भरपूर औषधीय गुण असलेली पौष्टीक तांदुळजा

                   तांदुळजा 







       भरपूर औषधीय गुण असलेली पौष्टीक तांदुळजा 

 



     भारतात सर्वत्र उत्पन्न होणारी आणि 


पावसाळ्यात भरपूर उत्पन्न देणारी तांदुळजा 


ही पालेभाजी  दीड ते दोन फूट उंच 


असणारी आणि भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन 


C असणारी  अशी ही पौष्टीक भाजी 


सर्वांच्या परिचयाची आहे. 


       प्राचीन काळापासून आयुर्वेदात 


तांदुळजाचा उपयोग करण्यात येतो असे 


आढळून आले आहे. 


     पालेभाज्या तर भरपूर आहेत, जसे की


 पालक, मेथी, घोळ भाजी, चिवळची 


भाजी, परंतु पालेभाज्यांमध्ये सर्वात उत्तम 


प्रतीची भाजी म्हणजे तांदूळजा  यात भरपूर 


प्रमाणात C जीवनसत्व आढळून येते,  


तसेच A आणि B जीवनसत्व सुद्धा  असते. 


तांदूळजाच्या पानात व देठात भरपूर 


प्रमाणात प्रोटीन असत. 


       तांदुळजा चे पीक भारतात सर्वत्र होते,


 शेतात  आणि बागेत ही भाजी भरपूर 


प्रमाणात उगवलेली दिसते आणि 



पावसाळ्यात तर तांदुळजा आपोआप 


उगवते. 


           तांदुळजाचे 2 प्रकार आहेत एक 


हिरवा आणि लाल, ज्याला लाल माठ 


म्हणुनही ही भाजी ओळखली जाते, दक्षिण 


कडील भागात ही भाजी लाल रंगाची 


उगवते, जंगल भागात काटेरी तांदूळजा 


सुद्धा आढळून येतो.ह्या काटेरी तांदुळजाचा


  औषधी म्हणुन उपयोग 


होतो असे जुने जाणते लोक म्हणतात. 

     

     तिन्ही प्रकारच्या तांदुळजा मध्ये रोजच्या 


आहारात जर उपयोग केला तर त्यामध्ये 


लाल रंगाचा तांदूळजा  सर्वात प्रभावी आणि 


गुणकारी आहे.


     तांदुळजाभाजीत  कार्बोहाइड्रेट, 


कॅल्शियम फॉस्फोरस, गंधक, इत्यादी घटक 


असतात. 


     जानकाऱ्यांच्या मते तांदुळजा ची भाजी


 करताना जास्ती शिजवू नये आणि कमी 


तेलात ही भाजी करुन सेवन केल्यास 


अत्यंत पौष्टीक आणि आरोग्यास हितकारक 


असते. 


     तांदुळजाच्या कोवळ्या पानांचा एक 


चमचा रस काढुन त्यात खडीसाखर टाकून 


घेतल्यास सर्व रोगांवर गुणकारी असल्याच 


तज्ञाच मत आहे. 

          

     तांदुळजा पचनास हलकी असते तसेच 


थंड  आणि मल मुत्र साफ करणारी असून 


भूक मंद झाली असेल तर तोंडाला चव 


आणणारी अशी ही भाजी आहे. 

      

     तांदूळजा  कफ आणि  पित्त दूर 


करणारी असून रक्तविकारात  फार 


फायदेशीर आहे. 

     

       

     भारतात   फार प्राचीन काळापासून या 


भाजीचा उपयोग करण्यात येतं आहे. 


     डोळ्यांचे आजार, पोटाचे विकार, 


लिव्हर प्रॉब्लेम, अतिसार, मलबद्धता, 


मूळव्याध इत्यादी विकारांवर ही भाजी  


हितावह आहे. 


     डोळ्यांच्या विकारात जसे डोळ्यांची 


आग होणे,   डॊळे लाल होणे ,  डॊळे कोरडे 


पडणे, डॊळे सकाळी चिकटणे, किंवा 


डोळ्यात रुतल्यासारख्या वेदना होणे इत्यादी 


 विकारात तांदुळजाचे सेवन केल्यास 


डोळ्याचे विकार दूर होण्यास मदत होते. 


         बाळंतीण आणि प्रेग्नेंट स्त्रीने किंवा 


अंगावर दूध पाजणाऱ्या मातेने तांदुळजाच्या 


भाजीचे आहारात सेवन केल्यास फायदेशीर


 आहे, मातेला अंगावर दूध भरपूर  येते. 


     तांदुळजाच्या कोवळ्या पानांचा रस 


काढुन पिल्यास पोटाचे विकार नाहीसे 


होण्यास मदत होते. 


      तांदुळजाची  भाजी नियमित 


खाल्ल्यास त्वचाविकारात फायदा होतो. 


     तांदुळजा चा रस काढुन तो भाजलेल्या 


जागी लावल्यास लवकर आराम पडतो,


 भाजल्याचे व्रण जाण्यास मदत होते. 


     तज्ञांच्या मते मूत्रविकारात होणारा दाह 


किंवा लघवीत होणारी जळजळ असेल तर 


ही भाजी नियमित खावी. 


     

 तांदुळजाभाजी

        


Comments

Popular posts from this blog

मानसिक शांती साठी ज्ञान मुद्रा

महिलांसाठी योगासने भाग 1 पद्मासन

दालचिनीचे औषधी गुण Medicinal properties of cinnamon