शक्तीवर्धक पालक

              शक्तीवर्धक पालक





     सर्वाना परिचित असणारी पालेभाजी म्हणजे पालक लहानांन पासुन ते मोठ्या पर्यंत ही भाजी आवडीची भाजी आहे, आपण सर्वच जण पालकची भाजी खाउनच मोठे झालो आहोत असे म्हणायला हरकत नाही कारण आपल्या घरातील बुजुर्ग मंडळी आपल्याला लहानपणा पासुन सांगत आले आहेत की पालक  भाजी खाल्याने खुप ताकद, येते शक्ति येते, पालक खात जा तुला स्ट्रॉंग व्हायचं ना?  तसेच  लहान असताना कार्टुन मध्ये सुद्धा पालक खाल्याने खुप ताकद येते  हे पण आपण कार्टुन बघूनच  ही पाले भाजी मोठ्या आवडीने खाल्ली आहे.

       

     पालेभाज्यांमध्ये पालकची भाजी गुणांनी श्रेष्ठ मानली जाते कारण या भाजीत आरोग्यदायी गुण सर्वात जास्त प्रमाणात आढळून येतात. 


       भारतात प्राचीन काळापासून पालकची लागवड केली जाते तसेच युरोप  अमेरिका व आशियातील काही भागा मध्ये पालकची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते  



       पालकची लागवड करण्यासाठी सर्व प्रकारची जमीन पालकला मानवते फक्त रेताड जमिनीत पालक उगवत नाही. 

     

पालक बी




पालकचे बी शितल असून ते कावीळ पित्तप्रकोप कफरोग, स्वसनाचे रोग व यकृत रोगासाठी हितावह आहे, तसेच पालकच्या बी मधुन घट्ट तेल निघते हे तेल कृमीवर व मूत्ररोगांवर फायदेशीर असते.


वैद्यच्या मते पालकचे बी आणि पालकची पाने यांचा काढा घेतल्यास फूप्फूस व स्वासनलिकेचा दाह या विकारान मध्ये आराम मिळतो 


        पालकच रोप 





रोप हे साधारण एक ते दोन फूट पर्यंत उंच होतात. 

       

शेतकी तज्ज्ञांच्या मते


     पालकच्या अनेक जाती असतात.ज्या रोपांवर झपाट्याने नवी पाने येतात किंवा ज्याला बिजदंड उशिरा येतो अशी भाजी उत्तम समजली जाते. 

        

         पालकची पेरणी वर्षातून 3 ते 4 वेळा केली जाते. बी पेरल्या नंतर साधारण 1 महिन्यात भाजी तयार होते. 


पालकच देठ 





पालकच देठ एक फुटापर्यंत असते व ते पोकळ व फिकट हिरव्या रंगाची असतात. 


पालकची पाने 





पान कोमल  जड , मांसल आणि हिरव्या रंगाची व साधारणत: त्रिकोणाकार असतात. 


पालकच फुल 





याची फुल आकाराने खूपच लहान लहान व झुपकेदार असतात. 


 पालक खाण्याचे फायदे


पालकच्या पानांन मध्ये भरपूर औषधी गुण असल्यामुळे याचा रोजच्या आहारात समावेश करावा. 


पालकच्या पानांचा रस काढुन रसाच्या गुळण्या केल्यास घश्यातील दाह दूर होतो.


पालक आतड्याच्या रोगांवर अत्यंत हितावह आहे.



वैद्यांच्या मते 


पालक मुतखडा विरघळून बाहेर काढतो हा पालकचा सर्वात मोठा गुण आहे. तसेच आतड्यातील रोगानवर पालक रामबाण आहे असेही काही तज्ञांचे मत आहे. 


    पालक भाजी एक पौष्टिक पालेभाजी असून  हिरव्या पालेभाज्या मध्ये नंबर एक वर ही भाजी मानली जाते  या भाजीचा आरोग्यास अनेक मार्गांनी फायदा झाला आहे. पालकमध्ये असलेले  ऑक्सिडेटिव्ह हे ताणतणाव कमी करू शकतो, तसेच डोळ्याचे विविध रोग पालक भाजी खाल्याने दूर होऊ शकतात  आणि हृदयविकारावर सुद्धा ही  भाजी चांगले कार्य करते. 


पालकमध्ये एक विशिष्ट असा घटक आहे जो प्राणीमात्रांची वृद्धी व बुद्धीचा विकास करतो.


    पालकमध्ये जीवनसत्व A B C आणि E तसेच प्रोटीन कॅल्शियम फॉस्फोरस क्लोरीन लोह, सोडियम असते.


       रक्तकणांची वाढ करणारे गुण पालक मध्ये भरपूर प्रमाणात आहे.


     पालकचा रस लहान मुलांना दिल्यास दुधाची उणीव भरून काढते, मुलं दूध पीत नसेल तर पालकचा रस लहान मुलांना द्यावा.



थकवा जाणवत असेल किंवा शरीरात ताकद नसेल तर नियमित आहारात पालक सेवन करावा,सलाद मध्ये पालक टाकून सेवन करू शकता. किंवा पालकची भाजी नियमित सेवन करुन शरीराची ताकद वाढवल्या जाते.
पालक भाजी कशी करायची खालील व्हिडिओ बघा

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन