माता आणि शिशु स्वास्थ

         माता आणि शिशु स्वास्थ




       स्त्रीच्या आयुष्यात गर्भधारणा हा एक फार महत्त्वाचा काळ असतो. या काळात जर स्त्री ने विशेष काळजी घेतली तर माता आणि बाळ दोघेही स्वास्थ राहतील.म्हणुन आई आणि गर्भातील बाळाची सर्वात जास्त काळजी घेण्याची आवश्यक असते. 


   गरोदरपणात आईला अनेक शारीरिक आणि मानसिक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते.  जर वेळेत निराकरण न झाल्यास त्यांचे नवजात मुलावर दुष्परिणाम होऊ शकतात.


    माता आणि बाळ सुरक्षित व सुधृढ राहावे या साठी योगा आणि निसर्गोपचार पद्धती  सुरक्षित तर आहेतच तसेच सहज आणि सोप्या सुद्धा आहेत आणि जर गर्भारपणात काही दुष्परिणाम झाले असतील तर या समस्या दूर करण्यास मदत करतात.  एवढेच नाही तर गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत सर्व टप्प्यात मदत होते.


गरोदरपणात पाळावयाच्या इतर टिप्स



     गरोदरपणात स्त्री ने अध्यात्मिक आणि आशावादी विचारांवर ध्यान केंद्रित करायला पाहिजे तसेच एखाद्या महापुरुषांचे आध्यात्मिक विचार आणि चरित्रे वाचली पाहिजेत आणि नेहमी आनंदी राहायला हवे.  बरेच वेळेला गर्भवती महिला चिड चिड करतात, तर चिडचिड,मत्सर, राग न करता शांत राहावे,आणि वाईट विचार व लैंगिकता यापासून दूर राहिले पाहिजे.  तसेच कुसंग सोडून देणे आणि चांगल्या लोकांशी संगत केली पाहिजे.मन शुद्ध आणि शांत ठेवले पाहिजे.


अपत्यप्राप्तीसाठीचे नियोजन


प्रत्येक माता पित्याला वाटते आपले होणारे बाळा सुंदर, सुदृढ,गोबरे गोबरे, गुटगुटीत गोरेपान असायला हवे. 

       बाळाच्या आरोग्याची काळजी त्याच्या जन्मानंतरच सुरु होते असे नाही तर गर्भधारणा होण्यापूर्वीच आई वडिलांनी शरीर आणि मनाने सुदृढ असण्याची गरज असते.आपल्या शारीरिक व मानसिक व्याधीनचा वारसा घेऊन मुलं जन्माला येऊ नये यासाठी आई वडील दोघांनी दक्ष राहायला पाहिजे.


         

 बाळ सुंदर निरोगी जन्माला यावं या साठी बेडरूममध्ये चांगली चित्रे लावावीत व  त्या चित्राकडे पाहून सकारात्मक गोष्टी करुन बाळाच्या भवितव्या विषयी बोलावे असे केल्यास जन्माला येणाऱ्या बाळावर याचा सकारात्मक परिणाम होतो.




 मातापित्यांनी मुलांच्या भविष्याचा विचार करूनच अपत्यप्राप्ती चे नियोजन करायला हवे तर त्यासाठी खालील पद्धतीने नियोजन करायला पाहिजे


 गर्भधारणेपूर्वी

गर्भावस्तेत आणि

अपत्य प्राप्तीनंतर


 गर्भधारणेपूर्वी


 गर्भधारणेपूर्वी स्त्रीला चार ते आठ मासिक पाळी नियमित पणे आल्या पाहिजे


 बालकाचा जन्म केवळ अपघात म्हणून होऊ न देता तो पूर्वनियोजित असला पाहिजे

 गर्भधारणेपूर्वी माता-पित्याने  सोना चांदी चांदी तांबं किंवा लोह  याचे पाणी रोज प्यायला पाहिजे.


 तीन ग्लास पाण्यामध्ये सोने,चांदी,तांबे या पैकी एक तुकडा टाकावा व ते पाणी आटवून 1 ग्लास करावे, आणि ते पाणी थंड किंवा जमेल तसे कोमट करुन प्यावे.


     गर्भावस्थेत

 गर्भवती महिलेचा आहार


     आहार पौष्टिक, संतुलित आणि सात्विक असावा. तसेच आहार ठरवण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे:


 1) आईसाठी पोषक घटक असलेला आहार 

 2)गर्भाच्या वाढीसाठी पोषक आहार 

3) गर्भाच्या विकासासाठी पोषक आहार 

 4) आईच्या गर्भाशय व स्तन विकासासाठी आहार                    

5) अम्नीओटिक द्रवपदार्थाच्या विकासासाठी आहार.


6) गर्भवती महिलेने पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.


