तोंडलीच लोणचं , कुंदुरी का अचार

             तोंडलीच लोणचं, 

             कुंदुरी का अचार 


साहित्य 


1)1पाव हिरवी ताजी तोंडली

2)2चमचे मेथीदाणे 

3)2 चमचे मोहरीची डाळ 

4)चवीपुरते मिठ 

5)लोणचं मसाला 


कृती 


तोंडली स्वच्छ धूऊन घ्यावी, आणि स्वच्छ कोरडी पुसून घ्यावी नंतर तोंडलीचे दोन काप करावे, एका बाउल मधे तोंडली, मिठ आणि हळद घालून रात्रभर तसेच राहू द्यावे, दुसरे दिवसी जे पाणी सुटते ते काढुन घ्यावे, त्या तोंडली मधे वरील सर्व साहित्य टाकावे जसे आपण कैरीचे लोणचं करतो सेम तसेच, हे लोणचं वर्षभर टिकतं 





तोंडलीच लोणचं हे तोंडलीच्या भाजी पेक्षा रुचकर लागते 

तोंडली ही एक फळभाजी आहे लॅटिन भाषेत ह्या भाजीला 

कोकसिनिया ग्रँडिस, हिंदी मधे कुंदुरी आणि मराठी मधे तोंडली, गुजराती भाषेत घिलोडा म्हणुन ओळखली जाते तोंडलीचा वेल असतो हा वेल 10 ते 12 वर्षा पर्यंत फळ देतो.   सुरुवातीला ही फळ हिरवी 

असतात.पिकल्यानंतर ती लाल होतात.  याची सालं हिरवी आणि पांढरी असून साली मधे भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटिन, कॅल्शिअम, खनिज  तत्व असते, तोंडलीची मूळ, खोड आणि पानांपासून औषधं तयार केली जातात. 


तोंडली मधे जीवनसत्त्व अ आणि बिटा कॅरोटीन असल्यामुळे हे सारक म्हणून काम करतं. त्यामुळे पचनक्रिया  सुधारण्यास मदत होते, मलब्धतेचा त्रास असणाऱ्यांना ही भाजी गुणकारी आहे 

तोंडलीचे आणखी भरपूर फायदे आहेत. 


1)मधुमेही रुग्णांनी ह्या भाजीचे सेंवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. 


2)कॅल्शियम असल्यामुळे अस्थी  रोगामध्ये फायदेशीर आहे. 


3) अस्थमा रुग्णांसाठी ही भाजी अत्यंत हितकारक आहे. 


4) महिलांना प्रदर रोगात तोंडलीच्या मुळांचे चूर्ण दिल्यास फायदा होतो 


5) जीभ चावली  गेल्यास किंवा जिभेवर फोड आल्यास तोंडली चावून चावून खावी. 


Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन