आपले बॅलेन्स जाईल किंवा पाय वर नेताना शरीर डगमगत असेल तर आपली दृष्टी पायाच्या अंगठ्यावर स्थिर ठेवा. त्यामुळे शरीराचा तोल जाणार नाही,याची काळजी घ्या. श्वासोच्छवास नेहमीच नॉर्मल ठेवा.आता संपूर्ण शरीराचा भार खांद्यावर येऊ द्या. ...

कोकिळा व्रत कथा

Image
            कोकिळा गौरीची कहाणी          कोकिळा व्रताची कहाणी ही श्री भगवान शंकर आणि त्यांची अर्धांगिनी दाक्षायणी यांच्या विषयी आहे.         एक दिवस दक्ष प्रजापती यांनी महायज्ञ करायचे ठरवले होते.त्यासाठी दक्ष प्रजापतीनी सर्व देव-गंधर्वांना आमंत्रण दिले होते, परंतु आपली कन्या दाक्षायणीला व शंकरांना बोलावले नाही.      शंकरांनी दक्षयानी जाऊ नको' म्हणत असताही दाक्षायणी तशीच यज्ञ मंडपाच्या दाराशी आली.        दक्षानं तिचं स्वागत काही केलं नाही. त्यामुळे तिचा अपमान झाला; म्हणून दक्षायांनी संतापून गेली. व धावत जाऊन तिनं यज्ञकुंडात उडी घेतली आणि दाक्षायणी जळून खाक झाली आणि त्याच वेळी नारदानं शंकराला ती वार्ता कळवली.          शंकरानी रागाने त्यांची जटा शिलेवर आपटली. आणि शिळेतून वीरभद्राची भयंकर मूर्ती प्रगटली. शंकरांनी वीरभ्रदाला   व आपला पुत्र गणपतीला सुद्धा यज्ञमंडपात आणले व यज्ञाचा विध्वंस केला.तसेच देव गंधर्वांचे हात-पाय तोडले. मंडप फाड...

महिलांसाठी उखाणे

Image
, मकरसंक्रांती उखाणे

भुलाबाईची गाणी उभ गंध विष्णु जसे

Image
                भुलाबाईची गाणी          भुलाबाई भुलाबाई सासरे कसे भुलाबाई भुलाबाई सासरे कसे, सासरे कसे? उभ गंध विष्णू जसे विष्णू जसे… भुलाबाई भुलाबाई सासू कशी सासू कशी कमळातून निघाली लक्ष्मी जशी लक्ष्मी जशी… भुलाबाई भुलाबाई नणंद कशी नणंद कशी हातात तलवार देवी जशी देवी जशी… भुलाबाई भुलाबाई दीर कसे दीर कसे हातात मुरली कृष्ण जसे कृष्ण जसे… भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी जाऊ कशी कृष्णच्या मांडीवर राधा जशी राधा जशी… भुलाबाई भुलाबाई पती कसे पती कसे जटेतून गंगा शंकर जसे शंकर जसे… भुलाबाई भुलाबाई आपण कशा आपण कशा  शंकराच्या मांडीवर पार्वती जशा पार्वती जशा… भुलाबाई भुलाबाई मुल कस मुल कस वाकडी सोंड गणपती जस गणपती जस… Video बघण्यासाठी click करा👇 https://youtu.be/2GOzhVQXavE भुलाबाईची गाणी

भुलाबाईची गाणी एके दिवशी काऊ आला बाई

Image
                  भुलाबाईची गाणी               एके दिवशी काऊ आला नदीच्या काठी राळा पेरला बाई राळा पेरला एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला एकच कणीस तोडून नेल बाई तोडून नेल सईच्या अंगणात टाकून दिल बाई टाकून दिल सईन उचलून घरात नेल बाई घरात नेल कांडून कुंडून राळा केला बाई राळा केला राळा घेऊन बाजारात गेली बाई बाजारात गेली चार पैशाची घागर आणली बाई घागर आणली घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली मधल्या बोटाला विंचू चावला बाई विंचू चावला आला गं सासरचा वैद्दय हातात काठी जळक लाकूड पायात जोडा फाटका तुटका नेसायचं धोतर फाटक तुटक अंगात सदरा मळलेला डोक्यात टोपी फाटकी तुटकी तोंडात विडा शेणाचा कसा गं दिसतो बाई म्हायरावाणी गं बाई म्हायरावाणी आला गं माहेरचा वैद्दय हातात काठी पंचरंगी पायात जोडा पुण्यशाई नेसायचं धोतर जरीकाठी अंगात सदरा मलमलचा डोक्यात टोपी भरजरी तोंडात विडा लालेला कसा गं दिसतो बाई राजावाणी गं बाई राजावाणी  Video बघण्यासाठी Click kara👇 भुलाबाईची गाणी एके दिवशी काऊ आला बाई