भरपूर औषधीय गुण असलेली पौष्टीक तांदुळजा
तांदुळजा भरपूर औषधीय गुण असलेली पौष्टीक तांदुळजा भारतात सर्वत्र उत्पन्न होणारी आणि पावसाळ्यात भरपूर उत्पन्न देणारी तांदुळजा ही पालेभाजी दीड ते दोन फूट उंच असणारी आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असणारी अशी ही पौष्टीक भाजी सर्वांच्या परिचयाची आहे. प्राचीन काळापासून आयुर्वेदात तांदुळजाचा उपयोग करण्यात येतो असे आढळून आले आहे. पालेभाज्या तर भरपूर आहेत, जसे की पालक, मेथी, घोळ भाजी, चिवळची भाजी, परंतु पालेभाज्यांमध्ये सर्वात उत्तम प्रतीची भाजी म्हणजे तांदूळजा यात भरपूर प्रमाणात C जीवनसत्व आढळून येते, तसेच A आणि B जीवनसत्व सुद्धा असते. तांदूळजाच्या पानात व देठात भरपूर प्रमाण...