पौष्टीक मूग खाण्याचे फायदे.

        पौष्टीकतेने भरपूर असलेले मूग 

               खाण्याचे फायदे 










     कडधान्यांमध्ये सर्वश्रेष्ठ समजले जाणारे धान्य म्हणजे मूग, सर्वांच्या परिचयाचे असलेले मूग हे कडधान्य पौष्टीकतेने भरपूर आणि त्याच्या विशिष्ठ गुणांमुळे श्रेष्ठ समजले जाते 



विविध भाषेत 

इंग्लिश  -mung /green gram/mooung

संस्कृत -मुदग 

मराठी -मूगडाळ 

गुजराती -मगनी दाल 


 मूगाची लागवड 



     पावसाच्या सुरवातीला पावसाळी पीक म्हणुन मूगाची लागवड केली जाते, शेतकी तज्ज्ञांच्या मते, सर्वसाधारण मूगाला कोणत्याही प्रकारची जमीन लागते.. परंतु हलकी , सुपीक , आणि मध्यम प्रतीची जमीन असेल तर पीक चांगले येते, तसेच बाजरी आणि ज्वारी बरोबर मिश्र पिक म्हणूनही मूगाची लागवड केली जाते.  

        हिवाळ्यात जे मूग पेरतात ते थोडे लालसर मूग असतात परंतु खाण्यासाठी हिरवे मूगच श्रेष्ठ समजले जाते. 



मूगाचे रोप 



       याचे रोप साधारणत: दीड ते दोन फूट उंच असते. आणि पाने  बेलाच्या पानां सारखी 3- 3 असे  असतात. पण गोलाकार आणि हिरवी असतात शेंगा पण हिरव्या रंगाच्या आणि फुले पिवळ्या रंगाची असतात. 



     हिरव्या रंगाचे मूग स्वादिष्ट  असल्यामुळे ते अत्यंत श्रेष्ठ समजले जातात कारण हिरवे मूग  आजारात गुणकारी आहे. 


आयुर्वेदामध्ये 


आयुर्वेदामध्ये मुगाची खूपच प्रसंशा केली गेली  आहे. 


      चरक आणि सुश्रुतांच्या मते काळे मूग, लाल मूग, पांढरे मूग आणि जंगली मूग ह्यांच्या तुलनेत हिरवे मूग अधिक गुणकारी आहे. 


मूगात सगळे मूग, मोगर आणि सोला असे भाग असतात 


सगळे मूग 


 या मध्ये   तांबे, मॅंगनीज,  पोटॅशियम आणि झिंकबरोबर व्हिटॅमिन बी असते .


     पौष्टिकतेच्या गुणवत्ते मुळे, मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयरोगासह अनेक जुनाट आजारांपासून बचाव करण्यासाठी सगळे मूग  खूप फायदेशीर मानले जाते.


     जर सगळे मूग  पाण्यामध्ये  3 ते 4 तास भिजवून नंतर ते एका फडक्यात  बांधून  ठेवल्यास  आणि नंतर त्यावर थोडे थोडे  पाणी  शिंपडल्यास  एका दिवसात मूग अंकुरित होतात. 


     अंकुरित झालेल्या मुगाचे पौष्टिक आणि औषधी गुणधर्म वाढतात .  अंकुरलेले मूग पचण्यास हलके  असून  त्यावर निंबू रस आणि मिरे पॉवडर टाकून सेवन केल्यास आरोग्यास हितकारक असतात 


मूग डाळ 






     बरेच ठिकाणी मुगाच्या डाळीची आमटी किंवा वरण केले जाते किंवा आजारी माणसाला मुगाच्या डाळीचे वरण करुन ते  प्यायला देतात. 



           मुगाच्या डाळीची खिचडी पचण्यास हलकी आणि पौष्टीक असल्यामुळे अशक्त व्यक्तीस दिल्यास हितकारी आहे. 



     

      वजन कमी करण्यासाठी किंवा शरीराची चरबी वाढू नये म्हणून रोज आहारात अंकुरित मुगाचा   समावेश करावा.  मुग हे शरीरातील चरबी  कमी  करण्यास  आणि  वजन संतुलित राखण्यात मदत करते.

 

         याशिवाय अंकुरित  मुगांचे सेवन केल्यास जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर नियंत्रण मिळवता येत 




     अंकुरित झालेले मूग नियमित सेवन केल्यास आरोग्य चांगले राहते.


       मूगातील मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशिअम तसेच एमिनो अ‍ॅसिड आणि पॉलिफेनॉल्ससारखी तत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे  अनेक आरोग्यदायी फायदे होतात. 


        मूगडाळीत व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई असते. रोज सकाळी जर अंकुरित मूग नियमित सेवन केल्यास बरेच फायदे होतात. ते जाणून घेवूयात.


मूग सेवनाचे फायदे


      रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.


     आहारात मुगाचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढते. व आजारांशी लढण्याची शक्ती / बळ मिळते.




पोटदुखी मध्ये आराम 


     यातील फायबरमुळे पोटाचे विकार, पोटदुखणे, पोटात कळ येणे ह्या सारख्या समस्या दूर  होतात. 


 पचनक्रिया


     शरीरातील टॉक्सिक बाहेर काढण्यास मदत होते. पचनक्रिया चांगली राहते.


त्वचा


     यातील सायट्रोजन शरीरात कोलेजन आणि एलास्टिन कायम ठेवतात. याने चेहऱ्यावर वय दिसून येत नाही.चेहऱ्यावर सुरुकुत्या, काळे डाग,  उन्हामुळे काळवंडलेला चेहरा, डोळ्याखाली सुरुकुत्या किंवा डोळ्याखालील काळे वर्तुळ असतील तर ह्या समस्या दूर होऊन  चेहरा नेहमी प्रफुल्लित व  चमकदार राहतो.


ब्लड ग्लूकोज


     शरीरात इन्सुलीन लेव्हल वाढण्यात मदत मिळते. ब्लड ग्लूकोज नियंत्रणात राहते. डायबिटीजची समस्या कमी होते.


हृदय रोग  


     रोज आहारात अंकुरित मुगाचे सेवन केल्यास हृदय रोगांपासून बचाव होतो हृदयरोग दूर करण्यासाठी अंकुरित  मुगाचा नियमित समावेश केला पाहिजे,  याचा शरीरावर अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येतो.


      तज्ज्ञांच्या मते मूगामध्ये हृदयाला होणाऱ्या गंभीर आजारांपासून वाचवण्याचा  विशेष गुणधर्म असतो. त्यामुळे अश्या रुग्णांनी ज्यांना हृदय विकार आहे किंवा हृदयाच्या समस्या आहेत अश्या रुग्णांनी आपल्या आहारात नियमित अंकुरित मुगाचे सेवन करावे. 

      

        मूग रुक्ष, हलके आणि जुलाबात गुणकारी आहे, तसेच ते कफ व पित्तनाशक असून प्रकृतीने थंड असे आहे, 


  डोळ्यांसाठी


अंकुरित मूग खाल्ल्यास हितकारक आहे. 


आजारी व्यक्तीस 


मुगाच्या  खिचडी मध्ये जिरे व तुपाची फोडणी टाकून दिल्यास आरोग्यदायी ठरते, तसेच मुगाचे वरण करुन त्या पाण्यात सैंधव घालून दिल्यास तब्येतीत  लवकर सुधारणा होते. 


मुगाचे पौष्टीक लाडू 


मूग थोडे भाजून त्याचे पीठ करावे व परत ते पीठ,   तुपात खमंग भाजून, त्यात गूळ सुका मेवा टाकून लाडू करावा व  तो लाडू रोज सेवन केल्यास प्रकृती एकदम ठणठणीत राहते. रोगी व्यक्तीस दिल्यास तो आजारातून लवकर बरा होतो, अशक्त व्यक्तीस दिल्यास अश्या  रुग्णाची प्रकृती लवकर ठीक होते. 

     मुगाचे लाडू शितल, वीर्यवर्धक, वातपित्ताशामक असतात. मुगाचे लाडू हिवाळ्यात खाल्यास अधिक पौष्टीक असतात. 


How to make mung laddu 

खालील व्हिडिओ पहा 👇





मुगाचे पौष्टीक चॉकलेटी लाडू

     मुगाची आमटी खिचडी, पापड व मुगाचे सांडगे आणि मूग वड्यापण  बनवले जातात. तसेच मूग वाफवून त्याची उसळ पण बनवली जाते. मुगाचे सेवन ठंडी मध्ये  केल्यास आरोग्यदायक असते 


मुगाचे ऑम्लेट किंवा धिरडे कसे करतात ते पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा 👇








मुंग ऑम्लेट /मुगाचे धिरडे /मुगाचे पराठे

पोषक मूल्य 



पोषक मूल्य प्रति 100 ग्रा.(3.5 ओंस)

उर्जा 110 किलो कैलोरी   440 kJ

कार्बोहाइड्रेट        19.15 g

- शर्करा 2.00 g

- आहारीय रेशा  7.6 g  

वसा    0.38 g

प्रोटीन    7.02 g

विटामिन C  1.0 mg    2%

कैल्शियम  27 mg    3%

मैगनीशियम  0.298 mg    0% 

फॉस्फोरस  99 mg    14%

पोटेशियम  266 mg      6%








Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन