उष्ट्रासन
उष्ट्रासन उष्ट्र म्हणजे उंट या आसनात शरीराचा आकार उंटा सारखा दिसतो म्हणून या आसनास उष्ट्रासन असे म्हणतात. प्रथम गुडघ्यावर उभे राहावे त्यासाठी दोन्ही पायांमध्ये सहा ते नऊ इंच अंतर ठेवावे,हात मागे नेऊन तळहात पायांचे टाचांवर ठेवावे आणि कमरेवर हात ठेवून मागच्या बाजूने झुकावे आणि थोडेसे वाकावे डोके ढिले सोडावे आणि श्वास संथपणे चालू ठेवावा व 15 ते 30 सेकंद या आसनामध्ये राहावे आणि हळूहळू हे आसन सोडावे हे असन तुम्ही एक मिनिट किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ करू शकता आसन सोडताना कटी प्रदेश पुन्हा मागे आणावा व एकेक हात टाचेवरून उचलून पुन्हा गुडघ्यावर उभे राहावे आणि थोडावेळ वज्रासनात बसून पाठीवर पडून विश्रांती घ्यावी आसनाचे लाभ उष्ट्रासनामध्ये मांड्यांचे स्नायू समोरून चांगले ताणले जातात व हा ताण गुडघ्याच्या आसपास अधिक पोहोचतो त्यामुळे मांड्या सुडोल व ताकदवान बनतात तसेच गुडघ्यांचेही आरोग्य उत्तम राहते कमरेचे स्नायू बलवान होतात व पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते तसेच मानेचा त्रास होत नाही कारण नैसर्गिक रित्या मानेला...