शेवग्याच्या शेंगा बहुगुणी शेवगा (दात दुखी, मस्तक पिडा, केसातील कोंडा यावर प्रभावी )

 शेवग्याच्या शेंगा 

              बहुगुणी शेवगा 

   (दात दुखी, मस्तक पिडा, केसातील कोंडा यावर प्रभावी )





सर्व छायाचित्र संग्रहित 


     भारतात सर्वत्र आढळणारी शेवग्याची झाड सर्वांच्याच परिचयाचे आहेत, बारीक बारीक पानांचे, साधारण 20 फूट पर्यंत उंचीचे हे झाड फारच उपयोगी आहे, औषधी म्हणुन हे झाड बरेच जण आपल्या परस बागेत लावतात. 


             शेवग्याच्या शेंगा साधारण एक ते 2 फूट  लांब असतात आणि रंगाने हिरव्या असतात, या शेंगांवर 9 रेषा असतात, 

शेवगाच्या झाडाची फांदी तोडून ती फांदी 2 ते 3 फूट खोल खड्डा करुन रोवल्यास तीची वाढ होते, साधारण 2 वर्षांनी झाडाला शेंगा येतात. 


         शेवगा च्या लागवडी साठी साधारण काळी जमीन, कोरडवाहू किंवा गाळाची सुपीक जमीन लागते. शेवग्याला बाराही महिने शेंगा लागतात. 


      शेवगाच्या झाडाला फेब्रुवारी - मार्च मध्ये फुलं येतात. व एप्रिल - मे मध्ये शेंगा लागतात. 


       बारमाही शेवग्याला बाराही महिने कमी अधिक शेंगा येतात. 



     शेवगा हा  हृदयासाठी, डोळ्यांसाठी, हाडांसाठी वरदान आहे. 


         शेवग्याच्या पानांन मध्ये , फुलां मध्ये , बियांमध्ये आणि साली मध्ये  कॅल्शिअम आणि प्रथिने जास्त प्रमाणात आढळतात.


     तसेच कार्बोहायड्रेट, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, बी  आणि सी भरपूर प्रमाणात  शेवग्यामध्ये आढळतात.


        शेवगा रुची उत्पन्न करणारा, तिखट रुक्ष , खारट, आणि जुलाबात उपयोगी, तसेच डोळ्यांसाठी हितकारक असून हृदय, आणि वायू, पित्त,  कफ यावर हितावह आहे. 


       शेवगाच्या बारीक पानांची भाजी केली जाते हृदयासाठी ही भाजी चांगली असते. 

     

     शेवगाच्या शेंगा, बी, पाने, फुले, साल, मूळ यांचा औषध म्हणुन उपयोग होतो. 




    ( शेवग्याच्या शेंगांचे 2 प्रकार असतात 1 कडू आणि 2  गोड, कडू शेवगाला रानटी शेवगा  म्हणुन ओळखल्या जाते. 

        तज्ज्ञांच्या मतानुसार कडू शेवगा वातविकारात फायदेशीर आहे. या शेवग्याच्या सालीचा लेप सुजेवर   लावल्यास सूज लवकर उतरते. )

           परंतु   शेवग्याच्या दोन्ही जातींपैकी 

   गोड शेवगा चा उपयोग रोजच्या आहारात जास्त केला जातो.


    शेवग्याचे बी डोळ्यांचे विकार  दूर करण्यास मदत करते, डोळ्यांसाठी शेवग्याचे बी हितावह आहे. 


      तज्ञांच्या मते शेवग्याच्या बी चे नस्य घेतल्यास डोकेदुखी मध्ये आराम मिळतो. 


     शेवगाच्या पानाची भाजी खाल्ल्यास अंगात सूज असल्यास ती लवकर उतरते 

         

          शेवग्याच्या पानांचा रस काढुन तो डोक्याला लावल्यास कोंडा नाहीसा होतो 

     

       शेवग्याच्या पानांचा रस एका कापसाच्या बोळ्यावर टाकून तो बोळा डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांना थंडावा मिळतो व थकलेल्या  डोळ्यांना आराम मिळतो 

         

         शेवग्याची साल काढुन ती वाटून पोटावर लेप  लावल्यास उदार विकार बरे होतात. 

