Posts

माता आणि शिशु स्वास्थ

          माता आणि शिशु स्वास्थ        स्त्रीच्या आयुष्यात गर्भधारणा हा एक फार महत्त्वाचा काळ असतो. या काळात जर स्त्री ने विशेष काळजी घेतली तर माता आणि बाळ दोघेही स्वास्थ राहतील.म्हणुन आई आणि गर्भातील बाळाची सर्वात जास्त काळजी घेण्याची आवश्यक असते.     गरोदरपणात आईला अनेक शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते.  जर वेळेत निराकरण न झाल्यास त्यांचे नवजात मुलावर दुष्परिणाम होऊ शकतात.     माता आणि बाळ सुरक्षित व सुधृढ राहावे या साठी योगा आणि निसर्गोपचार पद्धती  सुरक्षित तर आहेतच तसेच सहज आणि सोप्या सुद्धा आहेत आणि जर गर्भारपणात काही दुष्परिणाम झाले असतील तर या समस्या दूर करण्यास मदत करतात.  एवढेच नाही तर गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत सर्व टप्प्यात मदत होते. गरोदरपणात पाळावयाच्या इतर टिप्स      गरोदरपणात स्त्री ने अध्यात्मिक आणि आशावादी विचारांवर ध्यान केंद्रित करायला पाहिजे तसेच एखाद्या महापुरुषांचे आध्यात्मिक विचार आणि...

शक्तीवर्धक पालक

Image
               शक्तीवर्धक पालक      सर्वाना परिचित असणारी पालेभाजी म्हणजे पालक लहानांन पासुन ते मोठ्या पर्यंत ही भाजी आवडीची भाजी आहे, आपण सर्वच जण पालकची भाजी खाउनच मोठे झालो आहोत असे म्हणायला हरकत नाही कारण आपल्या घरातील बुजुर्ग मंडळी आपल्याला लहानपणा पासुन सांगत आले आहेत की पालक  भाजी खाल्याने खुप ताकद, येते शक्ति येते, पालक खात जा तुला स्ट्रॉंग व्हायचं ना?  तसेच  लहान असताना कार्टुन मध्ये सुद्धा पालक खाल्याने खुप ताकद येते  हे पण आपण कार्टुन बघूनच  ही पाले भाजी मोठ्या आवडीने खाल्ली आहे.              पालेभाज्यांमध्ये पालकची भाजी गुणांनी श्रेष्ठ मानली जाते कारण या भाजीत आरोग्यदायी गुण सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतात.         भारतात प्राचीन काळापासून पालकची लागवड केली जाते तसेच युरोप  अमेरिका व आशियातील काही भागा मध्ये पालकची लागवड मोठ्या प्रमाणात केल...

पौष्टीक मूग खाण्याचे फायदे.

Image
          पौष्टीकतेने भरपूर असलेले मूग                 खाण्याचे फायदे       कडधान्यांमध्ये सर्वश्रेष्ठ समजले जाणारे धान्य म्हणजे मूग, सर्वांच्या परिचयाचे असलेले मूग हे कडधान्य पौष्टीकतेने भरपूर आणि त्याच्या विशिष्ठ गुणांमुळे श्रेष्ठ समजले जाते  विविध भाषेत  इंग्लिश  -mung /green gram/mooung संस्कृत -मुदग  मराठी -मूगडाळ  गुजराती -मगनी दाल    मूगाची लागवड        पावसाच्या सुरवातीला पावसाळी पीक म्हणुन मूगाची लागवड केली जाते, शेतकी तज्ज्ञांच्या मते, सर्वसाधारण मूगाला कोणत्याही प्रकारची जमीन लागते.. परंतु हलकी , सुपीक , आणि मध्यम प्रतीची जमीन असेल तर पीक चांगले येते, तसेच बाजरी आणि ज्वारी बरोबर मिश्र पिक म्हणूनही मूगाची लागवड केली जाते.           हिवाळ्यात जे मूग पेरतात ते थोडे लालसर मूग असतात परंतु खाण्यासाठी हिरवे मूगच श्रेष्ठ सम...

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

Image
         दालचिनीचे औषधी गुण  Medicinal properties of cinnamon     प्राचीन काळापासून रोजच्या वापरातील मसाल्या मध्ये दालचिनीचा वापर केला जातो.  मसाला  सुगंधी आणि स्वादिष्ट होण्यासाठी तसेच मुखशुद्धी साठी दालचिनीचा  वापर सर्रास होतो.  इंग्लिश मधे -cinnamon मराठी -दालचिनी  गुजराती  -दालचिनी  संस्कृती -त्वचं दालचिनी उत्पादन आणि लागवड       दालचिनीची झाड सिलोन मध्ये मोठ्या प्रमाणात होतात, या ठिकाणी आपल्याला दालचिनीचे मोठ-मोठे मळे पाहायला मिळतात.  तसेच चीन, जपान या देशात सुद्धा दालचिनीचे उत्पादन भरपूर प्रमाणात होते,  झाड (tree)              दालचिनीचे झाड  साधारण 7 ते  8 फूट उंचीचे असते.काही ठिकाणी 30 ते 35 फूट पाहायला मिळते.   पाने, फुल,  फळ         या झाडाची पाने सुगंधी, गुळगुळीत आणि चमकदार असतात. थोडे...