कोरोना महामारीच्या काळात फुफुसाची कार्यक्षमता वाढवा आणि फिट रहा

कोरोना  महामारीच्या काळात फुफुसाची कार्यक्षमता वाढवा आणि फिट रहा 




        साऱ्या जगाला भीतीने आणि काळजीने भेडसावून सोडणारा कोरोना ह्या विषाणूचा जगभरात वेगाने प्रसार होत आहे. आणि आता तर दुसरी लाट वेगाने पसरत आहे, या आणीबाणीच्या काळात प्रत्येक जण औषध शोधण्याच्या मागे लागले आहेत बरेच रुग्ण घरगुती उपचार करुन बरे झालेले आपल्याला आढळून येतात, नवीन  विषाणू असल्यामुळे कुठल्याच pyathi मधे अजून तरी औषधी सापडले नाहीत.  


               तरी पण आपल्या जवळ  भारतीय संस्कृती ची देन आहे जी ऋषीं मुनींनीं विरासत मधे दिलेली आहे ती म्हणजे योगा  


         विदेशातून जरी हा विषाणू आला तरी आपल्या जवळ आपल्याला ऋषीमुनी कडून वारसात मिळालेली देन योगा आहे. 


        “योगात्परातरं पूण्यं योगात्परातरं सूक्ष्म

योगात्परातरं श्रेष्ठ योगात्परातरं नही”


अर्थात योगा पेक्षा कोणी श्रेष्ठ नाही आणि योगा सारखं काही सूक्ष्म नाही. 


     बऱ्याच तज्ञांनी आपल्याला वेगवेगळे उपाय सांगतले आहेत त्यात सर्वप्रथम सामाजिक अंतर पाळण्याचा सल्ला दिला आहे, कारण विषाणू हा संसर्गजन्य आसल्या मुळे एकमेकांच्या   संपर्कात आलेल्या व्यक्तींना धोकादायक आहे हे टाळण्यासाठी तज्ज्ञांनी सामाजिक अंतराचे अनुसरण आणि निरोगी आहार घेण्याचा सल्ला दिला आहे.


       हा विषाणू शरीरात नाकातून तोंडातून आणि डोळ्यातून शरीरात जातो, आणि रुग्णांची प्रतिकार शक्ति कमी असेल तर हा आजार वाढत जाऊन तो फुफ्फुसात जातो व  वेगाने रुग्णाची शारीरिक आणि मानसिक हालत खराब करतो.  


     त्यासाठी फुफ्फुसांना बळकट ठेवण्यासाठी व शरीराची प्रतिकार शक्ति व मानसिक स्तिथी कमजोर न होऊ देण्यासाठी रोज  दोन वेळा योगासन, प्राणायाम, मुद्रा, आणि शरीर शुद्धी करण्याचा सल्ला दिला जातो आणि हे करने अत्यंत गरजेचे आहे, लहानां पासुन ते मोठ्यानं पर्यंत, आणि  ज्यांना कोरोना झाला आहे, किंवा होऊन गेला आहे, किंवा झाला नाही त्यांनी पण अगदी रोज नेमाने योगा प्राणायाम  करणे आणि निरोगी आहार घेणे महत्वाचे आहे.

             

फुफुसाची कार्यक्षमता वाढविण्या साठी काही आसन आहे ते जर रोज आणि नियमित केले तर या भयंकर विषाणू सोबत लढण्याची क्षमता आपल्यात निर्माण होइल. 

 

         त्यासाठी रोज सूक्ष्म व्यायाम करुन मग योगासन करायला पाहिजे 


           सर्व प्रथम दोन्ही हात समांतर समोर ठेऊन 




 दोन्ही हाताची मूठ बांधून ती मूठ clockwise, आणि anticlockwise 5 - 5 वेळा गोल  गोल फिरवायचं. 


       त्यानंतर खांदे पण गोल गोल फिरवायचे 

 




        हाताचा सूक्ष्म व्यायाम झाल्यावर नंतर 

पायांचा सूक्ष्म व्यायाम करायचा, सर्व प्रथम सरळ उभे राहून आणि दोन्ही पाय एक





मेकांना जोडून उभे राहायचं दोन्ही हात सरळ ठेऊन  मग एक पाय जमिनी पासुन एक ते दोन फूट वर उचलून  समोर करायचा  व  टाचे पासुन गोल गोल फिरवत परत दुसरा पाय तसाच फिरवायचा ही क्रिया 10 -10 वेळा करायची पायाचा पंजा सरळ ठेवावा.  वरील दोन्ही सूक्ष्म व्यायाम केल्याने शरीराची थकान दूर होते हात पायात ताकद येईल. आणि मन प्रसन्न राहील. 




