Posts

जेष्ठा गौरी आवाहन

Image
        जेष्ठा गौरी आवाहन       अग या गवरीच्या महिन्यात        लागली गवर गवर गवर फुलायला        बंधू लागला लागला बोलायला        जातो बहिणीला आणायला  गणपतीच्या बाप्पा च्या आगमना बरोबरच गौरी चा सण   महाराष्ट्रात मोठया प्रमाणात साजरा होतो. गौरी माहेरवासी साठी एका दिवशी येतात, दुस-या दिवशी मिष्टान्नाचे जेवण  करतात व तिस-या दिवशी आपल्या घरी परत जातात. घरोघरी गणरायाचं आगमन झाल्यानंतर सर्व जण वाट बघत असतात ती गौरींच्या आगमनाची. भाद्रपद महिन्यात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे गौरी किंवा महालक्ष्मी   दरवर्षी ज्येष्ठा गौरीचे आवाहन भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर केले जाते. यंदा भाद्रपद सप्तमी मंगळवारी 25असून अनुराधा नक्षत्र दुपारी 1 वाजून 59 मिनिटांनंतर आहे. त्यामुळे दुपारी दोननंतर घरोघरी गौरींचे आगमन होणार आहे. गौरीपूजन भाद्रपद अष्टमीला ज्येष्ठा नक्षत्रावर केले जाते. बुधवारी  26 ज्...

नारळी पौर्णिमा महत्व आणि नारळी भात

Image
नारळी पौर्णिमा महत्व आणि नारळी भात                सागरे सर्व तिर्थानी  म्हणजेच नदीपेक्षा संगम व संगमापेक्षा सागर  जास्त पवित्र आहे .आणि सागराची  पूजा म्हणजेच वरुणदेवाची पूजा.  पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो , तेव्हा नारळी पौर्णिमा हा उत्सव साजरा करतात. श्रावणात नागपंचमी नंतर येणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा किंवा श्रावणी पौर्णिमा या दिवशी कोळी बांधव व समुद्र किनारी राहणारे लोक सागराची पूजा करतात. या दिवशी सोन्याचा मुलामा असलेले नारळ सागर देवतेला अर्पण करतात.                नारळ हे हिंदू धर्मात शुभ मानले जाते. त्यालाच आपण श्रीफळ सुद्धा म्हणतो श्री म्हणजे लक्ष्मी, आणि फळ म्हणजे नारळ.                 श्रावणातील ही पौर्णिमा समुद्र किनारी राहणाऱ्या लोकांसाठी आणि कोळी बांधवांसाठी एक उत्सव असतो, आणि ते हा उत्सव मोठ्या थाटामाटात आनंदाने साजरा करतात.   ...

तोंडलीच लोणचं , कुंदुरी का अचार

Image
             तोंडलीच लोणचं,               कुंदुरी का अचार  साहित्य  1)1पाव हिरवी ताजी तोंडली 2)2चमचे मेथीदाणे  3)2 चमचे मोहरीची डाळ  4)चवीपुरते मिठ  5)लोणचं मसाला  कृती  तोंडली स्वच्छ धूऊन घ्यावी, आणि स्वच्छ कोरडी पुसून घ्यावी नंतर तोंडलीचे दोन काप करावे, एका बाउल मधे तोंडली, मिठ आणि हळद घालून रात्रभर तसेच राहू द्यावे, दुसरे दिवसी जे पाणी सुटते ते काढुन घ्यावे, त्या तोंडली मधे वरील सर्व साहित्य टाकावे जसे आपण कैरीचे लोणचं करतो सेम तसेच, हे लोणचं वर्षभर टिकतं  तोंडलीच लोणचं हे तोंडलीच्या भाजी पेक्षा रुचकर लागते  तोंडली ही एक फळभाजी आहे लॅटिन भाषेत ह्या भाजीला  कोकसिनिया ग्रँडिस, हिंदी मधे कुंदुरी आणि मराठी मधे तोंडली, गुजराती भाषेत घिलोडा म्हणुन ओळखली जाते तोंडलीचा वेल असतो हा वेल 10 ते 12 वर्षा पर्यंत फळ देतो.   सुरुवातीला ही फळ हिरवी  असतात.पिकल्यानंतर ती लाल होतात.  याची सालं हिरवी आणि पांढरी असून साली मधे...

महारानी आहिल्याबाई होलकर पुण्यतिथी

Image
      महारानी अहिल्याबाई होलकर        पुण्यतिथी          महारानी अहिल्याबाई होलकर भारत के मालवा  साम्राज्यकी मराठा होलकर महारानी थी, उनका जन्म महाराष्ट्र  के अहमदनगर के एक छोटे गाव में हुआ था उनके पिता मानकोजीराव शिंदे,  गाव के पाटील थे, ऊस समय महिलाये स्कूल नही जाती थी, फिर भी, उनके पिताजी, मानकोजीरावजीने अहिल्यादेवी को पिढया लिखाया.         दस वर्ष की आयु में, अहिल्यादेवी का विवाह, इंदोर के प्रसिद्ध सुभेदार, मल्हारराव होलकर के पुत्र, खंडेराव होलकर के साथ हुआ. अहिल्यादेवी के पुत्र का नाम, मालेराव, और पुत्री का नाम मुक्ताबाई था.          अहिल्यादेवी के पती, सन 1754 में कुंभेर युद्ध में शाहिद हुवे थे, बादमे 12 साल बाद, अहिल्यादेवी के ससूर मल्हारराव होलकर ने, अहिल्याको मालवा साम्राज्य की महारानी का ताज पहनाया था,             अहिल्यादेवी हम...