       

          शेवग्याच्या पानांन मध्ये,  फुला मध्ये जीवनसत्व क भरपूर प्रमाणात असते. 

         

गरोदर स्त्रियांनी  शेवग्याच्या पानांची भाजी किंवा शेंगांची भाजी खाल्ल्यास गर्भाशयाला बळकटी येते, अंगावरचेदूध वाढते. व  बाळंतपणात त्रास होत नाही. 

        

          घसा दुखत असल्यास किंवा घश्याचे विकार असणाऱ्यांनी शेवग्याच्या पानांचे फुलांचे , आणि शेंगांचे सूप घेतल्यास घसा विकारात आराम होतो. 


     त्वचा रोग असणाऱ्यांनी सुद्धा सूप घ्यावे आणि पानांचा लेप किंवा रस काढुन त्वचेला लावल्यास  त्वचा विकारात फायदा होतो. 


     लौंगिक विकारात सुद्धा पानांची भाजी खाल्ल्यास कामोत्तेजक, कमजोरी आणि शुक्रजंतू च्या तक्रारी साठी उपयुक्त. 


     दमा विकारात शेवग्याच्या पानांचा काढा करुन त्यात सुंठ , मिरी, लिंबू आणि आलं टाकून पिल्यास दमा विकारात खोकल्याची उबळ कमी होते. 


     संधिवाताच्या विकारात शेवग्याची पाने कुटून त्याचा लेप लावल्यास संधिवात मध्ये फायदा होतो. 



      हाडे मजबूत आणि निरोगी राहण्याकरिता शेवग्याच्या भाजीचे आहारात  नियमित सेवन करावे .


 


    तीव्र  डोकेदुखी असल्यास शेवग्याच्या बिया भाजून त्याचे चूर्ण करुन नस्य केल्यास डोके दुखी मध्ये त्वरित आराम होतो. 


  

       लघवी मध्ये जळजळ होत असेल तर औषधी सारखा 1 चमचा शेवग्याच्या पानांचा रस व 1 चमचा पाणी मिक्स करुन घेतल्यास लघवीतील जळजळ कमी होते. 


      थेंब थेंब  लघवी होत असेल किंवा लघवी करताना त्रास  होत असेल तर 1 कप काकडी च्या रसात 2 चमचे शेवगाच्या पानांचा रस टाकून पिल्यास आराम मिळतो. 


     तज्ञांच्या मते मूत्रमार्गाच्या कोणत्याही तक्रारी असल्यास गाजराच्या रसात 1 चमचा शेवग्याच्या पानांचा रस टाकून पिल्यास मूत्रमार्गातील तक्रारी दूर होण्यास मदत होते. 


        शेवग्याच्या पानांच्या रसात 1 चमचा लिंबू रस, चिमूटभर हळद टाकून चेहऱ्याला लावल्यास मुरूम नाहीसे होतात. 

 

     

       शेवग्याच्या  कोवळ्या पानांची भाजी आतड्यांना उतेज्जना देवून पोट साफ करते.


       जठराचा कर्करोग किंवा इतर आजार होऊ नये म्हणुन ही भाजी खाणे फायदे शीर होते. 



       आतड्यातील जखमा भरून काढण्यासाठी फार उपयुक्त अशी ही भाजी आहे. 



       वजन कमी करण्यासाठी, वजन जास्त वाढले असल्यास शेवग्याच्या शेंगेचे सूप नियमित  प्यावे.


     शेवग्याच्या पानांचे व शेंगेचे  सूप करुन त्यात चिमूटभर जिरे पूड आणि मिरे पूड टाकून नियमित पिल्यास शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. 




  








Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन