स्वयंपाक घरातील महत्वाच्या टिप्स unique kitchen tips

Unique kitchen tips स्वयंपाक घरातील महत्वाच्या टिप्स unique kitchen tips आज आजीने तिच्या नातीला काही महत्वाच्या टीप्स सांगितल्या आहे, नातीने म्हणजेच मनूने आजीला सरप्राईज द्यायच ठरवलं. की आजीला आज मस्त गरमा गरम साबुदाणा खिचडी करुन द्यावी, मग काय मनू ने मस्त्त शेंगदाणे भाजले, आणि गरमा गरमा शेंगदाण्याचे साल ती हाताने काढत होती, पण साल काही लवकर निघत नव्हते तितक्यात आजी स्वयंपाक घरात पाणी प्यायला आली, आणि बघते तर मनूताई मस्त्त शेंगदाण्याची साल काढत होती आणि ती साल काही लवकर निघत नव्हती, मनूचे हात सुद्धा गरम शेंगदाण्याने भाजत होते, आणि इकडे आजी, मनू हे काय करते आहे, ते चूपचाप बघत होती, आणि मग काय मनूची चिडचीड सुरु झाली आणि मणुताई हात पाय आपटत स्वयंपाक खोलीतून डायरेक्ट बाहेर, मग ती आजीला म्हणाली, आजी, अग तू कशी ग शेंगदाण्या चे साल काढते तुझे हात नाही का ग भाजत? मग कुठे आजीने मनूला काही टिप्स सांगितल्या, आजी म्हणाली, ...