रुचकर वऱ्हाडी ठेचा

Image
              रुचकर वऱ्हाडी ठेचा  साहित्य 1 1)10 ते 12 हिरव्या मिर्च्या  2) 5 ते 6 लसुण पाकळया  3) कोथिंबीर  3) 1 चमचा जिरे  4) 1 चमचा मिठ  5) चिमूट भर हळद  6) एक मोठा चमचा तेल  कृती   सर्व प्रथम मिर्च्या धुवून सुकू द्याव्या, नंतर त्यात वरील सर्व जिन्नस एकत्र करुन खलबत्त्यात कुटून द्यावे, (खलबत्त्यात या साठी की त्याने चव मस्त्त लागते, मिक्सर मधे केलेली चव मला आवडत नाही म्हणुन), तुम्ही मिक्सर मधे करू शकता. नंतर एका भांड्यात तेल गरम  करुन त्यात मोहरीचा तडका देऊन हिंग टाकावे, आणि मग ठेचलेल्या पेस्ट मधे गरम गरम तेल टाकावे एकदम सुप्पर ठेचा होतो.  आपण नेहमी मिर्च्या तळून मग त्याचा ठेचा  करतो. पण हा ठेचा आधी मिर्च्या ठेचून मग त्यात कडकडीत मोहरी हिंगाचे तेल टाकावे. फारच रुचकर लागतो.  तवा ठेचा रेसिपी  👇 तवा ठेचा रेसिपी

केसांसाठी पोषक / कढीलिंब /गोडलिंब /कढीपत्ता/ curryleaves चटणी

Image
केसांसाठी पोषक / कढीलिंब /गोडलिंब /कढीपत्ता/ curryleaves चटणी  कढीलिंब सर्वांच्या परिचयाचे झाड आहे. कढी,  पोहे, चिवडा म्हटले की,  पहिले आठवते,  ते गोडलिंबाचे पान, कढीलिंब शिवाय पोह्यात, चिवड्यात मजाच नाही बाई !असे बऱ्याच महिला म्हणतात. असो!महिलांनाचा विषय  निघाला,  की केसांचा विषय हा निघतोच, माझ्या केसांना वाढच नाही किंवा माझे केस दिवसेंदिवस पातळ का होत आहेत? माझे केस फारच गळतात   हा प्रत्येक स्त्रियांचा यक्ष प्रश्न.             कढीलिंबाची उत्पत्ती स्थान भारत आणि श्रीलंका, परंतु  भारतात केरळ, बिहार, तामिळनाडू व  हिमालयात मोठ्या प्रमाणात कढीलिंबाची  झाडें आढळून येतात.           कढीलिंबाची पाने फार  रुचकर असतात आणि त्यामध्ये जीवनसत्व ए  भरपूर असत,          आपल्या स्वयंपाक घरात रोज वापरण्यात येणाऱ्या पदार्थां मधे, औषधी गुण असतातच.  त्यातूनच एक आह...

स्वयंपाक घरातील महत्वाच्या टिप्स unique kitchen tips

Image
Unique kitchen tips    स्वयंपाक घरातील महत्वाच्या टिप्स           unique kitchen tips   आज आजीने तिच्या नातीला काही महत्वाच्या टीप्स सांगितल्या आहे, नातीने  म्हणजेच मनूने आजीला सरप्राईज द्यायच ठरवलं. की आजीला आज मस्त गरमा गरम साबुदाणा खिचडी करुन द्यावी, मग काय मनू ने मस्त्त शेंगदाणे भाजले, आणि गरमा गरमा शेंगदाण्याचे साल  ती हाताने काढत होती, पण साल काही लवकर निघत नव्हते तितक्यात आजी स्वयंपाक घरात पाणी प्यायला आली, आणि बघते तर मनूताई मस्त्त शेंगदाण्याची साल काढत होती आणि ती साल काही लवकर निघत नव्हती, मनूचे हात सुद्धा गरम शेंगदाण्याने भाजत होते, आणि इकडे आजी, मनू हे काय करते आहे,  ते चूपचाप बघत होती,         आणि मग काय मनूची चिडचीड सुरु झाली आणि मणुताई हात पाय आपटत स्वयंपाक खोलीतून डायरेक्ट बाहेर, मग ती आजीला म्हणाली, आजी,   अग तू कशी ग शेंगदाण्या चे साल काढते तुझे हात नाही का ग भाजत? मग कुठे आजीने मनूला काही टिप्स सांगितल्या, आजी म्हणाली, ...