जिऱ्याचे बहुगुणी फायदे, गॅस, शरीरातील उष्णता, पोटदुखी, हाता पायाला घाम येणे.
जिरे
ठंडी कुं जीरा और गरमी कुं हीरा
रोजच्या आहारात तिखटा मिठाच्या डब्यातला एक महत्वाचा पदार्थ म्हणजे जिरे,
भारतात सर्वत्र जीऱ्याची लागवड होते, परंतु उत्तर गुजरात मधे भरपूर प्रमाणात लागवड होते
साधारणतः हिवाळा ऋतूत जीऱ्या ची पेरणी करायला सुरुवात होते, जिऱ्याचे रोप हे फार सुगंधी असते आणि ते फक्त एक किंवा दीड फूट उंचीचे रोप असत.
जिऱ्याचे आपल्याला तिन किंवा चार प्रकार पहायला मिळतात, जसे की पांढरे जिरे, शहाजिरे, या सगळ्या जिऱ्यात जवळ जवळ सारखेच गुण असतात.
जिरे खाद्य पदार्थांची चव तर वाढवतेच परंतु अनेक आजारांना सुद्धा दूर पळवते
जिरे हे थंड गुणांचे असल्या मुळे , शरीरात उष्णता वाढली असल्यास जीऱ्या च्या सेवनाने उष्णता कमी होते,
जीऱ्या मधे असलेले मोलाटोनीन तत्व डायरिया, ऍसिडिटी पोट दुखी, मलावरोध
इत्यादी विकारावर अत्यंत गुणकारी आहे, तसेच ताका मधे चिमूटभर
जिरे अँटिसेप्टिक असल्यामुळे सर्दीपडस्या च्या समस्या होत नाहीत
मधुमेहींना तर जिऱ्याचे सेवन रोज करायला पाहिजे, त्यांच्या साठी जिरे अत्त्यंत गुणकारी आहे,
ज्यांच्या हाता पायाला नेहमी नेहमी घाम येतो त्यांनी जीऱ्या चे पाणी रोज सेवन करायला हरकत नाही. किंवा जिऱ्याचे पाणी उकळून त्यात हात आणि पाय थोड्या थोड्या वेळाने धुवावे.
जिऱ्या मधे लोह, म्याग्नेशियम, कॅलशियम, फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे सर्व विकारांवर गुणकारी आहे,
जिरे हे. आतडे, यकृत, जठर, यांना मजबूत बनवते. कृमीं चा नाश करते , तसेच मलाची दुर्गंधी सुद्धा दूर करते,
तसेच शरीरातील अतिरिक्त उष्णता घालविण्यास मदत करते
जीऱ्या च्या सेवनाने बाळंतिणीस अंगावर दूध चांगले येते,
स्त्रिया साठी तर जिरे रामबाण आहे, मासिकपाळीत पोट दुखी वर, अनियमित मासिक पाळी, प्रदर रोगावर, आणि गरोदरपणात उलट्या होणे यावर अत्यंत गुणकारी असल्यामुळे स्त्रियांनी जिऱ्याचे सेवन रोज करावे.
भाजलेले जिरे, सैंधव आणि मिरे ताकात मिसळून पिल्याने मुळव्याधी मधे चांगला फायदा होतो
तज्ञाच्या मते जिरे डोळ्याचे तेज वाढावंते, हृदयाचे दुखण्यावर सुद्धा जीऱ्या चे सेवन करतात.
Comments
Post a Comment