7) जेवणानंतर अर्धा तास चालावे 



      जर आहार नियोजन नीट नसेल किंवा अनियमित असेल तर गर्भातील बाळाला अशक्तपणा येऊ शकतो किंवा बाळाला मुडदूस आणि बाळ कुपोषणास बळी पडू शकतो 



गर्भधारणा आणि सामान्य प्रसूतीसाठी योगा थेरपी टिप्स:


वज्रासन, सुखासन, ताडासन, शवासन इत्यादी सुलभ आणि आरामदायक आसनांचा सराव करावा 


प्राणायाम



     शुद्ध आणि ताज्या हवेमध्ये जिथे खेळती हवा असेल तिथे सुखसना मध्ये बसून नियमित सकाळी आणि संध्याकाळी 10-10 मिनिटे  ध्यान करावे.


अनुलोम विलोम प्राणायाम करावा.


 प्रतिबंधित:


कपालभाती

उदियान बंध

नौली

 कुंजल

 सूर्यनमस्कार आणि कठीण आसनांचा सराव करू नये आणि शरीराच्या कोणत्याही भागाला वेदना किंवा तणाव निर्माण करणाऱ्या कोणत्याही क्रियाकलापांचा सराव करू नये .



गर्भधारणा आणि सामान्य प्रसूती उपचारांसाठी निसर्गोपचार टिप :


मॉर्निंग वॉक

थंड कॅटिस्नान 

सन बाथ

हलके आणि सात्विक शाकाहारी अन्न घ्या.  भरपूर ताजी हंगामी फळे आणि हिरव्या पालेभाज्या खा.


गर्भवती महिलेचा आहार 

 सकाळी 5 ते 6 पर्यंत आहाराचे स्वरूप


न्याहारी आणि दैनंदिन क्रियाकलाप, आसने / प्राणायाम / जॉगिंग / ध्यान


नाश्ता 7 ते 8


हंगामी फळे - सफरचंद, नाशपाती, चिकू, केळी, पेरू आणि दूध / दूध + मनुका आणि अंजीर अंकुरलेले मूग, गहू, रताळी, शेंगदाणे, खजूर पालक सूप.


जेवण 11 ते 12 वाजेपर्यंत -


 भरड पिठाची भाकरी,

कमी तेल - मसाल्यासह हिरव्या भाज्या,

मूग डाळ / ताजे लोणी / हिरव्या भाज्यांचे सूप, आवळा + हिरवी धने चटणी.  हंगामी फळे किंवा गाजराचा रस


दुपारी 3 ते 4


चहा /दूध 


रात्रीचे जेवण 6 ते 7वाजेपर्यंत


खडबडीत पीठाची भाकरी

कमी तेल - मसाल्यांसह हिरव्या भाज्या, कोशिंबीर किंवा गव्हाचा दलिया + हिरव्या भाज्या / दही / हिरव्या भाज्यांचे सूप. 


प्रतिबंधित आहार:


 चहा, कॉफी, साखर / बुरा, मैदा ची उत्पादने, गरम मसाले, तळलेले पदार्थ अंडी, मांस इत्यादी पचण्यायोग्य आहार घेऊ नये


          आवश्यकतेनुसार आपल्या आहारात चीज, सुकामेवा - बदाम, काजू, अक्रोड आणि शेंगदाणे घेऊ शकता .



 वरील आहार तक्त्यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक बदल केले जाऊ शकतात.  .  जेव्हा आवश्यक असेल तेव्हा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या याची खात्री करा.



प्रसुतिपश्चात उपचार


जॉगिंग

सूर्य नमस्कार

हलकी मालिश

 हलका आणि सात्विक आहार, त्यात शक्यतो शाकाहारी अन्न घ्या.

 भरपूर ताजी हंगामी फळे आणि हिरव्या पालेभाज्या खा.



 गर्भवती महिला आणि स्तनदा मातांचा आहार


  कोंडा असलेली कणिकेची भाकरी किंवा पोळी


अंकुरलेले धान्य -


मूग

गहू

मटकी


     वरील धान्य 8 तास भिजत घालून नंतर ते एका कॉटन च्या कपड्यात बांधून ठेवावे हे धान्य चांगले अंकुरले की मग सेवन करावे.


फळ


रताळी, गाजर

गोड पदार्थ

शेंगदाणे आणि मेथीचे लाडू


सुकामेवा



खजूर, अंजीर, मनुका, काजू, बदाम,  अक्रोड,


 हंगामातील ताजी भाजी आणि फळे यांचा समावेश करावा 


रसदार फळे

संत्रा,

लिंबूपाणी

नारळाचे पाणी

तसेच ताक, मठ्ठा याचे सेवन नियमित करावे 


प्रसूतीनंतर योगासन


प्रसूतीनंतर अंदाजे एक महिना: सामान्य (नॉर्मल डिलिव्हरी) बाळंतपणानंतर


भुजंगासन

 उत्तानपादासन

कोनासन

 ताडासन

 ऊर्ध्वहस्तोत्नासन

शवासन

यासारखे सहज आणि सोपे आसन करावी.

Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन