निर्जंतुक हळद
निर्जंतुक हळद प्राचीन काळापासून घरगुती उपचार म्हणुन हळदीचा उपयोग आपण करतो आहे. तसेच रोजच्या जेवणात तर तिचा सर्रास वापर होतोच. सर्व प्रकारच्या भाज्या म्हणा किंवा विविध पदार्थां मधे हळदीचा उपयोग होत आहे. हळदी मध्ये साधारण 2, किंवा 3 प्रकार आढळून येतात आंबे हळद, लोखंडी हळद आणि आपण रोज वापरतो ती सुगंधी हळद लोखंडी हळद ही साधारणत : रंग बनविण्यासाठी वापरली जाते. आंबे हळद ही अनेक रोगांवर उपयोगात आणतात. सुगंधी हळद ही अत्यंत उपयुक्त अशी औषधी वनस्पती आहे तिन्ही प्रकृतीच्या लोकांना म्हणजे वात, पित्त आणि कफ प्रकृतीच्या रुग्णांना हळद औषध म्हणुन देता येते. हळदीचे रोप साधारण 2 ते 3 फुटा पर्यंत असते त्याची पाने केळीच्या पानांसारखी असतात य...