       आसन 


कोरोना महामारीच्या काळात बरेच जणांना मानसिक त्रास होत आहे हाती काम आणि पैसा नसल्यामुळे चिडचिड आणि तणाव वाढलेला दिसून येत आहे, मानसिक स्थिती नीट राहावी यासाठी   जर आसन केले तर माणुस त्याही परिस्थितीतुन स्वतःला वाचवू शकतो. 


सुखासन 


      सुखासन एकदम सोप आसन आहे आपण साधी मांडी घालून बसतो त्यालाच सुखासन म्हणतात, सुखासनात बसून  पाठ एकदम ताठ ठेवायची आणि दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे आणि डॊळे बंद करुन सर्व प्रथम नॉर्मल स्वास घायचा रिलॅक्स झाल्यावर दीर्घ श्वसन करायचे आणि आपल्याला ईष्ट देवतेचे स्मरण करायचे व चेहऱ्यावर हलकीशी smile असु दयावी. 


पद्मासन 


      पद्मासनात ऊजवापाय डाव्या मांडीवर व डावा पाय ऊजव्या मांडीवर ठेऊन हे  आसन करायचे असते, ज्यांना दोन्ही पाय जर ठेवणे शक्य नसेल तर त्यांनी कोणतातरी एक पाय म्हणजे अर्ध पद्मासन पण घालून हे आसन करू शकता. दोन्ही हात गुडघ्यावर ठेऊन  व दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा करुन  om उच्चारण किंवा आपल्या ईष्ट देवतेचे समरण करावे. या आसनाने शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक  लाभ मिळतो. 


फुफुसाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आसन 


भुजंगासन 

 




     पोटावर झोपून करायचे हे आसन आहे 

पोटावर झोपून दोन्ही  पाय एकमेकांना जोडून घ्या.  कपाळ जमिनीला टेकलेले असावे, तळपायाची बोटे सरळ जमिनीला टेकलेले असावी, दोन्ही पंजे छातीजवळ जमीनी वर ठेऊन दोन्ही हाताची कोपर वरच्या बाजूला वळलेले असावे. आणि हळू हळू नाभी पर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशा कडे. हे आसन करताना  10 ते  15 सेकण्ड पर्यंत या स्थितीत राहावे व परत हळू हळू हे आसन सोडावे. 

           

गोमुखासन 



सर्व प्रथम दोन्ही  पाय लांब करुन बसावे त्यानंतर डावापाय मुडपून उजव्या पायाखाली ठेवावा. व उजवा पाय मुडपून डाव्या पायावर ठेवावा. त्यानंतर जो पाय वर आहे त्याच बाजूचा हात वर करुन पाठीवर ठेवावा व दुसरा हात मागे नेऊन वरच्या हातचा पंजा किंवा बोटे एकमेकात अडकून ठेवावा, आणि मान सरळ, डॊळे बंद करुन भूमध्यावर नजर स्थिर करुन हे आसन करावं, या आसनाने हृदयाची, फुफुसाची कार्यक्षमता वाढते, तसेच पोट  कमी होते व हाताची चर्बी पण कमी होण्यास मदत होते 


ताडासन 




सरळ ताठ उभे राहून करावयाचे हे आसन आहे 

        या आसनात सरळ उभे राहावे, दोन्ही पाय एकमेकांना जोडलेले असावे नजर सरळ  व हळू हळू दोन्ही हात वर न्यावे व टाचा देखील वर न्याव्या व संपूर्ण शरीर ताणलेले असावे. 


     या आसनाने शरीरातील सर्व स्नायू सक्रिय होऊन रक्त प्रवाह सुरळीत होतो, दीर्घ श्वसन केल्याने फुफुसे सुदृढ होतात.


        तसेच रोज हसायला पाहिजे म्हणतात ना की……….. 


    "  Man is a Laughing Animal"


नि :संदेह  ईश्वराने मानवाला हसण्याची ही एक विलक्षण शक्ति प्रदान केली आहे. 


        जगात फक्त एकच असा प्राणी आहे जो  हसू शकतो आणि तो म्हणजे मनुष्यप्राणी 

  

         कोरोनामुळे साऱ्या जगात अशांती, भय आणि रोगराई पसरलेली आहे लोकांची आर्थिक मानसिक आणि शारीरिक स्थिती कमजोर होत आहे, त्यामुळे सर्वच जण दु,:खि आणि निराशेच्या खाईत  लोटले जात आहेत, 

       

            ज्याची मानसिक शक्ती बळकट आहे ते कोरोनाला मात करुन सुरळीत जीवन जगत आहेत.


              

      कोरोनाची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे. हा संसर्ग एकापासून सगळ्या ठिकाणी वाऱ्यासारखा फार लवकर पसरतो आहे  कोरोना किंवा कोरोनाच्या गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागते. 


       परंतु सौम्य  आणि मध्यम प्रकरणांमध्ये रुग्णांना घरी राहूनही उपचार केले जात आहे,  रुग्णाला रुग्णालयात न ठेवता घरीच राहून उपचार करतात त्याला ‘होम क्वारंटाइन ’करुन  घरच्या घरी उपचार करतात आणि  रुग्ण स्वतःला घराच्या उर्वरित सदस्यांपासून वेगळे ठेवून उपचार करू शकतात.


       हा आजार आपल्याला आपल्या निष्काळजीपणामुळे आणि बेजबाबदारपणे वागल्यामुळे पसरत आहे. त्यामुळेच प्रत्येक व्यक्तीने हे ठरवावे की नियमाचे पालन करुन शक्य त्या सर्व उपयाद्वारे आपली प्रकृती उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करावा, या काळात जर शरीराकडे किंवा शरीर स्वास्था कडे आणि मानसिक स्वस्था कडे दुर्लक्ष झाले तर येणाऱ्या काळात पच्छातापची वेळ येऊ शकते ती न यावी या साठी योग्य आहार विहार पण महत्वाचा आहे. 

         अयुर्वेदात सांगितल्या प्रमाणे जसे 

की,


नित्यं हिताहारविहारसेवी समीक्ष्यकारी व्यसनेष्वसक्तः।

दाता समः सत्यपरः क्षमावानाप्तोपसेवी च भवत्यरोगः।।


 जी व्य्क्ती रोज हितकारी आहार विहाराचे सेवन करते प्रत्येक गोष्टीचा विचार करते वाईट गोष्टी आणि वाईट वासनांचा विचार करत नाही, दानशूर असते, चांगले आचार विचार ठेवते, नियमांचे पालन करते ती व्यक्ती कधीच आजारी पडत नाही, आणि पडली तरी त्या व्यक्तीला, ज्या आजाराने यातना होतात त्या होत नाहीत, कारण त्याच्याजवळ ती यातना सहन करण्याची ताकद असते, ती व्यक्ती छोट्या छोट्या कारणाने हतबल होत नाही, कारण तिच्यात सहनशक्ती असते. 

       

        आहार 

रोज ताजे अन्न खावे, आणि वेळेवर जेवावे.  बऱ्याच तज्ञांनी आपल्याला काढा कसा करायचा आणि किती वेळा घ्यायचा हे सुद्धा वेळोवेळी सांगितले आहे, सोशल मिडिया वरून बरेच जण एकमेकांना शेयर सुद्धा करतात, तसा काढा करुन घ्यायचा, तसेच लिंबू शरबत, संत्रा रस, मोसंबी रस

आणि 


              जीवनशैलीमध्ये बदल करणे महत्वाचे आहे. नियमित मास्कचा उपयोग करणे, सुरक्षित अंतर ठेवणे घरामध्ये सुद्धा  अंतर ठेऊन एकमेकांशी बोलणे बाहेरून आल्यानंतर कपडे बदलून ते धुवायला टाकणे, साबणाने स्वच्छ हात धुणे, सॅनिटाझरचा वापर करून निर्जंतुकीकरण करणे, अशा सवयीचे नियम लाऊन घेणे व  आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.


       कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी व्यक्तिगत काळजी सामाजिक अंतर तसेच स्वयंशिस्त अंगीकारून आपल्या कुटुंबाचीही काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे.

        

स्वतःची काळजी घ्या मास्क चा वापर करा हात स्वच्छ धुवा आणि मुख्य म्हणजे चेहऱ्यावर हलकीशी smile ठेवा 


स्वच्छ हात धुणे 


Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन