वारंवार सर्दी होणे सकाळी उठल्यार शिंका येणे . यावर घरगुती उपाय
वारंवार सर्दी होणे
सकाळी उठल्यार शिंका येणे
यावर घरगुती उपाय
(सर्व संग्रहीत चित्र )
बरेच लोकांना सकाळी उठून शिंका येणे,
नाक गळणे, नाक चोंदणे, नाकात काही
तरी वळ्वळणे नाक बंद पडल्यामुळे स्वास
घ्यायला त्रास होणे, इत्यादी समस्या
असतात. त्या सोबतच डोके दुखी,डोके
जड पडणे, डॊळे दुखणे.डॊळे लाल होणे,
घश्यात खवखवल्या सारखे होणे आणि
कानात आवाज होणे किंवा कानात हवा
जाणे इत्यादी, हा त्रास फक्त सकाळीच तो
पन काही मिनिटा पर्यंतच परंतु फार त्रास
दायक असतो.
याच मुख्य कारण म्हणजे पोट साफ न
होणे हेच आहे. तसेच शिळे अन्न खाने,
शरीराला घाम न येणे, शरीर नेहमी थंड
असने.अश्या अनेक छोट्या मोठ्या समस्या
देखील सर्दी होण्यास कारणीभूत असतात.
नेहमी नेहमी सर्दी चा त्रास
होणाऱ्या मध्ये काही दिवसांनी या रुग्णांची
चव आणि वास घेण्याची क्षमता कमी होते
त्यांना कुठल्याच प्रकारचा वास येतं नाही,
आणि जिभेची चव पूर्ण पणे जाते.
काही रुग्णांमध्ये नाकाचे हाड
वाढलेले असते. त्यामुळे पण शिंका येतात
आणि ऍलर्जी पण मुख्य कारण असते.
शिंका येण्याचे साईनोसाइटिस हे पण प्रमुख
कारण आहे.
हा रोग जसा जसा जुनाट होतो तसा
त्याचा त्रास पण फार वाढत जातो त्यामुळे
वेळीच उपाय करने आवश्यक आहे.
त्यासाठी घरगुती उपाय केले तर हा
विकार आटोक्यात येऊ शकतो त्यासाठी
रोज आल्याचा चहा, सुंठी मिरे चा काढा,
आसन, प्राणायाम आणि मुद्रा, आणि योग्य
आहार घेतल्यास या त्रासा पासुन मुक्ती
मिळु शकते.
आहार कसा घ्यावा आणि कोणता घ्यावा
शिंका येतं असतील तर रोज
सकाळी कोमट पाण्यात अद्रक किसुन घाला
किंवा 2 थेंब रस टाका व ते पाणी प्या,
सोबत मध टाकलं तरी चालेल.
रोज आल्याचा चहा घेण्याची
सवय करा.
जेवण करताना सूप पिऊ शकता. किंवा जिऱ्याची फोडणी घातलेली गरम गरम कढी प्या
जेवताना रोज हिरव्या पाले भाज्या, तसेच कच्या मोसमी भाज्या बारीक चिरून त्यावर लिंबू आणि मिरे टाकून सेवन कराव्या
ओवा रोज जेवण केल्यानंतर खावा ओव्या मुळे बंद नाक मोकळे होण्यास मदत होते.
तुळस, मिरे आणि अद्रक चा काढा घ्यावा
दिवसातून 3, 4 लवंग खाव्या
रोज मूठ भर गूळ फुटाणे खावे हे खाण्यानेही शिंका, सर्दी आटोक्यात येते.
पुदिना रस 1 चमचा अद्रक रस 1 चमचा आणि चिमूटभर भर हळद मधातून घ्यावे.
लोखंडाची कढई गरम करुन त्यात
थोडा ओवा टाकून त्याचा जो धूर निघतो तो
धूर हुंगल्यास सकाळी शिंका येतात त्या येणे
बंद होतात
तसेच चणे सुद्धा गरम करुन त्याचा धूर
घेतल्यास शिंका कमी होतात
मिरे आणि विलायची घेतल्यास सर्दी
आणि शिंका यातून बरे होण्यास मदत होते.
वारंवार शिंका सर्दी न होवो होते त्या साठी
काही मुद्रा पण लाभदायक आहेत जसे
लिंग मुद्रा आणि सूर्य मुद्रा ह्या मुद्रा केल्यास
निश्चितच हा विकार आटोक्यात येण्यास
मदत होते त्या साठी पाहूया ह्या मुद्रा कश्या
करायाच्या
लिंग मुद्रा
प्रथम दोन्ही हातांच्या बोटांची पेर
एमेकांजवळ आणायचे
दोन्ही हातांची बोट एकमेकात गुंतवा
दोन्ही हातांपैकीचा एक अंगठा सरळ
ठेवावा.
लिंग मुद्रा केल्याने होणारे लाभ
ही मुद्रा केल्याने शरीर गरम राहते
खूपच ठंडी वाजत असेल तर या मुद्रे ने
शरीरात उष्णता उत्पन्न होऊन थंडी
वाजण्याचे कमी होते, तसेच सर्दी खोकला
असेल तर ही मुद्रा रोज करावी.
ही मुद्रा केल्यामुळे शरीरात उष्णता
वाढते त्या मुळे शिंका सायनस सर्दी पडसे
ह्या विकारात फायदा होतो
सूर्य मुद्रा
मुद्रा करण्याची कृती
अनामिका अंगठाच्या उंचवट्यावर ठेऊन
मग अंगठ्याने अनामिकेवर हलकासा दाब
द्यावा आणि इतर बोट सरळ ठेवावे. ही
झाली सूर्य मुद्रा
सूर्य मुद्रा चे लाभ
ही मुद्रा शरीरात उष्णता निर्माण करते
त्यामुळे कफाचे कोणतेही आजार या मुद्रे
मुळे कमी होतात.
या मुद्रेच्या नियमित सरावाने कंठस्थ ग्रंथी चे
कार्य सुरळीत राहते त्यामुळे जठराचे
विकार होत नाही मलावरोध अपचन हया
तक्रारी पण दूर होतात. अग्नीतत्व
वाढल्यामुळे कफ किंवा कफजन्य विकार
होत नाहीत, सायनस, दमा सर्दी, क्षय रोग
न्यूमोनिया या सर्व आजारातून बरे होण्यास
मदत होते.
सूर्य नमस्कार
रोज सूर्य नमस्कार जर मंत्र उच्चारण करत
केले तर अधिक फायदेशीर होते.
सूर्यनमस्कार संपूर्ण शरिरात ऊर्जा आणि
चैतन्य निर्माण करुन आरोग्य सुरळीत
ठेवण्यास मदत करते. रोज सूर्यनमस्कार
केल्यास मनुष्य आजारी पडत नाही प्राचीन
काळा पासुन आपल्या पूर्वजांनी सूर्य
नमस्काराचे महत्व पटवून दिले आहेत. स्पष्ट
आणि नीट मंत्रोच्चार करत सूर्यनमस्कार
केल्यास सर्व व्याधींवर मात केल्या जाते.
सुरुवतील सूर्यनमस्कार चा 1 राऊंड पूर्ण
करायचा, किंवा झेपेल तेवढे राऊंड करावे,
आणि नियमित सराव केल्यास 12 राऊंड
पूर्ण करू शकता
खालील प्रमाणे सूर्यनमस्काराचे एक एक
मंत्र उच्चरून आसन ( सूर्यनमस्कार करावे )
1. ॐ मित्राय नमः
2. ॐ रवये नमः
3. ॐ सूर्याय नमः
4. ॐ भानवे नमः
5. ॐ खगाय नमः
6. ॐ पुष्णे नमः
7. ॐ हिरण्यगर्भाय नमः
8. ॐ मरिचये नमः
9. ॐ आदित्याय नमः
10. ॐ सवित्रे नमः
11. ॐ अर्काय नमः
12. ॐ भाष्कराय नमः
आसन
सर्वांगासन
हलासन
मत्स्यआसन
सुप्त वज्रासन
Comments
Post a Comment